Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

4.0  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

सहजीवन (भाग २)

सहजीवन (भाग २)

3 mins
178


एका नातेवाईकानी प्रमोद चे स्थळ सूचवले. शलाका दीसायला नीट नेटकी छान बांधा,मोठे केस कोणाला ही आवडेल अशी आणि प्रमोद एकदम दिसायला राकट ठीक ठाक पण सरकारी नोकरी वाला होता.1980 च्या साली असे स्थळ सोडने मूर्ख पणा च होता. अस शलाका च्या आई वडिलांना वाटले . मूलीची पसंती तेव्हा इतकी विचारत घेतली जात नसे. शलाका ला प्रमोद इतका आवडला नव्हता. तिच्या मनीचा राजकुमार राजबींडा नसला तरी किमान स्मार्ट सुंदर असा होता. आई बाबा समोर तिचे काही चालले नाही उलट घरात एक व्यक्ति खायला कमी होईल ही त्यांची धारणा. कारण घरची परिस्थिति जेमतेम होती. मग लवकरचा मुहूर्त बघुन शलाका आणि प्रमोद चे लग्न झाले. प्रमोद कामा निमित शहरात होता बाकी गावा कड़े आई वडील; भाऊ बहिन सगळे होते. लग्न झाल्यावर 15 दिवस शलाका गावी राहिली. पहिल्या रात्री ची शलाका ची ख़ुप स्वप्ने होती . प्रमोद तिच्याशी गप्पा मारेल तिच्या आवडी निवड़ी जाणून घेईल तिला पुढे अजुन शिकायचे होते ते ती त्याला सांगेल. तो तिला हळूवार फुलवत प्रणया च्या उत्कट क्षणा पर्यंत नेइल. आपण ही त्याच्या बाहुत अलगद सामावून जावू. पण या पैकी काहीच घडले नाही. ती त्यांच्या खोलीत आली तेव्हाच तीची निराशा झाली. साधी रूम गावा कडची पण जरा सुद्धा सजवली नव्हती. लग्ना नन्तर ची पहिलीच रात्र का आपली असा प्रश्न तिला पडला. ती छान तयार होऊन प्रमोद ची वाट बघत बसली. प्रमोद आत आला. कपड़े बदलून तिच्या बाजूला बसला शलाका मला माझ्या बद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत.

हा बोला मी ऐकते आहे ती म्हणाली. मला प्रत्येक गोष्ट वेळे वर आणि निट नेटकी लागते. कामात चुकार पणा चालणार नाही. माझे आई बाबा जेव्हा जेव्हा आपल्या कड़े येतील तेव्हा त्यांचा पाहुणचार व्यवस्थितच झाला पाहिजे. मला न विचारता कोणतीच गोष्ट करायची नाही. मला जसे आवडेल तसेच  वागायचे. मला राग पटकन येतो त्यामुळे माझ्या मर्जी विरुद्ध वागणे मला चालणार नाही. अस बरेच काही तो सव्हता बद्दल सांगत राहिला पण तुला काय आवडते हे एका शब्दाने ही त्याने शलाका ला विचारले नाही. तू माझी बायको आणि मी नवरा या अधिकाराने त्याने तिचा उपभोग घेतला त्यात जरा सुद्धा हळूवार पणा ,नाजुक पणा किंवा तरल प्रेम भाव नव्हता. तिच्या मनाची भावनां ची पर्वा न करता तो फ़क्त तिला ओरबाडत राहिला. शलाका निमुट पणे त्याला सहन करत राहिली डोळ्यात पानी जमा झाले होते. तिच्या स्वप्नाचा चुराडा झाला होता. रोज असच ती त्याला निर्विकार पणे सहन करत राहायची . तो मात्र सव्हता तृप्त होऊन शान्त झोपी जायचा. गावी; 15 दिवस राहुन ते दोघे शहरात आले. प्रमोद ने एक तीन रूम चे घर विकत घेतले होते. शलाका ने आपल्या पसंतीने घर सजवन्याचे ठरवले पण पैसे खर्च करण्याची काही ही गरज नाही आहे असे घर छान आहे अस बोलून प्रमोद ने तिला काही ही करू दिले नाही. तो कीती अरसिक आहे याची शलाका ला पदोपदी जाणीव होत होती. शलाका संध्याकाळी तो यायच्या आधी छान तयार होऊन बसायची कारण त्याची सक्त ताकीद होती की तीन निट नेटके दीसायला आणि राहायला हवे पण फ़क्त त्याच्या पुरते. बाहेर किंवा शेजारी कुठे ती जाणार असेल तर जास्त नटने ,तयार होणे याची तिला परवानगी नव्हती. त्याच्या साठी शलाका फ़क्त बायको होती कधी ही त्याला अवेलेबल असणारी हक्काची शय्या सोबती.

(क्रमश)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract