Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

सहजीवन (भाग ४)

सहजीवन (भाग ४)

3 mins
234


आपलं काम साधून घ्यायला गोड कस बोलायचे हे तिला चांगले माहीत होते त्यात प्रमोद तिचा सिनियर मग त्याला धरून राहणे तिला भाग होत. जाताना परत रवी ने शलाकाचे कौतुक केले प्रमोद ला बोलला वाहिनी ना घरी घेऊन ये. अगदी सरळ आणि साधा असा रवी चा स्वभाव होता त्यामुळे शलाका शी त्याने बोलणे प्रमोद ला काहीच मॅटर करत नवहते.

प्रमोद आता ऑफिस मध्ये नेहा सोबत जास्तच मोकळे पणा ने वागत होता. ती ही त्याच्या सोबत चहा ,कॉफी घ्यायला बिनधास्तपणे जात असे. पुरुषांना आपल्या सौंदर्याच्या तालावर कस नाचवायचे हे नेहा ला चांगले ठावुक होते. प्रमोद आणि नेहाची वाढती जवळीक रवि च्या लक्षात आली होती. प्रमोद सतत शलाका आणि नेहा ची तुलना करत राहायचा. रविकांत चा लग्नाचा वाढदिवस होता म्हणुन त्याने प्रमोद आणि शलाका ला घरी जेवायला यायचे आमंत्रण दिले. रवि ची बायको निर्मला आणि शलाका ची चांगली मैत्री झाली. त्यांना ही एक मुलगा होता . काही मदत लागली तर हक्काने सांगत जा अस निर्मला शलाका ला बोलली. जेवण वैगेरे करून प्रमोद आणि शलाका घरी आले . दुसऱ्या दिवशी प्रमोदला ऑफिस कामा साठी बाहेरगावी जायचे होते. तो शलाकाला म्हणाला की काही वाटले तर रवि ला फोन कर दोन दिवसांनी तो परत येणार होता. शलाका कधी असे एकटी राहिली नव्हती. त्यात आता सानु ही होती तिला भीती वाटत होती ती प्रमोद ला म्हणाली अहो तुम्ही बाहेरगावी जाणार तर मी माहेरी जावू का ? मला एकटीला राहायला भीती वाटते. काही गरज नाही कुठे जायची आणि कसली भीति ? कीती तरी बायका अशा एकटया राहतात आता तू ही सवय करून घे. मला वरचेवर असे बाहेर जावे लागणार. मग शलाका काही बोलू नाही शकली. प्रमोद गेला पन आता एकटी कसे राहायचे हा प्रश्न शलाका ला पडला. दिवस रोजच्या सारखा गेला पण रात्री एकटीला झोप येईल का ? अस तिला वाटू लागले. संध्याकाळी दाराची बेल वाजली कोण आले असेल या कल्पनेनेच शलाका घाबरली . प्रमोद ने तिला एकटी ला कुठे सोडले नव्हते आणि बाहेर ही सव्हता सोबत नेत होता. फ़क्त घर हेच तीच विश्व होते . प्रमोद चा विक्षिप्त स्वभाव त्यामुळे शलाकाच्या कोणी मैत्रीणि ही नव्हत्या. भीत भीत तिने दार उघड़ले तर समोर रवि ओह भाऊजी तुम्ही या आत या म्हणत शलाका दरवाज्या पासून बाजूला झाली. काही नाही वहिनी आज प्रमोद घरी नाही म्हंटले तुमचे काही काम असेल तर बघुन यावे म्हणुन आलो. प्रमोद ही बोलला मला की शलाका घरी एकटी आहे तेव्हा लक्ष दे. बर झाले तुम्ही आलात मला एकटीला कंटाळा ही आला होता. चहा करते म्हणत शलाका किचन कड़े गेली तर तिच्या मागोमाग रवि ही आला त्याला बघुन तिने विचारले काही हवे आहे का? नाही असच आलो तुम्ही चहा करा मी गप्पा मारतो चालेल का तुम्हाला? हो भाउजी चालेल. मग रवि तिच्याशी ख़ुप विषयावर बोलत राहिला. चहा घेत दोघ ही गप्पा मारु लागले. वहिनी तुम्हाला काय आवडते म्हणजे छंद काय तुमचे? रवि ने विचारले तसे शलाका बोलली तसे विशेष काही नाही आवडत पण पुस्तक वाचायला आवड़तात . कॉलेज मध्ये असताना वाचत होते नन्तर लग्न झाले आणि वेळ मिळेनासा झाला. यांचा स्वभाव तुम्हाला माहित आहेच त्यांना सगळ निट नेटके लागते मग कामातच वेळ जायचा. मला ही वाचन आवडते माझ्या कड़े काही पुस्तके आहेत मी उद्या घेवून येतो तेवढेच वाचन होईल तुमचे. हो चालेल मी वेळ काढून नक़्क़ी वाचेन. मग इतर ही बऱ्याच विषयावर त्यांच्या गप्पा झाल्या. सानु शी ही रवि थोड़ा वेळ खेळला. वहिनी मी निघतो आता काही काम असेल तर नक़्क़ी फोन करा.तो जायला निघाला तसे शलाका एकदम उदास झाली. रवि ने ते ओळखले वहिनी एकटया रहाल ना? का मग माझ्या सोबत घरी येता निर्मला ला ही छान वाटेल. नको नको मी राहिन आणि तुमच्या कडे आलेले यांना नाही आवड़नार. बर दरवाजा निट लावून घ्या आणि कोणाला ही दरवाजा उघडू नका. रवि मग निघाला. शलाका ने जेवण केले सानु ला ही भरवले. तिला रवि सोबत घालवलेली संध्याकाळ आठवत होती. प्रमोद कधी ही असा रवि सारखा तिच्याशी गप्पा मारत नसे किंवा तुला काय आवडते हे ही कधी त्याने विचारले नव्हते. बायको ही फ़क्त घरकाम करायला आणि सव्हताला हवे तेव्हा हवे तसे शरीर सुख भोगायला असते हिच प्रमोद ची मानसिकता होती.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract