Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

4.5  

Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग १३

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग १३

6 mins
400


काल रात्री केसच्या संदर्भात विचार करत असताना बराच वेळ झाला होता. जवळपास बारा वाजले असेल. छतावरून प्रकाशाचा एक तिरपा झोत पूर्वेकडील भिंतीवरील आरशावरती पडला. मी काहिसा विचार करून थोडावेळ आरशासमोर उभा राहिलो. तेव्हा तुमच्या डॅडने लिहिलेल्या शेवटच्या चिठ्ठीवरील मजकूर मला आठवला. 


{"पंधरा मिनिटांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर काळोख्या अंधारातही केव्हातरी घरात मध्यांनी शितळ प्रकाश पडावा. त्या शितळ प्रकाशात आपल्याला सुंदर चेहऱ्यांचा अनुभव व्हावा. चेहरा बघताना कितीतरी वेळ तसेच स्वतामध्येच हरवून जावे, स्वतःच्या डोळ्यात सूर्याचे तेज दिसावे. दुरदृष्टिकोनाने त्याच सूर्य किरणांच्या उद्गमतेचे स्थान शोधावे. सूर्याची किरणे मनाच्या भितींवर उमटून सोनेरी किरणांनी आयुष्य प्रकाशमय करून घ्यावे".} 

     

'पंधरा मिनिटांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर काळोख्या अंधारातही केव्हातरी घरात मध्यांनी शितळ प्रकाश पडावा' 

ह्यावर बराच विचार केल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता. त्याचा अर्थ असा होता की, अमावास्येच्या पंधरा दिवसाच्या काळोख रात्रीनंतर पौर्णिमेचा चंद्र उगवतो. आणि त्या चंद्राचा शितळ प्रकाश मध्यरात्री घराच्या छतातून घरात येईल. पुढील वाक्य होते. 


"त्या शितळ प्रकाशात आपल्याला सुंदर चेहऱ्यांचा अनुभव व्हावा". 


या वाक्याचा विचार करताना माझ्या डोक्यात विचार आला. आपल्याला चेहऱ्याचा अनुभव घेण्यासाठी आरशात बघावेच लागते. म्हणून मी आरशासमोर उभा राहून त्यात चेहरा बघू लागलो. परंतू वाक्यात होते की चेहऱ्यांचा अनुभव व्हावा. 


'चेहऱ्यांचा' 

हा शब्द त्यात अनेकवचनी होता. म्हणून मी लक्ष देऊन आरशात बघितले. आरशाच्या समोर माझ्या पाठिभागील भिंतीवर निसर्गाचे एक चित्र होते. आरशावरती पडलेला प्रकाश परावर्तित होऊन त्या चित्रावर पडला होता. त्यामुळे सहजासहजी न दिसणारे अदृष्य चार चेहरे समोरील आरशात दिसू लागले. चित्रकाराने ते चित्र अश्या प्रकारे चित्रित केले होते की, जास्त प्रकाश असताना, किंवा खूपच कमी प्रकाश असताना, आणि समोरून बघताना ते चेहरे त्यावर दिसत नव्हते. समोरून बघितल्यास ते चेहरे उलटे असल्यामुळे पाण्याने भरलेली चार मडकी दिसायची. फक्त आरशातच ते चेहरे सरळ दिसायचे. तेही शितळ प्रकाशातच.

     

पुढचे वाक्य होते,

"चेहरा बघताना कितीतरी वेळ तसेच स्वतामध्येच हरवून जावे, स्वतःच्या डोळ्यात सूर्याचे तेज दिसावे". 


ह्या वाक्यातून तुमच्या डॅडला नक्की काय सांगायचे असेल याचा मी बारकाईने विचार करू लागलो. 


"चेहरा बघताना कितीतरी वेळ तसेच स्वतामध्येच हरवून जावे". 

म्हणजेच कदाचित आरशात दिसणाऱ्या चारही चित्रांचे व्यवस्थितपणे निरिक्षण करायचे असेल. असे ठरवून मी अगदी बारकाईने नजर न हटवता एकटक त्या चेहऱ्यांकडे बघत राहिलो. त्या चारही चेहऱ्यांवर एक नाजूक स्मित हास्य होते. आणि ते चारही वेगवेगळ्या दिशेने बघत होते. ह्या चेहऱ्यांकडे बघून नक्की काय समजावे? हा प्रश्न मला पडला. त्यानंतर मी,

"स्वतःच्या डोळ्यात सूर्याचे तेज दिसावे" 

ह्या वाक्याचा जास्त विचार केला. स्वताच्या डोळ्यात म्हणजे नक्की काय असेल? याचा अनेक वेळेस विचार केल्यानंतर मी आरशातील माझ्या चेहऱ्याकडे बघितले. निरीक्षण करताना माझ्या कपाळावर मला जराशा आठ्या पडलेल्या दिसल्या. डोक्यात एक विचार आला की स्वतःच्या चेहऱ्यासारखाच चेहरा आपल्याला चित्रातील चेहर्यांमध्ये शोधायचा असेल. पुन्हा चित्रांतील चेहऱ्यांचे एकचित्त करून बारकाईने निरीक्षण करू लागलो. त्या चेहऱ्यांमध्ये एक चेहरा अगदी तमुसभर थोडासा किंचीत वेगळा जाणवला. त्याच्या कपाळावर बारिकशी आठी पडलेली होती. 


"डोळ्यांत सूर्याचे तेज दिसावे" 

म्हणजेच कदाचित त्या चित्रातील व्यक्तीच्या डोळ्यांचे अवलोकन करावे असा अनुमान मी लावला.

     

"दुरदृष्टिकोनाने त्याच सूर्य किरणांच्या उद्गमतेचे स्थान शोधावे"


म्हणजेच त्या वेगळ्या दिसणाऱ्या चेहऱ्याची नजर नेमकी कुठे आहे याचा शोध घ्यायचा. त्याच्या नजरेचे निरीक्षण केल्यावर समजले की त्याची नजर पूर्वेकडील भिंतीच्या कोपऱ्यावर स्थिरावलेली होती. आता शिल्लक राहिले होते फक्त शेवटचे वाक्य,


"सूर्याची किरणे मनाच्या भितींवर उमटून सोनेरी किरणांनी आयुष्य प्रकाशमय करून घ्यावे". 


मी शेवटच्या वाक्यातील आशयाची जुळवाजुळव करू लागलो. बऱ्याचशा विचारानंतर अंतिमता मला त्या वाक्याचा आशय कळाला. म्हणजेच त्या वाक्याचा हेतू असा होता की, त्या चित्रातील व्यकीची नजर भिंतीवरती ज्या ठिकाणी पडलेली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अशी काही मौल्यवान गोष्ट मिळेल, की त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धीचा प्रकाश पडेल. म्हणजेच भिंतीवरील त्या ठिकाणीच तुमच्या डॅडने सोनं लपवलेले आहे. हे मी खात्रीशीर ओळखले होते. तुमच्या डॅडने लिहलेल्या पहेलीचा पूर्णपणे उलगडा झाल्यानंतर मी अनेक गोष्टींबद्दल विचार करत बिछान्यावर पडलो. आणि थोड्याच वेळात निद्राधीन झालो. 

    

या घटनेतील सर्व आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी आज सकाळी मी एक योजना आखली. सकाळी मुद्दाम मी हेनरीकडे मोठ्या हातोडीची विचारपुस केली. त्यामुळे त्याला नक्कीच वाटले असणार की,मला रुम मध्ये काहीतरी गोष्ट सापडली असणार. तो गुपचूप चोरपावलांनी माझ्या मागे आला होता. ही गोष्ट मला कळाली होती. परंतू मलाही तेच हवे होते. मी हातोडीचे प्रहार करुण भिंतीचे वरील आवरण फोडले आणि त्यातून अनेक बिस्किटच्या आकाराची सोन्याची तुकडी भराभर खाली पडली. ही गोष्ट हेनरी पण बघत होता. आवाज ऐकून तुम्ही ह्या रूम मध्ये आलात. समोर एवढे सोनं बघून तुम्ही आश्चर्यचकित झालात. हे गुढ जाणून घेण्याच्या हेतूने तुम्ही मला प्रश्न करणार इतक्यात मी इशारा करून तुम्हाला गप्प राहण्यास सांगितले. आपण सोनं घेऊन आजच्या आज निघून जाऊ त्यासाठी प्रोटेक्टिव बॅगा घेऊन येऊ हे मी हेनरीला ऐकू जाईल अश्या आवाजात बोललो. आणि आपण रूम बंद करुण घराबाहेर पडलो. मला माहिती होते ते सोनं लवकर लंपास करण्यासाठी हेनरी एलिझाबेथ आणि मॅडसनला नक्की बोलवेल. पुढे जो काही दृष्टांत घडला, तो सर्व तुम्ही स्वतः बघितला आहे. खरे तर मला ह्या सर्व आरोपी बद्दल लवकर कळाले होते. परंतू त्यांनी दोन्ही पण खून इतक्या शातीर पद्धतीने केले होते की. आपल्याला सर्व काही माहिती असुन पण आपण त्यांना तुरुंगात घालू शकलो नसतो. त्यामुळे त्यांना रंगेहात पकडून देणे हाच आपल्याकडे एक मार्ग शिल्लक होता. आणि आपण तोच मार्ग अवलंबला.

    

मेरीचा चेहरा आश्चर्याने फुलून गेला होता. ह्या संपूर्ण केसचे संभाने चलाख बुद्धीने केलेले निरसन आणि डॅडने लिहलेल्या त्या पाचसहा ओळींचा गुढ अर्थ संभाने इतक्या चातुर्याने शोधल्यामुळे मेरीला संभाचा अभिमान वाटू लागला होता. आता जवळपास मध्यरात्र ओलांडून गेली होती. संभाच्या चातुर्याबद्दल विचार करत मेरी झोपी गेली. 

    

आज मेरीच्या आयुष्यात एक नवीनच आनंददायी पहाट उगवली होती. आजपण मेरीला कुणाच्यातरी आवाजानेच जाग आली परंतू हा येणारा आवाज त्या कपटी एलियानाचा नसून, अनेक पिल्लांना झोपेतून जागे करणाऱ्या पक्षांचा होता. मध्येच कोकीळेचा सुमधुर आवाज एका सुंदर गाण्यामधील बासुरीच्या आवाजाप्रमाणे मनमोहक वाटत होता. आता सकाळ झाली होती. रात्रीच्या अंधाराप्रमाणे मेरीच्याही आयुष्यातील अंधार संभारूपी सूर्याने कायमचा नष्ट करुन तीच्या आयुष्यात सुखाचे आणि आनंदाचे सोनेरी किरणे प्रेरित केली होती. 

    

सकाळी दहा वाजता संभा आणि मेरी कॅलिफोर्नियातील विमानतळावर उभे होते. थोड्याच वेळात भारताकडे जाणारे विमान आले. विमानाच्या दिशेने जाता जाता संभा मेरीला म्हणाला,

" यापुढे पुन्हा काहीही अडचण आली, तरी निसंकोचपणे भारतामध्ये या. भारतभूमीचा हा सूपुत्र जगातील अडचणीत असलेल्या सर्व माता,भगिनी, आणि भांवडे यांना अडचणीतून मुक्त करण्यासाठी सदैव तत्पर असतो".


संभाचे हे आधार देणारे हृदयस्पर्शी शब्द ऐकून मेरीचा उर अभिमानाने भरून आला होता. काही वेळाने संभा बसलेल्या विमानाने भारताच्या दिशेने उड्डान घेतले. थोड्याच वेळात ते दिसेनासे झाले. विमान नजरेच्या पल्याड निघून गेले होते. परंतू मेरी अजुनही तशीच आकाशाकडे बघत होती. जणू काही ती त्या निळ्याभोर आकाशाच्या पलिकडे असलेल्या ईश्वराचे आभार मानून, डोळ्यांतून घळघळा वाहणाऱ्या अश्रुंनी अभिषेकच घालत होती. 


समाप्त.

𝕯𝕾


Rate this content
Log in

Similar marathi story from Action