Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

4.0  

Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ९

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ९

5 mins
180


मेरीने दर्शविल्याप्रमाणे संभाने कार चालवली. थोड्याच वेळात ते पोलिस स्टेशनमध्ये पोहचले. सिनियर इनस्पेक्टरला भेटून संभाने त्यांना थोडक्यात सर्व माहिती सांगितली. आणि त्यांना सोबत येण्याची विनंती केली. त्या दोघांनी केलेल्या कळकळीच्या विणवनीमुळे आणि यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या हातात काही सबुत सापडतील या उद्देशाने इन्स्पेक्टर त्यांच्या सोबत येण्यास तयार झाले. 

    

चार हत्यारबंद पोलिसांना घेऊन इन्स्पेक्टर संभाच्या कारच्या मागे येऊ लागले. इन्स्पेक्टरने दूर असतानांच चालकाला गाडीचा सायरन बंद करण्याचे सुचविले होते. मेरीच्या घराच्या जवळपास एक किमी मागेच दोन्हीही गाड्या पार्क करून सर्व आवाज न करता सावधानतेने घराच्या अगदी जवळ अंगणात पोहचले होते. घराचा दरवाजा आतून बंद होता. संभाने हातानेच इशारा करून मेरीला आणि इन्स्पेक्टरला स्वतःमागे येण्याचा इशारा केला. इन्स्पेक्टरने एका पोलिसाला गेटजवळ उभे राहण्यास सांगितले. एकाला घराच्या दरवाजा समोर उभे केले आणि दोघांना सोबत येण्याचा संकेत केला. मेरीच्या रूमची पाठीमागील बाजूची काचेची मोठी खिडकी उघडीच होती. त्यामधून एकापाठोपाठ एक आवाज न करता रूम मध्ये उतरले. मेरीच्या रूमच्या लगतच पश्चिमेला मेरीच्या डॅडची रूम होती. सर्वजण दबक्या पावलांनी मेरीच्या डॅडच्या रूमच्या दरवाजा बाहेर भिंतीच्या बाजूने लपून उभे राहिले.आतमधील सर्व दृष्य आणि आवाज सर्वांना स्पष्ट ऐकायला येत होता. तीन पुरुष आणि एक महिला रूम मधील सोनं घाईघाईने बॅगमध्ये भरत होते. ओळखू येऊ नये यासाठी चौघांनेही तोडांला मास्क बांधले होते. त्यातील एक पुरुष मध्यमवयीन, उंच आणि धष्टपुष्ठ होता. दुसरा पुरुष त्यापेक्षा उंचीने थोडासा कमी आणि त्याचे शारिर वृद्ध्त्वाकडे झुकलेले होते. तिसरा पुरुष मध्यम उंचीचा परंतू लठ्ठ होता.आणि ती महिला तरूण वयाची व सडपातळ देहयष्टिची होती.

     

सोनं बॅगमध्ये भरता भरता उंच मध्यमवयीन पुरुष दुसऱ्या पुरुषा सोबत बोलू लागला. 


"हे सोनं प्राप्त करण्यासाठी आम्ही किती कष्ट केलेत. आमच्या आयुष्यातील भरपूर दिवस आम्ही वाया घालवले. एकापाठोपाठ एक असे दोन खूण केले.एक मि.जैकसन आणि दूसरा मि.जेम्सचा. इतक्या प्लॉनिंगने आम्ही दोघांचा अंत केला होता की,पोलिसांना आमचा मागमूसही लागला नाही. आणि मागमूस लागण्यासाठी मृत्यू तर संशयित हवा. त्या वेड्यांनी दोन्हीही खून आपत्कालीन म्हणून घोषित केले. बऱ्याच योजना करूनही शेवटी कष्टाचे फळ मिळाले नव्हते. परंतू आज सर्व कष्टाचे फळ मिळाले. यात तुमचा दोघांचाही महत्त्वाचा वाटा आहे. हे सर्व ऐकून तो वृद्ध पुरुष चिडलाच आणि रागात बोलू लागला,

"म्हणजे तु खूनी आहेस? तू तर म्हटला होता की, कुणाचाही जीव न घेता आपण सोनं प्राप्त करू. आणि म्हणूनच मी तुमची साथ द्यायला तयार झालो होतो. मला खरे माहित असते तर मी तुमची मदत नसती केली". 


तरूणी जरा रागातच त्या वृद्ध पुरुषाला बोलू लागली,

"ऐ म्हताऱ्या,जास्त आवाज नको करू. ह्या सर्व गुन्ह्यामध्ये तूच फसला जाशील. विनाकारण वेळ वाया घालवू नकोस. उचल ती बॅग आणि चालू लाग". 


तो म्हतारा अजूनच रागात बोलू लागला,

" गुन्ह्यात मीच फसेल म्हणजे काय? मी माझ्या हाताने एकही खून नाही केलेला".


त्यावर तो उंच पुरुष म्हणाला,

" अरे, एसीमध्ये उपकरण कुणी बसविले ? त्या उपकरणामुळेच तर जॅक्सन मेला". 


" परंतू तू म्हणाला होतास की याने फक्त सोनं कुठे आहे ते समजते". 

वृद्ध पुरुषाने प्रश्न केला. त्यावर इतका वेळ गप्प असलेला लठ्ठ व्यक्ती त्वेषाने बोलू लागला,

" ये तुमचे काय भांडणे असतील, ते नंतर सोडवत बसा. कुणी येण्याच्या अगोदर इथून फरार होऊ. एकतर आधी पण तुमच्या नकली चेहऱ्यांच्या नादात मी मॉरचुरी विभागात अडकलो असतो. पण वाचलो तिथून कसेतरी". 

    

सर्व हकिकत ऐकून झाल्यावर संभाने इन्स्पेक्टरला इशारा दिला. तसे इन्स्पेक्टर आणि दोन पोलिस आत मधील चौघांवर बंदूक रोखत रूम मध्ये घुसले. तश्याच अर्धवट भरलेल्या बॅगा उचलून वाट मिळेल तिकडे पळण्याचा ते प्रयत्न करू लागले. परंतू आता सर्व रस्ते बंद झाल्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. पोलिसांनी चौघांच्याही हातात बेड्या घातल्या. आणि त्यांच्या चेहऱ्यावरील मास्क काढले. समोरील तिघांकडे बघून मेरीच्या पायाखालची जमीन सरकू लागली होती. डोळे विस्फारले होते. तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. कारण तो लठ्ठ व्यक्ती सोडून,समोरील तिन्हीही व्यक्ति मेरीच्या जवळचे होते. ती तरुण महिला होती एलियाना, तो उंच मध्यमवयीन पुरुष होता डॉ. रॉबर्ट अंकल, आणि तो वृद्ध होता नोकर हेनरी. चौथा लठ्ठ व्यक्ती मॅडसनचा मित्र जासूफ होता. त्या तिघांना बघून मेरीची तळपायाची आग मस्तकात गेली होती. मेरी झपाझप पावले टाकत एलियाना जवळ गेली. कसलाही विचार न करता ताडकन तिच्या काणशिलात वाजवली. तशी एलियानाने शरमेने मान खाली घातली. रागाने तिचा गळा दोन्ही हातांनी पकडून तिला बोलू लागली,

" तू तर माझी मैत्रीन होतीस ना? का केलेस तू हे सर्व? तूला हे सर्व करताने एकदाही लाज वाटली नाही?” 

मेरीच्या एकाही प्रश्नाचे उत्तर एलियानाने दिले नाही. पोलिसांनी एलियानाचा गळा मेरीच्या हातातून मुक्त केला. हातात येईल त्या वस्तूने मेरी चौघांवर आक्रमण करू लागली. संभाने त्या चौघाही आरोपींना तिथून लवकर घेवून जाण्याची विनंती इन्स्पेक्टरला केली. 


“चलारे घेऊन ह्या चौघाही हरामखोरांना. आणि त्या बॅगापण घेऊन चला". 

इन्स्पेक्टरने करड्या आवाजात पोलिसांना फर्मावले. बॅगेतून काही सोनं काढून त्यांनी मेरीला मदत म्हणून दिले. खूनींना पकडून देण्यासाठी संभाने मदत केली. त्यामुळे त्याचे आभार व्यक्त केले.आणि आरोपींना घेऊन निघून गेले.

     

रात्री जेवण आटोपल्यानंतर संभा नेहमीप्रमाणे रासायनिक प्रयोग करत होता. मनातील अनेक शंकाचे निरसण करण्यासाठी मेरी संभाच्या रूममध्ये आली. प्रयोग करण्यात आणि वाचण्यात संभा आजही तल्लीनच होता. दुसऱ्या दिवशी संभा भारतात परत जाणार होता. त्यामुळे आपल्या शंका निरसन करण्यासाठी फक्त आजची रात्र आहे हे मेरीला माहिती होते. त्यामुळे न राहवून ती संभाकडे बघून बोलू लागली. 

“मि.संभा सर, मी तुमच्या कामात अडथळा निर्माण केला त्याबद्दल मला माफ करा. बऱ्याच दिवसांपासून अनेक विचारांचे ओझे मी वाहते आहे. तुम्ही मला योग्य तो न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. हे सर्व माझ्या आयुष्यात कसे घडले? जेम्स अंकलचा खून कसा झाला? त्यांचा मृत्यू तर सापाच्या दंशाने झाला हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले. डॉ.रॉबर्ट, एलियाना, आणि हेनरी कोण होते? त्यांचा आमच्या आयुष्याशी काय संबंध? ह्या घरात एवढे सोनं कुठून आले? आणि ह्या घरात भूतं का दिसत होती? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची माझी इच्छा तीव्र इच्छा आहे. कृपया करून मला सांगा. 

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Action