Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Abasaheb Mhaske

Abstract Tragedy


3  

Abasaheb Mhaske

Abstract Tragedy


तुझं असणं - नसणं

तुझं असणं - नसणं

2 mins 16.4K 2 mins 16.4K

तुझं असणं- नसणं दखलपात्र तसं क्लेशदायकही ... माझं समग्र जीवनंच व्यापून टाकलंस तू ... नकळत माझ्याही मला हिरावून घेतलंस अगदी माझ्यापासूनसुद्धा ... कधी आठवणीतून तर कधी प्रत्यक्ष संवादामधून आपले सूर जुळले मनीचे ते कळलेच नाही. मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुतून बसलीस तू ... तुझे हसणे - बोलणे ... नात्यांना आपुलकीने माणुसकीच्या तराजूतून सहजच तोलणे सारं - सारं विलक्षणच ... माझ्या नकळत तू माझा जगण्याचा भाग झालीस .. अन माझं जीवनच बदलून गेलं ... तू रंग भरले जीवनात सुखाचे क्षण दिले ... नातं तुझं माझं नात्यांच्या पलीकडचं ... ओढ अनिवार जशी गगनास वसुंधरेची ... तीच ओढ सदोदित सरितेची जणू सागरास मिलनास आतुर ... तू आलीस ... गेलीस तुझ्याच मर्जीने ... त्या निर्णयात मी कुठे होतो ? माहित नाही कदाचित तू मला गृहीत धरलं असावं बहुदा . आभाळ भरून आलं म्हणजे आपसूकच सारं आठवत जातं... ते इवलंसं घरटं.... ती चिमुकली पावलं .. ते रुसवे फुगवे ... ते आनंदी जगणे ... तुझी वाट पाहणे .. माझे सारे बहाणे अन भानावर येऊन आताचे हे जगणे लाजिरवाणे... वास्तव जग खरंच कधी कधी खूपच जीवघेणं, क्लेशदायक असतं ... सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अवघड जागेच्या दुखण्यासारखं काहीसं ..

कधी कधी वाटत तू आणि तुझ्या आठवणींचा पाऊस सगळं - सगळं साफ खोटं ... मायावी, नाटकी, आभासी, क्षणभंगुर ... तोडून टाकावेत हे सारे पाशबंध ... फेकून द्यावीत ती जळमटंं. त्या जीवघेण्या आठवणी मुळासकट उपटून फेकून द्याव्यात ... तो नकोस भूतकाळ मिटवून वर्तमान सुकर करून उज्वल भविष्याची झेप घ्यावी ... पण ... मी हताश, निष्प्रभ होतो ... नाहीच मिटवता येत ते मंतरलेले दिवस ... त्या हव्याहव्याशा तर कधी नको असलेल्या आठवणी. खरंच किती बरं झालं असतंं कम्प्युटरसारखं माणसाचं मन, फॉरमॅट करून रिफ्रेश करता आलं असत तर ? नको असलेली माणसं, त्यांच्या आठवणी टाळता आल्या असत्या ... किती बरं झालं असतं असं झालं असतं ... सभोवतालची स्वार्थी, संधीसाधू माणसं ओळखण्याच्या यंत्राचा शोध लागला असता तर किती तरी अनर्थ टळले असते नाही ? माणूस इतर प्राण्यांपेक्षा दोनच गोष्टी जास्त शिताफीने करतो ते म्हणजे कुत्सितपणे हसणे आणि स्वार्थासाठी दुसऱ्याला फसवणे ... म्हणून तर तो स्वतःच विनाशाकडे वाटचाल करीत आहे .. हे ही तितकंच खरं आहे. समाज हा व्यक्तिविकासाठी निर्माण झाला असला तरी समाजातील लोक स्वार्थी बनल्याने व्यक्तिविकासास पूरक कार्य होऊ शकत नाही. माणसं खचलेल्या माणसास धीर देणे सोडाच पण त्याला आणखीनच नैराश्याच्या खोल दरीत ढकलतात, सरड्यासारखे रंग बदलतात .. सरडा तरी बिचारा स्वरक्षणासाठीच भीती दाखवण्यासाठी रंग बदलतो. पण माणूस स्वार्थासाठी वाट्टेल ते कुकर्म करून स्वतःच्या पायावर धोंडा पडून घेत आहे. हे त्याला जेव्हा कळेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल हे नक्की.

तुझं असणं - नसणं तुझ्यावरच अवलंबून आहे हे लक्षात ठेव .....


Rate this content
Log in

More marathi story from Abasaheb Mhaske

Similar marathi story from Abstract