Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

4.5  

Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग १२

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग १२

5 mins
407


अनेक प्रयत्नांनंतर जेम्स अंकलने हेनरीला कदाचित सोनं कुठे आहे हे सांगितले असावे. हेनरीने ही माहिती एलिझाबेथ आणि मॅडसनला सांगितली असेल. जेम्स अंकल कडून माहिती मिळाल्यामुळे तसेही त्यांच्यासाठी ते आता बिनउपयोगी झाले होते. आणि बापाचे धन लुटल्यामुळे एलिझाबेथ जेम्स अंकलचा सुड घेऊ इच्छित होती. मि.जेम्स जिवंत राहिले असते तर तेही पुढे सोन्यात हिस्सेदार झाले असते. यासर्व कारणांमुळे व्यवस्थित प्लॅनिंग करून त्यांनी जेम्स अंकलला रस्यातून काढून टाकायचे ठरविले.

      

जेम्स अंकल घरी असताना, एलिझाबेथ आणि मॅडसन त्यांच्या घरी गेले. दरवाजा उघडताच मॅडसनने हातातील काठीने अंकलच्या डोक्यावर समोरून वार केला. जेम्स अंकल मुर्छित होऊन पडल्यानंतर त्यांनी विषारी सूया असलेल्या लाकडाची स्टिक त्यांच्या पायाला टोचली. अंकलच्या डोक्याला समोरून लागलेले होते, त्यामुळे त्यांनी अंकलचे शरीर पालथे करून तोंड जमिनीच्या बाजूने केले. जेणेकरून बघणाऱ्यांना वाटेल की अंकल सर्पदंशाने चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. सोबत आणलेला मेलेला साप त्यांच्या बाजूने टाकला. मॅडसनने हातातील काठीने मेलेल्या सापाला ठेचले. आणि ति काठी जेम्स अंकलच्या हातात दिली. दोघेही घाई-घाईने बाहेर आले. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला घरात जेम्स अंकल असल्याचा अंदाज येऊ नये म्हणून त्यांनी जाताना अंकलच्या घराला कुलूप लावून घेतले. जेम्स घराला बाहेरून कुलूप लावून आत मध्ये कसे गेले? हा प्रश्न कुणाला पडलाच तर एलिझाबेथ आणि मॅडसनला माहिती होते की अंकलच्या घराला एक खूफिया दरवाजा सुद्धा आहे.त्यांनी ह्या दरवाजाची माहिती हेनरीवर लक्ष ठेऊन मिळवली होती. पोलिसांना इनवेश्टिगेशन मध्ये तो दरवाजा सापडलाच असता आणि त्यांच्या प्रश्नाचे निरसन सुद्धा झाले असते की, जेम्स अंकलने स्वतःच बाहेरून कुलूप लावली असावी आणि खूफिया दरवाजाने आत आले असावे. 

      

मिस्टर जॅक्सन सोबत दृढ मैत्री करून त्यांच्या मनात आणि घरात जागा करावी जेणेकरून आपल्याला त्यांच्या घरात असलेल्या सोन्याचा ठावठिकाणा शोधता येईल असा कपटी विचार एलिझाबेथ आणि मॅडसनने केला. नाव, व्यवसाय आणि दोघांमधील नाते बदलवून ते तुमच्या घराशेजारी राहण्यासाठी आले. आता एलिझाबेथचे नवीन नाव होते एलियाना आणि मॅडसनचे होते डॉ. रॉबर्ट. त्यांनी लवकरच तुमच्या दोघांच्याही मनात महत्त्वाचे स्थान मिळवले. परंतू तुमचे डॅड जास्त वेळ कुणालाच घरात थांबू देत नसत. त्यामुळे त्यांनी तुम्हालाच संपविण्यासाठी किंवा घराच्या बाहेर घालवून लावण्यासाठी दूसरा प्लॅनिंग केला तो म्हणजेच कार्बन कंपाऊंड चा वापर. तुमच्या मृत्यूनंतर पोलिसांचा संशय त्यांच्यावर जाऊ नये यासाठी त्यांनी अगोदर इतरांना समजणार नाही अश्या प्रकारे स्वतःलाच संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःचा खोटा अपघात घडवून आणला. दोघांचेही पल्सरेट आणि हृदयाचे ठोके पूर्णपणे बंद असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचा हा रिपोर्ट मी तुमच्या डॅडच्या एका फाईलमध्ये वाचला. रिपोर्ट बघितल्यानंतर तत्काळ माझ्या डोक्यात एक विचार तरळूण गेला. तो म्हणजे,

"संस्पेंडेंड अनिमेशन". 


मेरीला हे समजले नसल्या कारणाने तिच्या कपाळावर आठ्यांचे चित्रिकीरण होण्यास सुरुवात झाली. मेरीने संभाला मध्येच थांबवत विचारले,

"संस्पेंडेंड अनिमेशन म्हणजे काय"? 


संभा पुढे सांगू लागला,

" विशिष्ट प्रकारे योगसाधना करून आणि श्वासांवर नियंत्रण ठेऊन आपण हळूहळू हृदयाची हालचाल काही वेळ थांबवू शकतो. आत्मसात केलेल्या ह्या कलेलाच 'सस्पेंडेड अनिमेशन' म्हणतात.ह्या कलेत काही साधू लोक पारंगत असतात. अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांनतर योग साधना करून ही कला आत्मसात करता येते.”

     

एलियाना आणि रॉबर्ट यांनी या कलेवर प्रभुत्व मिळविलेले होते. कारण फार्मसी कंपनीत अनोळखी व्यक्ती सोबत बोलताना, माहिती मिळाली होती की, मॅडसन हे उत्तम योगगुरू आहेत. ऑफिस सुटल्यानंतर दररोज ते अनेकांना योगाचे ज्ञान देत असत. योगा शिकतानाच एलिझाबेथची मॅडसन सोबत चांगली मैत्री झाली होती. मेरीला आता ह्या कलेबद्दल कळाले होते. आणि एलियाना पहाटे लवकर उठून योगा का करायची याचेही उत्तर तिला मिळाले होते. मेरीला सस्पेंडेंड अनिमेशन बद्दल समजल्यानंतर संभा पुढे बोलू लागला. एलियाना आणि रॉबर्ट यांना मृत घोषित केल्यानंतर त्यांचे शरिर मॉरचुरी मध्ये पाठवण्यात आले. त्यांच्या योजनेनुसार मॉरचुरी विभागातील मॅडसनचा मित्र जोसेफ दोघांच्या चेहऱ्याचे नकली आवरण घेऊन हजर होता. मॉरचुरी विभागात कुणी नाही याचा अंदाज घेऊन जोसेफने त्यांना उठवले. त्या तिघांनी मॉरचुरी मधिल जेमतेम त्यांचा उंचीच्या एक पुरुष आणि एक महिलेच्या मृत शारिरांना त्यांचे नकली चेहरे बसविले आणि ते दोघे तिथून चालाखीने पसार झाले. तुम्ही दुसऱ्या दिवशी ज्या मृत शरिरांचा अंत्यविधी केला, ते एलियाना आणि रॉबर्ट नव्हतेच. जरी त्यांच्या शरिराचा अंत्यसंस्कार झाला नव्हता, तरी त्यांनी धारण केलेल्या नवीन नावांचा अंत्यविधी खरोखर झाला होता. आता राहिले होते ते एलिझाबेथ आणि मॅडसन. 

     

आता त्यांची पुढील योजना होती ती, कार्बन कंपाऊंड एक्सपोजर हे उपकरण तुमच्या घरात बसविण्याची. त्यासाठी त्यांनी हेनरीला पुन्हा मोहरा बनविले. मॅडसनला अगोदरच माहिती होते की, तुमच्या डॅडच्या बेडच्या जवळच भिंतीला एसी आहे. त्यामुळे त्यांनी ते उपकरण एसी मध्येच बसविण्याचे ठरविले. हेनरीला त्यांनी खोटी माहिती दिली की, ह्या उपकरणाच्या सहाय्याने रूममधील सोनं ठेवलेल्या जागेची माहिती आपण मिळवू. अनेक वेळेस त्यांनी हेनरीला ते उपकरण एसी मध्ये बसविन्याचे प्रशिक्षण दिले. आणि हे काम साध्य करण्यासाठी त्याला तुमच्या घरी नोकर म्हणून पाठवले. हेनरीने सुद्धा त्याचे काम अगदी चोखसपणे पार पाडले. कार्बन कपाऊंडमुळे तुमच्या वडिलांना विविध प्रकारचे भास होऊ लागले आणि विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसाने तुमच्या रूम मधील एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे तुम्ही तुमच्या डॅडच्या रूम मध्ये राहण्यास गेलात. आणि तुम्ही कार्बन कंपाऊंडच्या सानिध्यात गेल्यामुळे तुम्हालाही भूत दिसण्याचे भास होऊ लागले. आणि तुम्ही घाबरून भारतामध्ये आत्याकडे आलात. 

     

तुम्ही भारतात गेल्यानंतर हेनरीला ह्या घरात आता मोकळीक मिळाली होती. त्याने तुमच्या डॅडच्या रूममध्ये सोनं शोधण्याच्या हेतूने खोदकाम सुरू केले. परंतू जास्त काळ रूममध्ये राहिल्यामुळे त्यालाही आता वेगवेगळे आभास होऊन रूम मध्ये भूत असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे तो घाबरून घराच्या बाहेर पळून गेला. त्यानंतर त्याने ह्या घरामध्ये भूत असल्यामुळे खोदकाम करणार नसल्याचे त्या दोघांना सांगितले असणार. त्यानंतर हेनरीला न सांगताच एलिझाबेथ आणि मॅडसन गुपचूप मागच्या खिडकीतून येऊन खोदकाम करू लागले. तोच खोदकामाचा आवाज बाहेर हेनरीला ऐकू येत होता. त्याच्यामताप्रमाणे भूतच रूममध्ये खोदकाम करत होते. आपण इथे आल्यानंतर त्या दोघांचेही इथे येणे बंद झाले. 


( क्रमशः )


Rate this content
Log in

Similar marathi story from Action