सुरेल आशा
सुरेल आशा
"ऐका, कुणी तरी गात आहे."
"असेल कुणी भिकारी. इथ रेल्वेत आणखी कोण गाणार?"
"असू द्या हो, पण आवाज गोड आहे. बघा ना कुठून आवाज येतोय?"
"प्लॅटफॉर्मवर एक मुलगी नि बाई आहे. बाई आंधळी आहे आणि पोरगी गातेय. दोघी भीक मागत फिरत आहेत."
"बोलवा ना त्यांना."
"तुला वेड लागलंय का? म्हणे बोलवा!"
"अहो, मुलीचा आवाज खूपच गोड आहे. तिच्या आवाजाचे सोने होते का बघुया."
"नको असलेले उद्योग नकोत आपल्याला. आपण करायला जाऊ एक, आणि त्याचं भलतच होईल. मग नकोच तो व्याप आपल्याला."
"तिला बोलवा तर खरं. मी बघते काय करायचे ते नंतर."
"तू ना महा हट्टी! आपलं तेच खरं करणार. कर काय करायचे ते."
"ए पोरी, इकडे ये. ह्या डब्याकडे ये. बाईसाहेबांना तुझं गाणं ऐकायच आहे."
"घे, आल्या बघ दोघी जणी."
"बाळ, तू छान गाणे गाते. कुणी शिकवलं तुला?"
"कुणी भी नाही. ऐकलेली गाणी पाठ झली. तिच म्हणते. तुमच्या सारखे लोक खूश होवून दोन-पाच रूपये देतात."
"माझ्या आवडीचे गाणे म्हणशील?"
"कुठलं तुमच आवडीचं गाणं बाईसाहेब?"
"देवा दया तुझी की....."हे म्हणशील?
"हो, म्हणते."
"हे बघ, तुझ्या गाण्याचा मी विडिओ करणार, तेव्हा माझ्या मोबाईलकडे बघून तू गाणे म्हणायचे."
"हो बाईसाहेब. बरेच जण माझे विडिओ काढतात. आता तुम्ही काढला की मला दाखवा हं."
"हो बाळा. नीट आणि छान गा हं."
"हं, आता बघ तुझा विडिओ आणि ऐक तुझे गाणे."
"वाह बाईसाहेब! मी पहिल्यांदाच बघितले मला गाताना!"
"आता सगळे लोक बघतील तुला."
'मी हा विडिओ वायरल करणार. मग तुझा आवाज आवडला की सगळे तुझं कौतुक करणार. तुला लोक ओळखायला लागणार."
"मला सांग बरं, तुम्ही कुठे राहता?"
"स्टेशनच्या पलिकडे झोपडपट्टी आहे. तिथे राहतो."
"बरं, तुझ नाव सांग बरं बाळा."
"माझे नाव संगीता."
"वाह! आवाजा सारखं नाव सुद्धा संगीता. छान छान!"
"तुमच्याकडे कुणाचा फोन नंबर वगैरे आहे का?"
"आहे की. झोपडीतल्या त्या दादाचा नंबर मला पाठ आहे. ते दादा खूप मदत करतात. त्यांनीच दिला आहे. तोच घ्या तुम्ही"
"हं सांग."
"हं घेतला. मी तुला ह्या फोनवर कळवीन हं."
"आता हे घे तुझ्या गाण्याचे पैसे."
"शंभर! बाप रे, एवढे!"
"हो, तू खूपच छान गाणे म्हटले म्हणून तुला बक्षीस दिलंय मी."
"अगं पाया नको पडू. माझे आशीर्वाद आहेत तुला. मोठी गायिका हो."
"झालं तुझं काम? आता काय करणार?"
"तुम्ही सुद्धा मदत करू शकता त्या पोरीला."
"मी काय मदत करणार बाबा?"
"अहो, तुमचे ते मित्र वर्मा आहेत ना? त्यांची चांगली ओळख आहे ना संगीतकार अजय-सुजय कडे? संगीताचा विडिओ पाठवा त्यांना आणि अजय सुजयना ऐकवा म्हणावं. आवडला त्यांना तर संगिताचे नशीब उजळेल व त्याचे थोडे पुण्य आपल्यालाही लाभेल."
"बरोबर आहे. पोरीचा आवाज खूपच गोड आहे. मी आताच वर्माला फोन लावतो आणि सर्व नीट समजावून सांगतो. चला, शुभस्य शीघ्रम्."
"हॅलो. हॅलो, वर्मा."
"कौन? पंकज? आज क्यों याद किया भाई? सब ठिक है ना?"
"सब एकदम ठीक है। मेरा एक काम करोगे?"
"बिलकुल करुंगा। काम बताओ। भला मैं कौन होतं हूं मना करने वाला!"
"अरे, मैं और शारदा बेंगळुरू जाने के लिए ट्रेन में बैठे थे। तभी एक मिठी सुरीली आवाज हमारे कानों पे पड़ी।गानेवाली एक भिकारन की छोटी बेटी थी। उसका नाम संगिता है। शारदाने उस लडकी का विडिओ बनाया है। वही विडिओ आपको भेजता हूं। आपको अच्छा लगे तो आपके दोस्त, संगीतकार अजय-सुजयजी को भी सुनाओ। कुछ भला होता हो उस लडकी का तो होने दो।
"हां, हां, जल्दी भेजो। अभी मैं अजय-सुजयजी के पास ही जा रहा हुं।"
"शारदा, मला विडिओ फॉरवर्ड कर लवकर."
"अहो, नेट स्लो आहे. वेळ लागेल."
"चालेल. वर्मा अजय-सुजयकडेच चाललाय."
"नशीब हो पोरीचे! नेट नाही म्हटले होते, पण झाला बघा अपलोड विडिओ. तुम्हाला पोचला पण."
"हो. मी पण पाठवतो वर्माला."
"अजय-सुजयला आवडू दे रे बाबा संगिताचा विडिओ. भलं होऊ दे तिचं. पोरीचा विडिओ पाठवणार म्हटल्यावर किती खुलला होता तिच्या आंधळ्या आईचा चेहरा!"
"सांगता येत नाही. कितीही चांगलं असलं तरी नशिबाचा भाग असतोच."
"बघू. मनात सकारात्मक विचार ठेऊ."
"हॅलो, संगिताचे दादा का?"
"हॅलो, कोण बोलतंय?"
"मी मुंबईची शारदा. आज सकाळी रेलगाडीत मी संगिताचा गातानाचा विडिओ काढून अजय-सुजय यांना पाठवला होता. त्यांना तो फार आवडला. आता तिचा प्रत्यक्ष आवाज ऐकून रेकॉर्डिंग करून घ्यायचे आहे त्यांना."
"अरे वाह! छानच की ताई."
"हो, आता मी बेंगळुरला चाललेय. चार दिवसांनी परत येणार. तेव्हा तुम्ही संगिताला घेऊन आमच्याकडे या. मी पत्ता पाठवते."
"बरं ताई, पत्ता पाठवा आणि तुम्ही मुंबईला पोचलात की कळवा. मग येतो घेऊन संगिताला. तिची तयारी पण करतो थोडी."
"कसली तयारी?"
"तिला एक फ्रॉक व चप्पल तरी घेतो ताई."
"तू नको करू काळजी दादा. मी करेन तिची ती तयारी."
"ओके ओके ताई. खूप खूप धन्यवाद."
"हं, तुझ्या मनासारखे होते आहे तर! तिच्या आईपेक्षा तूच खूप खुश झालेली दिसतेस."
"तुमचं काही तरीच हं."
"बेंगळुरू हुन परतताना वर्मांना एकदा फोन लावून कन्फर्म करा हं."
"हो तर. त्याचाच येईल बघ फोन."
"अग, वर्माचा फोन आला होता. येत्या सोमवारी अकरा वाजता यायला सांगितले त्यांनी."
"बर, मग शनिवारीच संगिताला आपल्याकडे घेऊन यायला सांगते तिच्या दादांना."
"तिच्यासाठी कपडे वगैरे घ्यायला लागतील. रुपाने गोड आहे पोरगी. चांगले कपडे घातल्यावर छान दिसेल."
"भाग्य उजळू दे पोरीचे."
"तू घेतली ना जबाबदारी, मग नक्कीच उजळेल हो."
(ठरल्या प्रमाणे संगिताच्या आवाजाचे रेकॉर्डिंग झाले. ते अजय- सुजयला फार आवडले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिचे त्या गाण्याने नाव झाले. नंतर वाडेकर सरांनी तिला आपल्या गुरूकुलात ठेऊन शास्त्रीय संगीताचे धडे दिले. शेवटी संगिता एक प्रख्यात गायिका म्हणून नावलौकिकाला आली. सगळी कृपा शारदाची व तिच्या नवऱ्याची.)