Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

4.0  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

सहजीवन (भाग १)

सहजीवन (भाग १)

2 mins
239


आई मला बोलायचे आहे थोड़ तुझ्याशी संकेत शलाका ला म्हणाला.तो कशा बद्दल बोलणार याची तिला कल्पना होतीच. संकेत मला माहित आहे तुझ्या डोक्यात कोणी काय भरवले आहे. आई मी काही ही बोलले नाही यांना पूजा किचन मधून बाहेर येत म्हणाली. बोल संकेत शलाका म्हणाली. आई हल्ली रवी काका आपल्या घरी सारखा येतो . सोसायटी मधील लोक काय म्हणत असतील आपल्या माघारी. लोकांचे सोड संकेत तुला काय म्हणायचे ते स्पष्ट बोल. आई तू काका ला सांग सारखा येत जावू नकोस म्हणुन. संकेत रवि तुझ्या बाबांचा मित्र आहे त्यांच्या आजारपनात ख़ुप मदत केली त्यांनी. आता आपले काम संपले म्हणुन त्याला घरी येऊ नकोस सांगायचे हा आपला स्वार्थी पणा नाही का? त्याला त्याची फैमिली नाही एकुलती एक मूलगी लग्न करून गेली. आपल्या घरी येऊन त्याला जरा बरे वाटते .माणुस एकटे पणाला जास्त घाबरत असतो. त्याचा वेळ जातो म्हणुन तो येतो . आपल घर समजून येतो. मी ही एकटी असते आम्ही दोघ एकत्र वेळ घालवतो नाटक पहायला जातो . कधी बागेत फेरफटका मारतो यात चुकी चे अस काय आहे संकेत? आई पण लोकांच्या डोळ्यावर या गोष्टी लगेच येतात. संकेत लोकांना आज ही एक स्त्री आणि पुरुषाची मैत्री लवकर पचनी पड़त नाही भले मग ते दोघे कीती ही वयस्कर असो. स्त्री पुरुष एकत्र असले की काहीतरी यांच्यात चालू आहे असाच समज लोक करून घेतात. पण तुला काही वावग वाटत का सांग ? तू लहान होतास तेव्हा पासून रवि आपल्या कड़े येतो. मग आताच का हा प्रश्न तुला पडला? मी किंवा रवि काही चुकीचे वागताना किंवा करताना दिसलो का तुला? नाही आई पण राहुदे संकेत त्याला मध्येच तोड़त शलाका म्हणाली . तुझी इच्छा नाही ना कि रवि ने आपल्या घरी यावे मी सांगेन त्याला तसे. आणि पूजा सव्हताला एखादया गोष्टी बद्दल पुर्ण माहिती नसेल ना तर नवऱ्याचे कान भरु नयेत. शलाका इतके बोलून आपल्या रूम मध्ये गेली.इतके बोलून शलाका आपल्या रूम मध्ये गेली. डोळ्या समोर सगळा भूतकाळ दिसू लागला. शलाका आणि प्रमोद चे लग्न अगदी ठरवून बघुन झाले. मध्यम वर्ग कुटुंबात जन्मलेली शलाका घरात मोठी होती तिच्या नन्तर एक भाऊ आणि बहिन . शलाका शान्त आणि समंजस होती. पदवी पर्यंत तिने शिक्षण घेतले मग लगेचच एका नातेवाईकानी प्रमोद चे स्थळ सूचवले.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract