Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

3  

Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग १०

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग १०

4 mins
204


आज मेरीला सर्व काही सांगून टाकण्याच्या उद्देशाने संभाने पुस्तक ठेऊन दिले. आणि खूर्चित जाऊन बसला. मेरीला समोरच्या खर्चित बसण्याचा संकेत केला. मेरीही सर्व हकिकत जाणून घेण्याच्या उद्देशाने गंभीर होऊन समोरच्या खूर्चीत बसली. संभाने सांगण्यास सुरुवात केली. 


"तुम्ही ज्यावेळेस मला तुमची कहाणी सांगत होतात. त्याचवेळेस ह्या कहाणीच्या मुळापर्यंत पोहचण्याचा मी प्रयत्न करत होतो. तुम्ही अगोदर कॅमरेल ह्या छोट्याश्या गावात राहत होतात. तुमच्या डॅडकडे जास्त पैसे नसायचे. त्यामुळे त्यांना एखादया नोकरीची नितांत आवश्यकता होती. आणि त्यांना बागेतील कामाची नोकरी त्यांचे मित्र मि. जेम्स अंकल यांनी बघून दिली होती. म्हणजेच जेम्स अंकलला काम करण्याची काहीही गरज नव्हती. कारण गरज असती तर आधी ते त्या नोकरीवर रूजू झाले असते. नोकरीला लागण्याच्या नंतर थोड्याच दिवसात तुमच्या डॅडने कॉलिफॉर्निया सारख्या सुप्रसिद्ध ठिकाणी स्वतःची जागा घेऊन घर बांधणे आणि ते पण एका बागेत कामावरती जाऊन. ही गोष्ट माझ्या मनाला पटण्यासारखी नव्हती. नक्कीच कुठेतरी त्यांना भरपूर पैसा मिळाला असल्याची खात्री मला झाली होती. मि. रोनाल्डो नामांकित बँकेचे माजी कर्मचारी असल्याचे तुम्ही सांगितले होते. त्यामुळे त्यांच्याकडे बरेचसे धन किंवा पैसा असण्याची शक्यता मला जाणवत होती. त्यांचे धन चोरीला गेल्याचे रोनाल्डोंना समजले असणार. बागेत तर फक्त दोनच व्यक्ति काम करायचे एक तुमचे डॅड जॅकसन आणि दूसरे मि.जेम्स. चोरीचा संशय निश्चितच ह्या दोघांवर घेऊन रोनाल्डोने त्यांना कामावरून काढून टाकले असेल. हा माझा प्राथमिक अंदाज होता. माझा अंदाज किती प्रमाणात खरा आहे? ह्याची पडताळणी करण्याकरता मला मि.रोनाल्डोंना भेटने गरजेचे होते. 

     

दुसरा विषय होता, तो म्हणजे तुम्हाला ह्या रूम मध्ये भूत असण्याचा आभास होणे. खरे तर भूत ह्या संकल्पनेवर लक्ष देणे म्हणजे मूर्खपणाच. परंतू तुम्हाला सर्वांनाचा तुमच्या डॅडच्या रूममध्ये भूत असण्याचा भास होत होता. त्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करूण चालणार नव्हते. काही असे रासायनिक मिश्रणे (केमिकल कंपाऊंडस) असतात. जे जास्त प्रमाणात आपल्या सानिध्यात असल्यास आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचे हॅलुसिनेशन म्हणजेच भास होतात. मी सोबत आणलेल्या केमिकल डिटेक्टर मशिनच्या सहाय्याने रूम मधील सर्व विद्यूत उपकरणांचे निरिक्षण केले. परंतू रूममध्ये मला कुठलेही रसायन डिटेक्ट झाले नाही. मी ते मशीन चालू करून तसेच बॅग मध्ये ठेवले. आणि बिछान्यावर पडलो होतो. बऱ्याच वेळाने मला मशिनचा डिटेक्टर साऊंड ऐकू येऊ लागला. मी बॅगमधील डिटेक्टर मशीन काढले. रूम मध्ये जास्त प्रमाणात कार्बन कंपाऊंड असल्याचा संकेत डिटेक्टर मशिन करत होते. त्या कंपाऊंडचा प्रभाव माझ्या शरिरावर होऊ नये म्हणून मी लवकर तोंडाला मास्क बांधले.कार्बन कंपाऊंड नेमके कुठल्या विद्युत उपकरणातून येत होते हे शोधण्यासाठी मी डिटेक्टर मशीन प्रत्येक विद्युत उपकरणाजवळ घेऊन गेलो. बेडजळील एसी जवळ सर्वात जास्त कंपाऊंड रिडिंग मिळाली. मी एसी बंद केला. काही टूल्स आणि स्क्रू ड्राइव्ह च्या सहाय्याने मी एसी उघडून बघितला. कुणीतर चांगल्या कुशलतेने कार्बन केपाऊंड प्रेरित करणारे उपकरण एसीच्या आतील भागात बसवले होते. एसीचा स्विच ऑन केल्यानंतर त्या उपकरणात विद्युत प्रवाह होत असे. आणि त्यातून कार्बन कंपाऊंड प्रेरित होत होते. 

     

जास्त काळ वाढत्या कार्बन कंपाउंडच्या सानिध्यात राहिल्यास श्वासोच्छवासाद्वारे कार्बन कंपाऊंड शारिरात पोहचतात. रक्तप्रवाहाद्वारे शारिरात फिरू लागतात. त्यामुळे शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे हळू हळू काँसियस पॉवर कमी होऊ लागते.आणि शरिरावर वेगवेगळे लक्षणे दिसू लागतात. व्यक्तीला अनेक गोष्टींचा भास होऊ लागतो.ज्या गोष्टिंबद्दल किंवा व्यक्तींबद्दल सतत विचार केलेले असतात. त्या गोष्टी किंवा व्यक्ती समोर प्रत्यक्षात दिसायला लागतात. मेडिकल सायन्समध्ये यास हेलुसिनेशन(समोर कुठलीही वस्तू नसताना सुद्धा ती वस्तू असल्याचा भास होणे)म्हणतात. ह्या कंपाउंडच्या जास्त काळ सानिध्यात असलेल्या व्यक्तीच्या रक्ताचा रंग जास्तच गडद लाल असतो.

     

एसी मधून निघालेल्या कार्बन कंपाउंडमुळेच तुम्हाला तिघांनाही ह्या रूममध्ये आल्यास भुतं असण्याचा भास होत होता. मी ते उपकरण एसी मधून काढून टाकले आणि एसी व्यवस्थित करून ठेवला. ह्या रूममध्ये भूत असल्याचा आभास आधी होत नव्हता. जेव्हा पासून तुम्ही हेनरीला नोकर म्हणून ठेऊन घेतले. तेव्हापासूनच तुमच्या डॅडला भास होणे चालू झाले होते. त्यामुळे माझ्या संशयाच्या जाळ्यात अगोदर हेनरीच होता. मी जेव्हा रूमच्या बाहेर जायचो तेव्हा मुद्दाम सर्व स्विच बंद करून टाकायचो. परंतू रिटर्न आल्यानंतर मला नेहमी फक्त एसीचाच स्विच ऑन दिसायचा. नेमके कोण एसीचा स्विच ऑन करतो हे बघण्यासाठी मी नेहमीप्रमाणेच सर्व स्विच बंद करुण कपाटाच्या मागे लपून बसलो. थोड्यावेळाने घर साफ करण्याचा बहाणा करून हेनरी हातात झाडू घेऊन घाबरतच इकडे तिकडे बघत रूम मध्ये आला. रूममध्ये कुणीच नाही याची खात्री केल्यानंतर त्याने एसीचा स्विच चालू केला. आणि रूम साफ न करताच बाहेर निघून गेला. माझा संशय खरा निघाला होता. परंतू ह्या गोष्टीचे पूरेपूर ज्ञान हे हेनरीला नव्हते. त्याला एसी मध्ये नेमके काय उपकरण आहे याची खरी माहिती नसावी. कारण त्याला जर त्या उपकरणाचे पूर्णपणे ज्ञान असते, तर तोंडाला काहीही न बांधता एसीचे बटण चालू करण्यासाठी वारंवार तो रूम मध्ये आलाच नसता. कार्बन कंपाउंड बद्दलचे विशिष्ट ज्ञान आणि ते इतक्या कुशलतेने एसी मध्ये बसविण्याचे काम फक्त वैद्यकिय क्षेत्रामध्ये पारंगत असलेला व्यक्तीच करू शकतो. त्यामुळे हे काम एकट्या हेनरीचे नाही. तो फक्त एक मोहरा आहे. हे मी ओळखले होते. मी ठरवले असते तर हेनरीला तेव्हाच पकडून त्या संदर्भांत विचारले असते. परंतु यामुळे दूसरा व्यक्ती सावध झाला असता. त्यामुळे हेनरीला काहीही समजू न देता मी माझे काम चालू ठेवले. 

     

रोनाल्डो कडून कदाचित बरीच माहिती मिळेल. ह्या विचारांनी मी दुसऱ्या दिवशी त्यांना भेटलो. मी त्यांना बोलते करण्यासाठी खोटी माहिती दिली. मी सांगितले की,

" मी एक पोलिस कर्मचारी आहे. तुमच्याकडे काम करत असलेल्या मिस्टर जॅक्सन यांचे निधन झाले आहे. त्यांची मुलगी मेरी हिने काल माझ्याकडे तुमच्या संदर्भात कंप्लेंट केली आहे. की तुम्ही गेल्या पाच महिन्यापासून तिच्या वडिलांचा पगार केलेला नाही. असे तुम्ही का केले"? 


त्यावर रोनाल्डो घाबरतच पण ठाम पणे बोलू लागले की, 

"सर, तुम्ही सांगता त्याप्रमाणे काहीच घडलेले नाही. मिस्टर जॅक्सनला कामावरून काढण्यास जवळपास दोन वर्ष झालेले आहे. मेला ते बरेच झाले. वाईट कर्माची फळे वाईटच भेटणार. त्याने व त्याच्या मित्राने माझ्या काही मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. त्यामुळे मी दोघांनाही कामावरून काढून टाकले होते. त्याची मुलगी त्याच्यासारखीच लबाड दिसते. तुम्ही तिचीच व्यवस्थित चौकशी करा". 

 (क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Action