एलियन
एलियन


पृथ्वीपासून दूर असलेल्या काही ग्रहांवर जीवसृष्टी असून, तिथले लोक पृथ्वीवर येतात असं मानलं जातं. अशा परग्रहवासियांना ‘एलियन’ म्हटलं जातं.
एलियन्स एक रहस्यमय गोष्ट आहे. एलियन खरोखरच आहेत की उगीच बोललं जात आहे याचा अंदाज कुणी सांगू शकत नाही. अद्याप विज्ञानालाही एलियन्सचा प्रश्न उलगडता आलेला नाही. मात्र एलियन्सबद्दल अनेक सुरस कथा चर्चेचा विषय ठरतात. 'उडती तबकडी, रात्री बे रात्री आकाशातून चमकणारे वेगवेगळे चित्रे. तसंच मोकाट जागी किंवा रानीवनी सापडलेले अदभूत अवषेश व त्यावरून लोकांनी व शास्त्रज्ञांनी केलेले तर्क विवादावरून काहीच निष्पन झाले नाही. असे
अधूनमधून एलियन्स दिसल्याच्या, त्यांच्या खाणाखुणा आढळल्याचे दावे-प्रतिदावे केले जातात.
चित्रपटातून काल्पनिक एलियन्स आपण पाहिले आहेत.
'कोई मिल गया '. ह्या रितीक रोशनचा हिन्दी चित्रपट बहुतेकांनी पाहिलेला आहेच. तसे इ़ंग्रजी सिनेमा ही बहुतेकांनी पाहिले असतील. मात्र आजतागायत एलियन्स प्रत्यक्षात कसे दिसतात याचा ठोस पुरावा नाही. आता ह्या वर्षी 2022 च्या अखेरीस एलियन्स पृथ्वीवर येणार असल्याचा ठाम दावा एका टाईम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या व्यक्तीनं केला आहे. 2022च्या अखेरीस एलियन पृथ्वीवासीयांना भेटायला येतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप मोठे आणि भयंकर असतील, असंही या व्यक्तीनं म्हटलं आहे. त्याच्या मते मानव आणि एलियन्स यांच्यात भयंकर युद्ध होणार आहे. एलियन्सबद्दल अनेक प्रकारची माहिती त्यानं दिली असून, लोकांना ही माहिती अतिशय रोमांचक वाटत आहे.
दुसर्या ग्रहावरचे लोक अर्थात एलियन्स पृथ्वीवर येतील. पहिल्यांदाच ते पृथ्वीवर दिसतील. ते येताना शांततेनं येतील मात्र नंतर माणसाविरुद्ध युद्ध पुकारतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप वेगळे असतील. त्यांची उंची 7 फूट असेल आणि दिसायला अतिशय भयंकर असतील व आगामी काळात अनेक प्रकारचे एलियन्स पृथ्वीवर येतील आणि ते पृथ्वीवरच वास्तव्य करतील. त्यांना निरॉन्स म्हणून ओळखले जाईल असा दावा केला आहे.
असाही दावा केलाय की,अमेरिका एलियनविरुद्ध पहिल्यांदा युद्ध पुकारेल. तब्बल 7 फूट 4 इंच उंच आणि मोठी कवटी असलेले हे एलियन्स गडद राखाडी रंगाचे असतील. एकदा त्यांना युद्धासाठी चिथावल्यानंतर ते अत्यंत धोकादायक ठरतील, असंही या व्यक्तीनं म्हटलं आहे. पण,
अगदी ठामपणे एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल, त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाबद्दल दावा करणाऱ्या या व्यक्तीकडे याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत.लोक अनेक प्रश्न उपस्थित करत असून, एलियन्सची चर्चा जोर धरत आहे.
विज्ञानयुगात आपण कितीही प्रगती केली. अगदी आपण चंद्र, मंगळ आणि आंतराळातील विविध ग्रहांवर जरी जाऊन आलो तरी, अद्यापही कोणाला हा पत्ता लागला नाही की, या सृष्टीत अथवा सृष्टीबाहेर एलीयन्स आहेत किंवा नाहीत.
आपल्या विशाल ब्रम्हांडात Milky Way (Galaxy) एका Solar System चा पृथ्वी एक अंश या प्रमाणे अशा लाखो पृथ्वी असलेल्या ब्रम्हांडात कुठे ना कुठे सजीव प्राणी असू शकतात. अफाट असलेल्या universe मध्ये कुणी अंदाज लावू शकत नाही. जेथे महान शास्त्रज्ञांनी शोध लावले तरी ठोस असे काही त्यांना गवसले नाही. तिथे सामान्याचे काय!
वेगळं, विचित्र संशयास्पद सजीव काही नजरेत आले तर लगेच
दुसऱ्यांच्या नजरेत आणून देणे. सरकारच्या कानावर घालणे. मग त्यांचे ते बघून घेतील. अशा विचित्र गोष्टी बऱ्याच्यावेळा चर्चेत येतात. थोडा प्रसार होतो व पुन्हा सगळे शांत. एलियन्स आला तर काय करता येईल? प्रतिकार कसा करवा ? ह्याचा विचार मात्र प्रत्येकाने करून ठेवावा.