Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

3  

Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ८

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ८

5 mins
177


नेहमीप्रमाणेच संभाने पहाटे उठून व्यायाम करून आपली सर्व कामे आटोपली होती. अंगणात गेटजवळ पडलेला न्यूजपेपर घेऊन तो झोपाळ्यावर वाचत बसला. काही वेळाने मेरी संभाला चहा घेऊन आली. संभाने पेपर वाचतच चहाचा कप स्ट्रे मधून उचलला. मेरी थोडावेळ तशीच तिथे उभी राहिली. आताही तिला संभाला काही प्रश्न विचारण्याची हिम्मत झाली नाही. त्यामुळे ती तशीच माघारी जाऊ लागली. तेवढ्यात संभाने तिला आवाज देऊन बोलावून घेतले आणि म्हणाला,

" मिस मेरी, तुम्ही इथे जवळ असलेल्या एलिफिस्टंन रोड वरील बगिच्या बद्दल काहीशी माहिती सांगितली होती. इथे बसण्यापेक्षा मला वाटले तुम्ही सांगितलेली ती छानशी फुलबाग बघावी. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही मला ती बाग दाखवू शकता का"? 


त्यावर मेरी लगेच उत्तरली,

"होय. माझ्याकडे वेळच वेळ आहे. आणि मला पण तुम्हाला ती बाग दाखवण्यास आवडेल". 


काही वेळाने ते दोघेही कार ने बगिचा बघण्यासाठी निघाले. 

     

मनमोहक, सुबक आणि वेगवेगळ्या विविध रंगाच्या फुलांनी सजलेल्या बागेचा संभाने काही काळ आनंद लुटला. त्यानंतर तो मेरी सोबत बोलू लागला. 


"जेम्स अंकलचे घर इथेच कुठे जवळ आहे का?आलोच होतो जवळ तर बघून जाऊया".


मेरी होकारअर्थी मान हालवत म्हणाली, 

"हो. इथून अगदी जवळ आहे. जाऊया आपण त्यांच्या घरी". 


थोडेसे अंतर चालत जाऊन ते दोघे जेम्स अंकलच्या घराजवळ पोहचले. संभाची निरीक्षणदृष्टी त्या घराभोवती फिरु लागली. जेम्स अंकलच्या घराचा दरवाजा पूर्वेला होता. त्या घरात प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा होता. त्यांनी आत मध्ये प्रवेश केल्यानंतर मेरीने जेम्स अंकलचे मृत शरीर जिथे पडलेले होते ती जागा दाखवली. संभाने त्याच्या सूक्ष्म आणि तिक्ष्ण नजरेने तेथील संपूर्ण जागेचे निरीक्षण केले. त्या खोलीमध्ये बरेचसे बिनकामी सामान कोपऱ्यात पडले होते. संभाने तेथील एकेका गोष्टिंचे अवलोकन केले. त्याला तेथील कचऱ्यात दोन बारीकश्या लाकडाच्या टोकदार सुया सापडल्या. त्या एका कपड्यात व्यवस्थित बांधून संभाने खिशात ठेवल्या. बिनकामी सामानात त्याला एक लाकडी पेटी दिसली. ती पेटी खिळे ठोकून पूर्ण बंद केली होती. संभाने खिळे काढून ती पेटी उघडली. त्यात बरेचसे कागद होते. आणि एक जूना फोटो होता. त्या फोटोवर काही काळ संभाची नजर तशीच खिळून राहिली. त्याने तो फोटो पुन्हा पेटीत तसाच ठेवला आणि पेटीतून एक कागद सोबत घेतला. "आता आपण निघूया". संभा मेरीकडे बघून म्हणाला. मेरीनेही त्यावर सम्मतीदर्शक मान हलवली. काही रस्ते आणि सिग्नल पार करून ते दोघेही मेरीच्या घरी पोहचले. 

    

संभाला हळू हळू बऱ्याचश्या गोष्टींचा उलगडा होऊ लागला होता. त्याच्या डोळ्यांत एक वेगळेच तेज दिसत होते. जेम्स अंकलच्या घरून आणलेल्या त्या दोन सूयांवर वेगवेगळे रसायने टाकून त्याने त्यांचे कितीतरी वेळ परीक्षण केले. आणि रसायन शास्त्राचे पुस्तक घेऊन खूर्चित वाचत बसला.आठ वाजता मेरी जेवणाचे ताट घेऊन संभाच्या रूम मध्ये आली. नेहमीसारखाच तो मग्न परिस्थित बघून कुठलाही व्यत्यय न आणता ती तेथून निघून गेली. दहा अकराच्या सुमारास त्याचे निरीक्षणाचे आणि वाचण्याचे काम झाल्यानंतर त्याने जेवण केले. संभा सिगारेट ओढत आणि विचार करत कितीतरी वेळ तसाच बिछान्यावर पडून होता. विचारांची डोक्यात एवढी गर्दी झाली होती की, झोपेला डोक्यात जागाच शिल्लक राहिली नव्हती. जसजशी मध्यान्य होऊ लागली, तसा शितल प्रकाशाचा एक तिरपा झोत छतावरून भिंतीवरील आरशावर पडू लागला. तसा ज्ञानाचा एक प्रकाश संभाच्या डोक्यात पडला. हातातील अर्धवट संपलेली सिगारेट खाली टाकून त्याने पायाने विझवली आणि त्या प्रकाशझोत पडलेला आरशासमोर जाऊन उभा राहिला. बराच वेळ तो गंभीरतेने त्या आरशात बघत राहिला. काही वेळाने त्याच्या गंभीर चेहऱ्यावर एक गुढ हसू उमटले होते. संभा पुन्हा बिछान्यावर येऊन झोपला. आणि विचारांच्या जत्रेतून बाहेर पडून निद्रावस्थेत लीन झाला होता. 

     

पहाटेच्या थंड हवेचा आस्वाद घेत संभाने व्यायाम केला. व्यायाम आटोपल्यानंतर संभा बागेतील फुलांचे निरीक्षण करू लागला. खरे तर आज त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. नजरेतही एक विलक्षण तेज होते. त्याचा हा बदललेला चेहरा झाडाला पाणी घालत असलेल्या हेनरीच्याही लक्षात आला होता. संभाने घरात जाताना मध्येच थांबून हेनरीला आवाज देऊन विचारले,


"घरात मोठी हातोडी आहे का"? 


हेनरीने सांगितले,

"होय. स्टोर रूम मध्ये दरवाजाच्या बाजूलाच आहे". 


ऐेवढे ऐकून संभा स्टोर रूम मध्ये गेला. तिथून हातोडी घेतली. आणि मेरीच्या डॅडच्या रूममध्ये आला. पूर्वेकडील भिंतीवर कोपऱ्यात जोरजोराने हातोडीचे घाव घातले. आत मध्ये नेमके काय घडतय हे रुमच्या मागील खिडकीतून हेनरी गुपचूप डोकून बघत होता. जोराच्या आवाजाने मेरी संभाच्या रूममध्ये आली होती. समोरील भितींकडे बघून मेरीचे डोळे आणि तोंड तसेच उघडे राहिले. कारण समोरील भिंत ही पूर्ण सोनेरी दिसत होती. सोन्याचे अनेक बारिक बारिक बिस्किटच्या आकाराचे तुकडे तिथून खाली पडत होते. मेरीला आश्चर्य वाटत होते की, एवढे सारे सुवर्ण डॅडच्या रूम मध्ये केव्हा आले? आणि कसे? ती संभाला काही विचारेल तेवढ्यात संभाने एक बोट ओठांवर ठेऊन गप्प बसण्याचा इशारा केला. तसे मेरी पण शांत बसली. संभा मेरीसोबत बोलू लागला,

" हे बघ एवढे सर्व सोन घेऊन आपण इंडियामध्ये जाऊ. तिथे अनेक सोनार लोकांसोबत माझ्या ओळखी आहे. इथल्यापेक्षा आपल्याला तिकडे ह्या सोन्याचे जवळपास दुप्पट पैसे मिळतील. अडचण फक्त विमानतळावर आहे. त्यामुळे सोनं डिटेक्ट होणार नाहीत अश्या पाचसहा मोठ्या बॅगा आपल्याला लागतील. तेवढा बंदोबस्त आपण करू. आणि आजच रात्री इंडियामध्ये निघून जाऊ. प्रोटेक्टीव बॅगा मी ओळखू शकतो. रूमच्या खिडक्या आणि दरवाजा व्यवस्थित बंद कर आणि लवकर बाहेर ये, मी कार मध्ये तूझी प्रतिक्षा करतो". 


एवढे बोलून संभा झपाझप पाउले टाकत बाहेर निघून गेला. संभाने सांगितलेलं काम आटोपून मेरी लवकरच बाहेर आली. संभाने हेनरीला आवाज देऊन बोलवून घेतले आणि संध्याकाळ पर्यंत घराकडे लक्ष देण्यास सांगितले. त्याने होकारदर्शी मान हलवली.

     

मेरी आणि संभा कार मध्ये बसले. संभाने वेगानेच कार चालवणे सुरु केले. न राहवून मेरीने संभाला प्रश्न केला की आपण एवढे सोनं घेऊन कसे जाणार? आणि रूममध्ये तुम्ही मला गप्प बसण्याचा इशारा का केला होता?. संभा तिला म्हणाला,

"तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच मिळणार आहे. बऱ्याच रहस्यमय गोष्टींचा तुम्हाला उलगडा होईल. मी सर्व प्रश्नांची उत्तरे आज रात्री देईल. आता मला फक्त पोलिस स्टेशनचा रस्ता सांगा". 


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Action