Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

4  

Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ६

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ६

4 mins
400


मेरीने तिचा नंबर आणि शिमल्यातील आत्त्याच्या घरचा पत्ता सुंदर हस्तक्षरात टेबलवरील वहीत नोंदवला. एवढ्या दिवस भितीदायक आणि गंभीर असलेला मेरीचा चेहरा आता खूलला होता. विश्वासाची लहर तिच्या डोळ्यांत तरळून दिसत होती. नम्रतेने अभिवादन करून मेरी जाण्यासाठी निघाली. संभाच्या घरासमोरील झाडांच्या थंडगार सावलीत बाकावर बसून बऱ्याच वेळेपासून रामपाल मेरीची प्रतिक्षा करीत बसला होता. मेरी बाहेर आलेली दिसताच रामलालने घोडागाडी सज्ज केली. ती गाडीत बसताच रामलालने आलो त्या मार्गाने घोडागाडी जोरात पळवली. सूर्याच्या मावळत्या किरणांसोबतच रामपालच्या दूर गेलेल्या घोडागाडीचा आवाजही मावळला होता.

     

अर्ध्यातच विझविलेले सिगारेट संभाने पुन्हा पेटवले. सिगारेट सोबतच त्याच्या डोक्यातील विचारांची आग पेटली. जसे सिगारेटचा धूर तोंडातून सूटून हवेच्या झोताने गोलगोल फिरून वातावरणात पसरायचा. त्याप्रमाणे मेरीने सांगितलेल्या एक ना एका व्यकीचे अस्पष्ट पण बोलके छायाचित्र एका मागे एक संभाच्या डोक्यात चक्राप्रमाणे गोलगोल फिरू लागले. संपूर्ण कहाणीची एक चित्रफितच त्याच्या डोक्यात तयार होऊ लागली. आता हातातील सिगारेट आणि त्यातून निघणारा धूर संपला होता. परंतु संभाच्या डोक्यातील विचारांचे सिगारेट अजूनही तेवत होते. आणि अनेक तर्क-वितर्कांचा धूर त्यातून निघत होता.

     

दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मेरीच्या नंबरवर संभाने कॉल करून तिला लवकर आटोपुन ठेवण्यास आणि दुपारच्या बारा वाजेपर्यंत विमानतळावर उपस्थित राहण्यास सुचविले. ठरल्याप्रमाणे मेरी योग्य वेळेवर विमानतळावर हजर झाली. संभा आणि मेरी विमानात बसले होते. सत्त्याचा शोध घेण्यासाठी संभाने थेट अमेरिकेच्या दिशेने उड्डाण घेतले होते. 

     

"माझ्या मताप्रमाणे आपण तिथे पोहचण्याच्या आत तुमच्या घरातील बरेचसे सामान अस्थाव्यस्त पडलेले असेल. घरातील बऱ्याचश्या सामानांची तोफफोड झाली असेल. आणि अनेक ठिकाणी खोदकाम सुद्धा.आपण तिथे गेल्यावर तुमच्या विश्वासू नोकराकडून अनेक भूतांच्या कहाण्या आपल्याला ऐकण्यास मिळणार.". 

असे आपले मत संभाने मेरीकडे व्यक्त केले. मेरीचा चेहरा अगदी चिंताग्रस्त झाला. कारण संभाच्या तर्कशास्त्रावर मेरीचा विश्वास बसला होता. परंतू तिने काम सांगितलेल्या नोकर हेनरीवर पण मेरीचा विश्वास होता. जोपर्यंत हेनरी घरात असेल तोपर्यंत घरी काहीही होणार नाही.असे मेरीचे मत होते. आपण हे कसे काय सांगितले? हा प्रश्न विचारण्यासाठी मेरीने संभाकडे बघितले. परंतू संभा कसलेतरी पुस्तक वाचण्यात एकदम व्यस्त झालेला दिसला. त्यामुळे प्रश्न विचारण्यासाठी ही वेळ योग्य नाही. असे समजून मेरीने तो प्रश्न करने टाळले. विमानासोबतच मेरीच्या डोक्यात अनेक प्रश्नांचा कल्लोळ उडाला होता.

      

काही तासांच्या विमानप्रवासानंतर मेरी आणि संभा कॉलिफोर्नियात पोहचले. तिथून प्रायवेट गाडीने जवळपास पंचेचाळीस मिनिटे प्रवास करत ते मेरीच्या घरी पोहचले. मेरीला बघताच समोरच्या फुलझाडीत लपून बसलेला नोकर हेनरी धावतच मेरीकडे आला. अगदी घाबरलेला होता तो. धास्तावलेल्या अवस्थेमध्येच हात जोडून तो बोलू लागला. 


"माफ करा मेरी ताई, मी बागेची निगराणी ठेऊ शकलो. परंतू घराची साफसफाई नाही करू शकलो. ह्या घरामध्ये भूत आहेत. जसे की साहेबांना आणि तुम्हाला दिसत होते. त्याचप्रमाणे मलाही इथे भूतांचा आभास जाणवला आहे. तुम्ही गेल्यानंतर मी बाकीच्या घरांची साफसफाई आटोपून साहेबांच्या घरात गेलो होतो. तेथील सर्व वस्तूंची व्यवस्थित पणे सफाई करत होतो. तितक्यात कुणीतरी माझ्या पाठीमागे उभे असल्याचा मला भास झाला. मी मागे वळून बघितले तर कुणीच नव्हते. पुन्हा मी कामात व्यस्थ झालो. रूम मध्ये मला चालण्याचा आवाज येऊ लागला होता. माझ्या दिशेने हळूहळू येणाऱ्या पावलांचा आवाज आता एकदम जोरात येऊ लागला होता. मला साहेबांचा चेहरा स्पष्ट दिसू लागला होता. मी अतिशय घाबरून जोरात पळण्याचा प्रयत्न केला परंतू साहेबांचे दोन हात दुरूनच माझ्या मानेपर्यंत आले. त्यांचे हात हळू हळू घट्ट होऊ लागले होते. तसा श्वासा अभावी माझा जीव गुदमरू लागला होता. सर्व ताकद एकजूट करून मी कसाबसा गळा सोडवून घेतला आणि बाहेर पळून आलो.मरणाच्या दारातून सुटून मी ह्या घराच्या बाहेर पळून आलो होतो. तसे आता पर्यंत घरात डुंकून सुद्धा बघितले नाही. परंतू अजूनही त्या घरामध्ये प्रत्येक रात्री कसलातरी खोदल्यासारखा जोरजोरात आवाज येतो". 


मेरीने त्याला शांत होण्यास सांगितले आणि आता घाबरण्याचे काहीही कारण नाही असे आश्वासन दिले. हेनरीने जरासे घाबरतच संभाकडे पाहून मेरीला विचारले,


"मेरी ताई, आपल्यासोबत आलेले हे यजमान कोण आहेत?". 


मेरी काही बोलणार तेवढ्यात संभानेच उत्तर दिले की,

"माझे नाव संभा. मी मेरीच्या आत्त्याचा मुलगा. मेरी पून्हा एकटे इकडे येण्यास खूप घाबरत होती. म्हणून आईने मला तिच्या सोबत इथपर्यंत पाठवले". 


संभाने असे का सांगितले ? याचा मेरीलाही प्रश्न पडला. परंतू त्यांच्या बोलण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल असा मनोमन विचार करून ती घरामध्ये आली. तिच्या पाठोपाठ संभा आणि शेवटी घाबरत इकडे तिकडे बघत थरकापणाऱ्या पायांनी हेनरी आत मध्ये आला. 

      

संभा, मेरी आणि हेनरी तिघेही मेरीच्या डॅडच्या रूममध्ये गेले. रूमची अवस्था बघून मेरी खूप नाराज झाली होती. घरातील सर्व वस्तू अस्थावस्थ पडल्या होत्या. घरामध्ये खोदकाम करण्यासाठी एका इंचाचीही जागा शिल्लक राहिली नव्हती. ही सर्व अवस्था बघून मेरी चिंतेत पडली होती. परंतू काही क्षणात तिला एका गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले की, आपण विमानात बसलो तेव्हाच रूम मधील घडामोडींची आणि हेनरी बद्दलची इतकी सारी तंतोतंत जुळणारी माहिती संभाने कशी काय सोगितली होती? खरोखरच संभाच्या तर्कशास्त्राच्या ज्ञानाबद्दल मेरीला खात्री पटली होती. 


 ( क्रमशः )


Rate this content
Log in

Similar marathi story from Action