सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ५
सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ५
"पंधरा मिनिटांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर काळोख्या अंधारातही केव्हातरी घरात मध्यांनी शितळ प्रकाश पडावा. त्या शितळ प्रकाशात आपल्याला सुंदर चेहऱ्यांचा अनुभव व्हावा. चेहरा बघताना कितीतरी वेळ तसेच स्वतामध्येच हरवून जावे, स्वतःच्या डोळ्यात सूर्याचे तेज दिसावे. दुरदृष्टिकोनाने त्याच सूर्य किरणांच्या उदगमतेचे स्थान शोधावे. सूर्याची किरणे मनाच्या भितींवर उमटून सोनेरी किरणांनी आयुष्य प्रकाशमय करून घ्यावे".
चिठ्ठी वाचून झाल्यानंतर जरासे प्रश्नार्थक चेहऱ्यानेच संभाने ती चिठ्ठी स्वतःकडे ठेऊन घेण्याची परवानगी मेरी कडून मिळवली. मेरीनेही निसंकोचपणे डॅडने लिहिलेली ती शेवटची चिठ्ठी संभाकडे सुपूर्द केली. आणि पूढे बोलू लागली.
”माझ्या रूममधील एसी मध्ये बिघाड झाल्यामुळे एसी बंद झाला होता. त्यामुळे मी डॅडच्या रूममध्ये झोपू लागले होते. एके दिवशी रात्री बारा- एकच्या दरम्यान दारावर टकटक झाल्याचा आवाज आला. मी झोपेतून उठून दरवाजा उघडला. दारात उभ्या असलेल्या व्यक्तिला बघून माझा आनंद द्विगुणित झाला होता. माझे भान हरपले होते. मी पळत जाऊन त्या व्यक्तिला मिठी मारली. आणि रडू लागले. रडतच जोराने विचारू लागले की "सांगा डॅड मला एकटीला सोडून कुठे गेले होते तुम्ही? आय मीस यू सो मच डॅड, मीस यू सो मच". दरवाज्यात उभी असलेली व्यक्ती माझे डॅड होते. मी त्यांना आत मध्ये घेऊन आले. त्यांना खूर्चित बसविले. आणि आनंदाने पळत जाऊन फ्रिज मधून थंड पाण्याची बाटली घेऊन आले होते. परंतु खूर्चि जवळ येताच माझ्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणार्धात उडून गेला होता. खूर्चित कुणीही बसलेले नव्हते. आणि दरवाजा पण आतून बंद होता. इतका वेळ कुठेतरी भरकटलेले माझे मन भानावर आले होते. डॅडला स्वर्गवास होऊन पाच दिवस झाले होते. मला ते उपस्थित असल्याचा भितीदायक भास झाला होता. स्वतःला कसेबसे समजावत बेडवर जाऊन झोपले. डॅडचा विचार करत करत केव्हा झोपी गेले होते समजलेच नाही.
"मेरी, डीयर कम हियर फास्ट टू डू एक्सरसाईज"
माझी मैत्रीन एलियानाचा हा आवाज मला पहाटे ऐेकायला आला. मी अंगावरचे ब्लॅकेंट बाजूला सारून खिडकीतून बाहेर डोकावले. अंगणात एलियाना उभी होती. मला व्यायाम करण्यासाठी बोलवत होती. मी पळतच अंगणात गेले. परंतू एलियाना आता तिथे उभी नव्हती. मी तिला बरेच आवाज दिले. बागेतील झाडांना पाणी घालत असलेले आजोबा घाईने माझ्याकडे येत म्हणाले की,
"मालकीणबाई इथे कुणीही नाही. तुमची मैत्रीन हे जग सोडून केव्हाच गेली आहे. तुम्हाला तिच्याबद्दल काही भास झाला असेल".
मी पण तसेच काहीतरी झाले असेल असे समजून घरात निघून गेले. आता तर मला दिवसासुद्धा घरात कुणीतरी भिरत असल्याचा भास होऊ लागला होता. केव्हा केव्हा आजोबांचा चेहरासुद्धा मला जेम्स अंकल किंवा डॅड सारखा असल्याचा भास होत होता. दिवसेंदिवस माझी मनस्थिती पूर्णपणे खालावली होती. अनेक मानोसपचार तज्ञांकडे जाऊनही मला काही फरक जाणवत नव्हता. एके दिवशी रात्री झोपलेले असताने माझे शरीर मला अचानकपणे जड वाटू लागले. श्वास घेण्यासाठी मला त्रास होऊ लागला. मोठमोठी नखे असलेले दोन हात माझ्या मानेभोवती घट्ट होऊ लागले होते. मी डोळे उघडून घाबरतच समोर बघितले. पापण्यांची उघडझाप थांबून माझे डोळे भितीने मोठे झाले होते. श्वासोच्छवासाची प्रकिया वाढली होती. डोक्यात कुठेतरी विज चमकून गेल्याचा भास झाला होता.कारण माझ्या अंगावरती एलियाना बसलेली होती.माझ्या मानेभोवतीचे हात घट्ट करून माझा श्वास थांबवू बघत होती. मी सुटण्यासाठीचे सर्व केविलवाणे प्रयत्न करून थकले होते. परंतू आता वाचण्याचा कुठलाच मार्ग दिसेना. शेवटी असेल नसेल तेवढी शक्ती एकवटली आणि दोन्ही हातांनी एलियानाला एक जोरदार धक्का दिला. तशी ती धाडकन बेडवरून कोसळण्याचा आवाज आला होता. मी घाईने रूम मधील सर्व लाईट चालू केले. कोपऱ्यात असलेला रॉड हातात घेऊन सगळीकडे बघितले परंतू आता रूम मध्ये कुणीच नव्हते. मी अतिशय भयभीत झाले होते. तिथे त्या भूतांच्या घरात थांबणे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेले होते. मी दुसऱ्याच दिवशी इकडे इंडियामध्ये आत्त्याकडे येण्याचा निर्णय घेतला. मी जाण्याची तयारी रात्रीच करून ठेवली होती. चातक पक्षी जसे पावसाच्या पाण्याची प्रतिक्षा करतो. त्याप्रमाणे मी सकाळ होण्याची प्रतिक्षा करू लागले होते.
सकाळी लवकर आटपून एअरपोर्ट वर गेले. तिथे इमरजंसी पासपोर्ट आणि विझ्झा मिळवण्याची विनंती केली. तेथील कर्मचार्यानी मला दुपारच्या दोन वाजेपर्यंत पासपोर्ट विझ्झा देण्याचे कबूल केले. मी त्यांचे आभार मानून घरी आले. घराच्या सर्व चाव्या आजोबांकडे देऊन त्यांना घराची आणि बागेची काळजी घेण्यास सांगितले. त्यांनीही ते काम करण्यास सम्मती दर्शवली. दुपारी एअरपोर्टला जाऊन पासपोर्ट व विज्जा प्राप्त केला आणि विमानाने इंडियामध्ये आले. तिथून पुढे काय झाले याची सर्व माहिती तुम्हाला आहे. डॅड ने आमहत्या केली असे पोलिसांनी आणि डॉक्टरांनी मृत्युपत्रात नोंदवले आहे. परंतू माझे डॅड खूप साहशी होते. त्यांनी सर्व काही केले असते, पण आत्महत्या कधीच केली नसती. यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. माझ्या वडिलांना व मला योग्य न्याय मिळावा आणि त्या घरातील भूंताचा प्रतिबंध व्हावा. जेणेकरून माझ्या जिवाचा धोका टळेल. हीच अपेक्षा घेऊन मी तुमच्या पर्यंत आले. नाहीतर ती भूते डॅडप्रमाणे लवकरच मलाही मारतील याची मला खात्री आहे. मी कुठलीही गोष्ट न लपवता मोठ्या विश्वासाने तुम्हाला सर्व हकिकत सांगितली आहे. कृपया माझी मदत करा. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहिल".
संभाने मेरीला दोन दिवसांची मुदत मागून बिनधास्त राहण्याचे आश्वासन दिले. आणि म्हणाला,
"आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा पडताळा करण्यासाठी आणि ही केस पूर्णत्वास नेण्यासाठी कॉलिफोर्नियाला जावे लागेल. मी माझे सर्व कामे करून दोन दिवसानंतर शिमल्यामध्ये येईल. तुमचा फोन नंबर आणि पत्ता टेबलवरील डायरीत लिहून ठेवा".
(क्रमशः)
