भुताटकी
भुताटकी
गावातली काही जुनीगावातली घरे एकमेकांपासून दूर अंतरावर असत. प्रत्येक घरा समोर बाग बगीचा, मागे परसदारी भाजी-पाला, केळी, पपयांची लागवड. तसेच नहाणी घराला टेकूनच प्रत्येक घराची विहीर. घरात भल्या मोठ्या खोल्या व त्यावर ऐसपैस माड्या. दुसऱ्या दिवशी ती गोष्ट त्यातल्या एकाला आठवली व त्याने ती आपल्या बायकोला सांगितली. तेव्हा बायको त्याला म्हणाली, "दिवसभर दारू ढोसत असता मग स्वप्ने सुध्दा तशीच बघत असाल. चला उठा आणि कामाला लागा."
आता मोडके घर अजूनही तिथे तसेच आहे. पाणी आटलेली खोल विहिरही आहे. विहिरीवर फळ्या ठोकून ती आवाज येतात असे ते सांगू लागले. प्रत्येक जण वेगवेगळ्या अफवा पसरवू लागला. काही म्हणाले "आम्हाला तिथे खोदकाम करत असल्याचे आवाज येत होते. रात्रीच्या दोन तीन वाजता तिथून कणी ओरडल्याचा ही आवाज येत होता. तर कधी भांडणाचे ही आवाज येतात. बाईच्या रडण्याचा ही आवाज येतो."अशा गोष्टी त्या मोडक्या घरा बद्दल गावात लोक बोलू लागल्यावर मी त्या बाजूने फिरकायचे ही बंद केले. नाही तरी मी भि बंद करण्यात आली आहे. त्यात आता कुणी उडी मारून मरण्याची भिती नाहीशी झाली आहे. गावात विजेची सोय झाली आहे. घरी- दारी रस्त्यावर इलेक्ट्रिसिटी आल्याने, अंधार नष्ट झाल्याने आता भुताखेतांवर लहान मुले सुध्दा विश्वास ठेविनाशी झाली आहेत.
घरात कुणी राहत नसल्यामुळे मोडकळीस आली होती. अशा घरातले लोक शहरात राहायला गेले होते. त्यांचे आईवडील गावात राहत होते. तेव्हा सणावाराला लेकरं येत होती, पण आईवडीलां नंतर मुले आपल्या वाडवडिलांच्या घराकडे पाहिनाशी झाली. नोकरांवर घणार कसं? नोकरांनी घराचा उपयोग करून घेतला, पण त्याची निगा न राखल्याने घराची दुर्दशा झाली होती. माकडांनी कौलांवर धुमाकुळ घालून कौलांची नासधूस केल्याने पावसाचे पाणी घरात गळून घराची दयनीय दशा झाली होती.
एकेकाळी तिथे माणसांचा गजबजाट असायचा. पण अशा घरांची निगा न घेतल्याने ती मोडकळीस आल्यावर एक एक भिंत कोसळू लागल्याने अशा घराकडे कुणी फिरकत नसे. गावातले लोक अशा ओसाड घरावर भूताच्या गोष्टी रचून एकमेकांना सांगू लागले होते.
"माझ्या ग्लासात ओत रे अजून"
माझ्या लहानपणची गोष्ट आज ही आठवली तर अंगावर काटा येतो. माझे लहानपण गोव्यातल्या एका खेडेगावात गेले. आमच्या घरा पुढे वर सांगितल्या प्रमाणे मोडकळीला येऊन घराच्या फक्त दगडाच्या भिंतीच उरल्या होत्या. अतिशय खोल पाणी असलेली विहीर मागच्या बाजूला तर समोर भव्य अंगण व त्या मधोमध दगडांनी बांधलेले तुळशी वृंदावन होते. त्या वृंदावनात तुळस नसून बोराचे भले मोठे झाड उगवले होते. ऋतू नुसार त्या झाडाला आंबट गोड खूप बोरं लागायची. सकाळी व संध्याकाळी बोरांचा थर त्या अंगणात साठायचा. बोरं वेचण्यासाठी आम्हा सगळ्या मुलांची चढाओढ लागायची. पण एक मात्र खरं, त्या जागेत एकटं असं कुणी जात नसे. कारण तिथलं वातावरण भितीदायक होतं. त्यामुळे सगळी बोरं आपल्यालाच मिळावी असं जरी वाटलं तरी दोन चार जण मिळूनच तिथे जात होतो.
माझ्या घराच्या मागील दारातून गेले तर ते बोरांचे अंगण अतिशय जवळ होते. तर पुढील दारातून तिथे जायला लांब फेरा पडायचा. आम्ही मुलं पुढच्या दारातूनच जात होतो.
वेचून गोळा केलेली बोरे शाळेत मधल्या सुट्टीत सर्व मैत्रिणींना देऊन खाण्यात एक मजाच असायची. मी बसने तालुक्याच्या शाळेत जात होते. तिथल्या मैत्रिणींना बोरे द्यायला मला खूप आवडायचे.
एक दिवस मी उसना धीर एकवटून सकाळी माझ्या घराच्या मागच्या दारातून बोरे वेचायला गेले. मनात भिती होतीच तरी नेटाने मी बोरे वेचू लागले. इतक्यात माझ्या अंगावर टपटप बोरांचा पाऊस पडला. मी वर बघितले तर झाडाची एकच फांदी जोर जोराने हलत होती. बाकीचे झाड शांत. माझी बोबडी वळली. मी तिथून धावायला लागले तर खाली पडलेले पाला-पाचोळ्यातले काटे माझ्या पायात रुतले व पाय रक्त बांबाळ झाले. माझी पावले तिथल्या तिथेच घुटमळू लागली. जरासुध्दा वारा नसताना फांदी एवढी हलत होती म्हणून मला तिथे ती भुताचीच करणी असावी असे वाटले.
मला जाग आली तेव्हा मी माझ्या घरी अंथरुणात झोपले होते. त्या दिवसाची माझी शाळा चुकली. मला सणकून ताप भरला होता. आईचे शब्द कानावर पडले.
"सकाळी सकाळी तिथे मरायला कां गेलीस? तात्यांनी बघितले म्हणून बरे झाले, त्यांनी तुला उचलून आणले. नाही तर तिथेच तुझा प्राण गेला असता."
तिथे काय झाले होते हे मी कुणाला सांगितले नाही पण पुन्हा तिथे बोरे वेचायला कधी गेले नाही.
लहानपणी काही ऐकले अथवा दृष्ये पाहिली तर त्याचा बाल मनावर फार परिणाम होतो. माझे ही तसेच झाले होते.
आमच्या शेजारच्या घरातली एक वयस्कर बाई त्या मोडक्या घराच्या विहिरीत सापडली होती म्हणे. कोणी म्हणायचे घरातल्या लोकांनीच तिला मारून विहिरीत टाकली व बुडून मेली असे सांगितले. खरे खोटे माझ्या बाल मनाला माहीत नव्हते. पण त्या विहिरीकडे जायची मला जाम भिती वाटायची. त्या विहिरीत बऱ्याच बायका उडी मारून मेल्या हे कळल्यावर त्या वाटेने जाणे हे भयंकर भितीदायक होते.
तेवढ्यात समोरून आमच्याकडे काम करणारी बाई येताना मला दिसली. तिला बघितल्या बरोबर माझ्या जीवात जीव आला आणि धावत जाऊन मी तिच्या कुशीत शिरले नि रडायला लागले.
"एवढी घाबरली कशापायी बाय? घाबरू नको. कोण भी नाय इथं." असे म्हणून तिने मला जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवला.
"चल मी घरी नेऊन सोडते तुला." असे म्हणून मला घेऊन ती आमच्या घराकडे परतली. तिने माझ्या आईला तिथला वृतांत सांगितला. "तिन्ही सांजेच्या वेळी तिथून का आलीस तू भित्री भागुबाई?" असे म्हणून मला आईसकट सगळी चिढवायला लागली. नंतर नंतर तर मला सरसकट सगळेच भित्री भागुबाई म्हणू लागले.
ूर्वी गावी विजेची सोय नव्हती. पेट्रोमेक्स, कंदील व मंद वातीचे लामणदिवे लावत असत. आमच्याकडे लामणदिवे पडवीत लावलेले असायचे व दिवाणखान्यात कंदिल लटकवायचे. तसेच पेट्रोलचे वातीचे दिवे होते. ते हातात धरून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी वापरायचे. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या ही लक्षात येऊ लागली. रात्रीच्यावेळी तिथून रहदारी करणाऱ्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट पहिल्यांदा आली. त्याचे काय झाले, एका रात्री दारूच्या नशेत असलेले दोन मित्र तिथू पण कितीही सांभाळून धरला तरी कधीतरी वाऱ्याच्या झोक्याने तो दिवा विजायचा व अशावेळी माझी बोबडी वळायची आणि त्यामुळे मला भित्री भागूबाई हेच नाव पडले.
पडक्या घरातली भूताटकी हळू हळू तिकडून
ती नवऱ्याला असे जरी बोलली तरी तिला जरा संशय आलाच. तिने ती गोष्ट तिच्या नवऱ्याच्या मित्राच्या बायकोच्या कानावर घतली. तेव्हा ती सुद्धा "माझ्या नवऱ्याने पण हेच सांगितलं" असे म्हणाली. नंतर ती गोष्ट भुताटकीच असेल असे सारा गाव बोलू लगला. बाकीच्या लोकांना ही बऱ्याच वेळा रात्री तिथून वेगवेगळेत्रीभागुबाई ना!
दिवसेन दिवस मोडक्या घराची भुताटकी वाढतच चालली होती. रात्री तिथून कुणी फिरकत नव्हतं पण आता भर दिवसाही तिथून कुणी फिरकेनासे झाले. दोन्ही बाजूनी वाट अडवून त्या विहिरीकडे जाण्या येण्याची वाट बंद करून टाकली होती. पण आवाज मात्र लोकांना येत होतेच. अगोदर फक्त रात्रीच येत होते पण नंतर ते भर दिवसाही येऊ लागले.
आजूबाजूच्या गावातल्या लोकांना सुद्धा हा चर्चेचा विषय झाला होता. गावातले सगळे पुरूष घटनास्थळी जमले. याची देही याची डोळा सगळा वृतांत पाहिला. भुताटकीचे घर हे भूताचे नसून चोरांचा अड्डा होता हे कळल्यावर सर्वांच्या मनातली भुताची भिती नाहिशी झाली.
गावाचे नाव सुद्धा 'भुताटकी गाव' पडले. अशिक्षित मागासलेली माणसे भूताखेतांवर विश्वास ठेऊ लागली व अंधश्रद्धेची बळी ठरली. गावातल्या शिक्षीत मुलांना हे मुळीच पटेनासे झाले. त्याच प्रमाणे बाजुच्या गावातली शिकलेली पोरं सुद्धा विश्वास ठेविनाशी झाली. म्हातारी कोतारी बुवाबाजीच्या आहारी जाऊन मुला-बाळांना गंडे दोरे बांधून भुतांपासून संरक्षण करू लागली. तिन्ही सांजे नंतर घराबाहेर कुणी पडेनासे झाले. पोरी बाळी सुद्धा माहेराला येईनाशा झाल्या.
तरूण शिकलेल्या मुलांना गावातल्या म्हाताऱ्यांचा राग येऊ लागला. पण त्यांना बोलता येत नव्हते. मग सगळी शिकलेली मुले एकत्र आली. शेजारच्या गावातली मुले सद्धा ह्यात सामील झाली. त्यांनी सर्वांनी मिळून एक योजना आखली.
शिकलेल्या मुलांचा भुताखेतांवर अजिबात विश्वास नव्हता. त्या मोडक्या घरात काहीतरी गडबड असणार आणि त्याचा शोध लावायलाच हवा असे त्या तरुणांनी ठरवले.
मध्य रात्री तिथून आवाज येतात त्याचा शोध लावायचाच असा विचार करून सर्व तरुणांनी मध्य रात्रीच त्या मोडक्या घराकडे त्यांचा मोर्चा वळवला. स्वसंरक्षणाची तयारीही त्यांनी केली होती. त्या घरा भोवती आणि झाडा झुडपात मुले संध्याकाळपासूनच दबा धरून बसली. काही संशय आला तर एकमेकांना संकेत द्यायचे हे ही नीट योजिले होते.
मारुती वॅन मोडक्या घरासमोर येऊन थांबली. आकाशात चंद्रमा होता. त्याचे चांदणे पसरले होते. झाडाझुडपा आडून मुले निरिक्षण करत होती. त्या वॅन मधून सात आठ जण उतरले. डीक्की मधून त्यांनी पेट्या काढल्या आणि दोघे दोघे ते घेऊन घरात घुसले. ते आपापसात कुज. तेव्हा त्यांना तिथे कुणीच दिसले नाही. पडक्या घराच्या सगळ्या बाजू बघितल्या पण त्या लोकांचा पत्ता लागला नाही. त्यांची वॅन मात्र बाहेर होती. म्हणजे ते तिथेच असायला हवेत. पण कुठे गायब झाले त्यांना काही कळले नाही. एवढ्यात पुन्हा कुजबूज करून बोलण्याचा आवाज आला. त्या बरोबर मुले भराभर तिथून निसटली व बाहेर झुडपात पुन्हा लपून त्यांच्यावर नजर ठेवून बसली. बुज करून बोलत होते. त्यांचे काय बोलणे चालू आहे हे कळत नव्हते. नंतर खट् खट् असा आवाज आला व नंतर सगळे शांत झाले. दबा धरून बसलेली दोन पोरे पुढे सरसावली. काळी चादर अंगावर घेऊन त्या घरात शिरली..................................
विहिरीच्या मागच्या भिंतीकडून प्रकाश आला. त्यांचे बोलणे ही स्पष्ट ऐकायला येऊ लागले. सिगरेटचा वास, बाटल्यांचा आवाज येत होते. हसण्या खिदळण्याचे आवाज ही येत होते, जणू पार्टी रंगात आली होती असा जल्लोश होता.
"अरे, पूरे करा आता. निघायला हवे. गळे पुन्हा गाडीत बसून निघून गेले. "
अर्ध्या तासा नंतर त्यांचे आवरले आणि स
बाहेर दबा धरून बसलेली तरूण मंडळी सागळी एकत्र आली. त्यांना पक्क समाजलं गावात भुताटकी नसून हा ह्या लोकांचा गोंधळ होता. तरी मुलांना खात्री करून घ्यायची होती. त्यांनी बरोबर आणलेल्या पेट्या कुठे ठेवल्या? त्याचा शोध घेतल्या शिवाय पुढील कारवाई करायची नाही म्हणून ते रात्री तिथेच थांबले.
भुयाराच्या आतून खूप आवाज येत होता. त्या आवाजाचा कानोसा घेत पोलीस थांबले होते. सर्व पोलीस त्या भुयारा भोवती आप आपल्या बंदुका घेऊन तैनात होते. थोड्या वेळाने भुयारातून ते वर येत असल्याची चाहूल लागताच सगळे पोलीस व पोरे तिथून थोडे दूर आडोशाला लपून बसले. वॅन मधून आलेले सगळे बाहेर येई पर्यंत तिथे लपायचे व सगळे बाहेर आले की त्यांच्यावर झडप घालायची असे ठरले. एक जण भुयारातून बाहेर आला. वर आलेल्या माणसाने पेट्या खेचून वर घेतल्या. अशा चार पेट्या खेचून घेतल्यावर बाकीचे सगळे वर आले. दार लावून त्यावर पाला पाचोळा टाकून जागा पूर्ववत केली. त्यातला एक जण बाकीच्यांना उद्देशून म्हणाला, "चला रे, दोघे दोघे मिळून पेट्या नेऊन वॅनमध्ये ठेवा."
सगळे पेट्या उचलण्यात मग्न होते तेवढ्यात एका पोलिसाने बाकिच्यांना संदेश दिला. त्याबरोबर सगळे पोलीस चोरांच्या भोवताली गन रोखून उभ राहिले व वरिष्ठ अधिकारी जोराने ओरडला, "हँडस अप." सगळे चोर अचंबीत झाले. पण त्यातले दोघे तिथून नजर चुकवून निसटले व वॅनकडे त्यांनी धाव घेतली. आपली दोन चार पोरे वॅनकडे दबा धरून बसलीच होती. त्यांनी काळोखात त्या चोरांवर चादर टाकून त्यात त्यांना गुरफटून धरले. वॅनच्या चारी टायरची हवा सुध्दा पोरांनी काढून ते निकामी केले होते.