Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

3.9  

Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ७

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ७

5 mins
154


संभाची तिक्ष्ण नजर हळूहळू रूम मधील प्रत्येक गोष्टीवरती पडू लागली होती. त्याच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघून असे वाटत होते जणू काही तो प्रत्येक वस्तूला काहीतरी प्रश्न विचारत आहे. आणि क्षणात बदलणाऱ्या,गालातत्या गालात गूढ सौम्य हसणाऱ्या चेहऱ्याकडे आणि नजरेत बघून असे वाटायचे की ती प्रत्येक वस्तू त्याच्या प्रश्नांना अचूकपणे उत्तरे देत आहे. अनेक वस्तूंचे निरीक्षण करून झाल्यानंतर त्याने रूममधील सर्व लाईटचे,पख्यांचे,आणि एसी चे स्विच ऑफ केले. जास्त वेळ तिथे न थांबता तो रूमच्या बाहेर आला. मेरीला आणि हेनरीला बाहेर बोलावून घेऊन त्याने दरवाजा बंद केला. 

    

संभाने हेनरीला त्याचे सर्व सामान मेरीच्या डॅडच्या रूम मध्ये ठेवण्यास सांगितले. हेनरीचा पुन्हा थरकाप चालू झाला. तेव्हा,

"राहू दे, माझे सामान मीच रूममध्ये नेतो. तू तुझे दूसरे काम करू शकतो." 

संभा हेनरीला म्हणाला. 


संभाने मेरीच्या मदतीने काही सामान रूम मध्ये नेले. फ्रेश झाल्यानंतर रूम मधील एका खूर्चित बसला. थोड्यावेळाने मेरी त्याच्या साठी गरमागरम चहा घेऊन आली. चहाचा कप हातात घेऊन, त्याची भिरभिरती तिक्ष्ण नजर कसल्यातरी शोधात संपूर्ण रूममध्ये फिरु लागली. कसलातरी विचार त्याच्या वैचारिक डोक्यात डोकावला असावा. तसा तो अर्धा पिलेला चहाचा कप समोरील टेबलवर ठेऊन ताडकन खूर्चितून उठला. सोबत आणलेले कुठलेतरी इलेक्ट्रिकल मशीन त्याने बॅगेतून बाहेर काढले. अगोदर बंद केलेल्या सर्व इलेक्ट्रिकल उपकरणांचे स्विच त्याने चालू केले. हातानेच इशारा करत मेरीला बाहेर जाण्याचे सांगितले. तसे ती पण काही प्रश्न न करता कसलातरी विचार करत बाहेर निघून गेली. ते इलेक्ट्रिकल मशीन संभाने एक एक करत रूममधील सर्व इलेक्ट्रिकल उपकरणांजवळ नेले. परंतू हाती योग्य अशी काही माहिती मिळाली नाही. शेवटी ते मशीन बॅगेत ठेऊन बॅग त्याने बेड शेजारील कोपऱ्यात ठेवली. आणि पुन्हा खूर्चित जाऊन कसलातरी विचार करत बसला. 

     

रात्रीचे जवळपास बारा वाजले असतील. टूंग, टूंग,टूंग असा बारीकसा आवाज संभाच्या रूम मध्ये येऊ लागला. अगदी सावधपणे झोपलेल्या संभाने तो आवाज ऐकताच बेडवर उठून बसला. हा आवाज बॅगमध्ये ठेवलेल्या मशीनचा आहे. हे ओळखण्यासाठी संभाला फारसा वेळ लागला नाही. त्याने ते मशीन बाहेर काढून बघितले. शेजारी कुठले इलेक्ट्रिकल सामान आहे याचे त्याने निरीक्षण केले. बॅगच्या अगदी वरतीच भितींवर असलेल्या एसी कडे संभाचे लक्ष गेले. त्याच्या डोक्यात बरेचसे विचार घर करू लागले.त्याने एसी बंद केला. बॅगमधून काही उपकरणांच्या सहाय्याने त्याने भितींवरील एसी खोलून बघितला. एसीचे निट निरीक्षण केल्यानंतर त्याने एसी मधील काही वायर कट केल्या. पुन्हा एसी होता तसा भितींवर लावला. आणि बेडवर अंग टाकले. आता मात्र विचारांचे जाळे त्याच्या डोक्यात सुसाट्याने पसरु लागले होते. बराच वेळ विचार करत तो तसाच झोपी गेला. 

     

पहाटे पाच वाजता उठून संभाने अंगणात पक्ष्यांच्या फिलबिलाटामध्ये,थंडगार हवेत व्यायाम करणे सुरू केले. जवळपास पंचेचाळीस मिनिटांच्या व्यायामाने अंगावरील कपडे घामाने ओलेचिंब झाले होते. सर्व कामे आटोपल्यानंतर सकाळच्या कोवळ्या उन्हात हातात गरमा गरम चहाचा कप घेऊन संभा झोपाळ्यावर हळूहळू झोके घेत बसला. तो उगवत्या सूर्याकडे नजर रोखून दूर कुठेतरी तर्कांच्या दुनियेत कसलातरी शोध घेत होता. तेवढ्यात काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला. तसा उठून तो मेरीकडे गेला. मेरीला संभाने विचारले,

"तूमचे डॅड ह्या शहरात नेमके कुठल्या ठिकाणी कामावर जात होते"? 


मेरीने सांगितले,

"इथून विस किमी अंतरावरती कार्लोरोडला संताक्रुज चर्च पासून थोडेसे दूर मि. रोनाल्डो यांचा मोठा बंगला आहे. तिथेच डॅड आणि जेम्स अंकल कामासाठी जात असत". 


संभा चेहऱ्यावरती स्मितहास्य करत मेरीला म्हणाला. 

"विचारण्याचे कारण म्हणजे, मी आता बाहेर फेरफटका मारण्याकरता जाणार होतो. तेव्हा डोक्यात आले की, तुमचे डॅड जिथे काम करत होते, तो बंगला आणि त्यासभोवताचलची सुंदर बाग पण बघून यावी". 


मेरीची कार घेऊन संभा थोड्याच वेळात मि.रोनाल्डो यांच्या भव्य बंगल्यावर आला. 

    

गेटजवळ उभ्या असलेल्या गार्डला संभाने विचारले,

"इ्ज धिस मिस्टर रोनाल्डोज बंगलो?(हा बंगला श्रीयुत रोनाल्डो यांचा आहे का?) त्यावर गार्डने नुकतीच होकारअर्थी मान हलवली. संभाने त्याला पुन्हा प्रश्न केला,

"कॅन, आय मेट टू मिस्टर रॉनाल्डो"?(मी मिस्टर रोनाल्डोंना भेटू शकतो का?) 


गार्डने गेटच्या आतूनच हाताची पाच बोटे वर करून पाच मिनिटे थांबण्याचा इशारा केला. आणि गार्ड पटपट पाउले टाकत बंगल्याच्या दिशेने निघून गेला. पाच-सहा मिनिटांनंतर गार्ड माघारी आला व त्याने गेट उघडत संभाला आत मध्ये येण्याचा इशारा केला. संभाने बंगल्या शेजारील पार्कमध्ये गाडी उभी केली आणि बागेचे निरीक्षण करत रोनाल्डो बसले होते तिथे पोहचला. बराच वेळ त्यांच्यात काहीतरी चर्चा झाली. त्यानंतर संभाने त्यांचा निरोप घेऊन तिथून प्रस्थान केले. शहराच्या बाहेर ॲरो हायवेलगत असलेल्या फार्मसी कंपनीमध्ये संभा येऊन पोहचला. तेथील मॅनेजरची अपोइंटमेंट घेऱ्यासाठी बराच वेळ त्याने प्रतिक्षालय मध्ये वाट बघितली. मॅनेजर सोबत काहीशी चर्चा केल्यानंतर हातात कसलातरी कागद घेऊन तो समाधान पूर्वक हस्य करून ऑफिसमधून बाहेर आला. आणि तेथील त्या भल्यामोठ्या कंपणीचे तो निरीक्षण करू लागला. तेथील अनेक प्रयोग शाळांना त्याने भेट दिली. तेथील लोकांसोबत तो मनसोक्त गप्पा करू लागला होता. बऱ्याच वेळानंतर तो त्या कंपणीमधून बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी गंभीरता आणि नजरेत कसलेतरी गुढ सामावलेले दिसत होते. आता सायंकाळची वेळ झाली होती. त्यामुळे संभाने कार मेरीच्या घराच्या दिशेने वळवली. दिवसभरात घडलेल्या गोष्टींचे अवलोकन करून त्याबद्दल योग्य तो तर्क जुळविण्याचा प्रयत्न करत संभा मेरीच्या घरी पोहचला.

     

मेरी बऱ्याच वेळेपासून संभाची वाट बघत अंगणातील झोपळ्यावर बसलेली होती. गाडीतून उतरल्यानंतर संभाने तिच्याकडे बघून जरासे स्मित हास्य केले आणि जास्त काहीही न बोलता तसाच त्याच्या रूम मध्ये निघून गेला. मनातील गोंधळ घातलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्याकरता मेरी त्याच्या पाठीमागेच रूम मध्ये गेली. परंतू तो खूर्चित बसून सिगारेटचे फूरके मारत गंभीरतेने मग्न होऊन कसलेतरी विज्ञानशास्त्राचे पुस्तक वाचत होता. त्यामुळे आपण मनातील प्रश्न नंतर विचारू असा विचार करून मेरी तिथून निघून गेली. रात्री मेरीने प्रश्न विचारण्याच्या हेतूने संभाच्या रूम कडे दोनदा चक्कर मारले होते. परंतू संभा तसाच वाचनामध्ये तल्लीन असलेला तिला दिसला. रात्र बरीचशी झालेली होती आणि मेरीला आता झोप येऊ लागली होती. त्यामुळे ती तिच्या रूममध्ये जाऊन बिछान्यावर पडली. दिवसभर संभा नेमके कुठे गेला असावा? कुठल्या प्रश्नांची उत्तरे त्याने शोधली असावी? संभा येथे आल्यापासून भुतांचा आभास होणे कसे बंद झाले असावे? अश्या अनेक प्रश्नांचा विचार करत मेरी झोपी गेली. 


 (क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Action