सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ११
सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ११
माझा अंदाज खराच ठरला होता.
“मी म्हणालो ठिक आहे मी तिची चौकशी करतो. ह्यावेळेस जरी मी रिकाम्या हातानी आलेलो असेल,परंतू तिने सांगितलेल्या माहिती मध्ये सत्यता असल्यास, पुढच्या वेळेस बेड्या मात्र नक्की असतील".
रोनाल्डो समोरील टेबलावर एका मुलीचा फोटो बघून मी थांबलो. कारण त्या मुलीचा फोटो मी या अगोदर पण बघितला होता. रोनाल्डोला फोटोबद्दल विचारल्यानंतर कळाले की, ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. मिस एलिझाबेथ. आणि ती ह्याच शहरामध्ये फार्मसी कंपनीत लॅबोरेटरी मॅनेजर पदावर काम करते.
माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त माहिती मला मिळाली होती. माझ्या डोक्यातील अनेक गोष्टींचा उलगडा होऊ लागला होता. मी तिच्याबद्दल अजून माहिती मिळविण्यासाठी फार्मसी कंपणीत गेलो. तेथील मॅनेजर कडून कंपनी बघण्याची परवानगी मिळवली. लॅबोरेटरी कक्षात जाऊन तिथे मी एका व्यक्तीला एलिझाबेथ मॅडम बद्दल चौकशी केली. तेव्हा त्या व्यकीने सांगितले की,
"एलिझाबेथ मॅडम बऱ्याच दिवसांपासून कामावर येत नाही. ह्याच कंपणीत कार्यरत असलेल्या आणि तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या मि. मॅडसन सोबत त्या पळून गेल्या. असे मी ऐकले आहे".
मी पुढे विषय वाढविण्यासाठी बोलू लागलो.
"एलिझाबेथ मॅडम दिसायला फार सुंदर होत्या. परंतू मॅडसन काही खास नव्हता. असे मी ऐकले होते."
तो व्यक्ती खिशातून मोबाईल काढत म्हणू लागला.
"नाही हो, दिसायला चांगला होता.फक्त वय जास्त होत हा बघा मॅडसनचा फोटो"
मोबाईल माझ्या हातात देत तो म्हणाला.
त्या अनोळखी व्यक्तीने दिलेल्या माहितीमुळे दोन व्यक्तींची चांगल्या प्रकारे ओळख पटली होती. तुमची मैत्रीण एलियाना हिच एलिझाबेथ होती. आणि तिचा तो मध्यमवयीन मित्र मॅडसन हाच डॉ. रॉबर्ट होता.
जेम्स अंकलचा मृत्यू सापाच्या दंशाने झाला नसावा. कारण तुम्ही सांगितल्या प्रमाणे जेम्स अंकलने काठीने सापाला पाठीमागच्या अर्ध्या भागाला मारले होते. आणि साप पण त्यांच्या जवळच पडलेला होता. परंतू सामान्यता सापाने चावण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपण त्याला सुरवातीला तोंडाच्या बाजूने मारतो. शेपटीच्या बाजूने नाही. जेम्स अंकलच्या मृत्यूबद्दल अनेक संशयास्पद विचार माझ्या डोक्यात येत होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला घेऊन जेम्स अंकलच्या घरी गेलो. त्यांच्या घराचे बाहेरून निरीक्षण केल्यानंतर लक्षात आले की , त्यांच्या घरात प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडील फक्त एकच दरवाजा आहे. आणि तुम्ही कुलूप तोडून आतमध्ये गेलेले होते. म्हणजेच जेम्स अंकलच्या घराला कुठेतरी खूफिया रास्ता होता. त्यांच्या मृत्यूच्या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर तिथे लाकडाच्या बारिक टोक असलेल्या दोन सूया सापडल्या. त्या बघितल्यानंतर मी जेम्स अंकलच्या मृत्यूच कारण ओळखले होते. परंतू तरीही निरीक्षणासाठी मी त्या सूया
सोबत घेतल्या होत्या. माझ्या मतानुसार त्या सूयांवर ॲब्रस प्रिकेटोरियस वनस्पतींच्या बियांपासून बनवलेले विष असावे.
परिक्षणानंतर माझा अंदाज खरा निघाला. त्या सुया ॲब्रस प्रिकेटोरियस वनस्पतीच्याच बियांपासून बनविलेल्या विषयूक्त सूया होत्या. ॲब्रस प्रिकेटोरियस ही सामान्यता भारतात आढळणारी वनस्पती आहे. ही वनस्पती भारतीय मद्य, गुंची किंवा राठी ह्या नावांनी ओळखली जाते. या वनस्पतीचे सर्वच भाग विषारी आहेत. परंतू सामान्यता ह्या वनस्पतीच्या बियांचा विष बनविण्यासाठी जास्त वापर केला जातो. त्या बिया बेचव, गंधहीन, आणि दोन रंगाच्या असतात. एक बाजू लाल आणि दुसरी काळी असते. ह्या वनस्पतीच्या बियांचे वरील आवरण काढायचे. त्या बियांना बारिक करून त्यांची भुकटी(पावडर) बनवायची. अफिम, कांदा, धतुरा यांचे मिश्रण करून पाण्यात किंवा स्पिरिट मध्ये टाकायचे. या मिश्रणामध्ये बियांपासून बनवलेली पावडर टाकून त्याची पेस्ट बनवायची. या पेस्टला बारिक आणि टोकदार सूयांचा आकार द्यायचा. ह्या सूयांना कठीण आणि मजबूत बनण्यासाठी काही वेळ उन्हात ठेवायचे. लाकडाचा एक छोटा तुकडा घ्यायचा. त्याच्या एका बाजूने बारिक छिद्रे पाडायची. मजबूत बनविलेल्या त्या सूयांतून, दोन किंवा तिन सूया त्या छिद्रांमध्ये पॅक करायच्या. हा लाकडाचा छोटा तुकडा प्राण्यांना फेकून मारून किंवा त्यांच्या शरीराला टोचून प्राण्यांची शिकार केली जाते. ही पद्धत पूर्वी लोक प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरत. अशा विषारी सुयांयूक्त असलेला लाकडाचा तुकडा मनुष्याच्या शरिरावर टोचला तर, मनुष्याचाही मृत्यू होतो. ज्या जागेवर विषारी सूया टोचल्या आहेत, ती जागा अगदी सापाने दंश केल्याप्रमाणेच दिसते. त्यामुळे कुणीही तर्क लावू शकत नाही की ह्या व्यक्तीचा मृत्यू सर्प दंशाने झालेला नसून त्या सूंयामुळे झालेला आहे. जेम्स अंकलचा मृत्यू हासुद्धा सर्प दंशाने झालेला नसून त्या विषारी सूयांमुळेच झालेला होता. ह्या वनस्पतीच्या बिया इथे सहजपणे उपलब्ध होऊ शकत नाही. विविध प्रयोग करण्यासाठी त्या बिया इथे फक्त फार्मसी प्रयोगशाळेतच असू शकतात. त्या बियांपासून विषारी सूया बनविण्याची पद्धत शक्यतो प्रयोगशाळेतील आणि वैद्यकिय शिक्षण प्राप्त केलेल्या व्यक्तींना माहिती असू शकते. त्यामुळे माझी खात्री पटली की हे विषारी सूया बनविण्याची काम एलिझाबेथ आणि मॅडसन यांचेच आहे.
एलिझाबेथ आणि मॅडसन हुशार होते त्यांना माहिती होते की, जेम्स अंकल इतक्या सहजपणे आपल्याला सोनं कुठे आहे याचा ठाव लागू देणार नाहित. हे काम कुणीतरी जवळचा व्यक्तीच करू शकतो. त्यामुळे त्यांनी जेम्स अंकलची पूर्णपणे माहिती काढली असावी. काही दिवसाने त्यांना एक व्यक्ती सापडलाही. तो म्हणजेच हेनरी. हे त्यांच्या सारखाच होते स्वार्थी आणि लालची. हेनरी हे जेम्स अंकलचे वडिल होते. हेनरी बद्दलची माहिती मला त्या वेळेस कळाली जेव्हा मी जेम्स अंकलच्या घरातील लाकडाच्या पेटीतील एक फोटो बघितला होता. तो होता हेनरी आणि जेम्स अंकलचा. त्यावर खालच्या बाजूला लिहिलेला मजकूर होता,
" हॅप्पी बर्थडे टू यू माय डियर सन जेम्स".
हेनरी बद्दल जेम्स अंकलला कसलातरी राग असावा. त्यामुळे त्याने त्यांचे नाव पण कुणाला सांगितलेले नव्हते. आणि घरामध्ये त्यांचा फोटोसुद्धा ठेवला नव्हता. एक फोटो होता तोही लाकडाच्या पेटीत पॅक केलेला. त्यांनी भरपूर पैसा आणि सोन्याचे लालच हेनरीला दाखवून त्याला जेम्स अंकलकडून सोण्याचा ठावठिकाणा माहिती करून घेण्यास सांगितले असेल.
(क्रमशः)