STORYMIRROR

Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

3  

Dr.Surendra Labhade

Action Crime Thriller

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ४

सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ४

5 mins
240

अजूनही प्रत्येक पहाटे मला साद घालत स्पष्टपणे ऐकायला येतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात झोपाळ्यावर बसून सूर्याच्या दिशेने झोके घेत असताना मध्येच जेम्स अंकलचा एक हात हळूवारपणे डोळ्यांवर येऊन दुसऱ्या हाताने सुंदरसा गजरा किंवा एखादे छान फूल वेणीत लावल्याचा भास होतो. तर रात्रीच्या वेळेस जास्त वेळ अभ्यास करताना,

" बेटा, खूप वेळ झाला,आता अराम कर. अंधारात जास्त वेळ वाचल्याने डोळ्यांना त्रास होईल" 

हा रोबर्ट अंकलचा आवाज समोरच्या अंगणातून धावतच माझ्याकडे आल्याचा मला भास होत असे. आणि मी पुस्तक ठेऊन देत निद्राधीन होत असत. 

     

गेल्या सहा सात दिवसांत एक आजोबा दोन-तिन वेळेस काम मागण्यासाठी डॅड कडे आले होते. परंतु डॅड ने त्यांना कामावर घेण्यासाठी नकार दिला होता. त्या आजोबांची एवढी कळकळीची विनंती बघून मला त्यांची दया आली होती. मी डॅड कडे त्या आजोबांना नोकर म्हणून ठेऊन घेण्याची विनंती केली.मी बऱ्याच वेळेस केलेल्या विनंतीमुळे डॅडने आजोबांना कामावरती घेण्यास होकार दिला. परंतू डॅडने त्यांना सक्त बजावले होते की, माझ्या परवाणगी शिवाय घरामध्ये यायचे नाही. इतर वेळेस तूम्ही बागेतील कामे करू शकता. आजोबांना कामाची नितांत आवश्यकता होती, तर ते पण जास्त काही न बोलता सम्मतीदर्शक मान हलवून कामासाठी रूजू झाले होते. त्यांचे नाव होते मिस्टर हेनरी.

     

काही दिवसानंतर एके दिवशी सकाळी मला डॅडचा चेहरा थोडासा चिंताजनक वाटला. त्यामुळे मी डॅडला त्यामागचे कारण विचारले. डॅड ने सांगितले की,

"बेटा, माझ्या चिंतेचे कारण तसे जास्त मोठे नाही. आज पहाटे बऱ्याच दिवसांनंतर जेम्स अंकलचे स्वप्न पडले. त्याचा विचार करत बसलो होतो. म्हणून कदाचित तुला माझा चेहरा चिंताग्रस्त दिसत असेल". 


त्या दोघांचे एकमेकांबद्दलचे प्रेम मी ओळखून होते. त्यामुळे मी डॅडचा उजवा हात माझ्या दोन्ही हातांच्या तळव्यात घट्ट पकडून सहानुभूतीदर्शक शब्दांत डॅडला म्हणाले,


"डॉन्ट वरी डॅड, सगळे ठिक होईल, बी रिलेक्स". 


डॅडला पण माझ्या शब्दांचा काहीसा आधार वाटला असावा कारण आता त्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर कळी उमलावी त्याप्रमाणे स्मित हसू उमलले होते. दोन-तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा डॅडच्या चेहऱ्यावर मला काहीसा गंभीरपणा जाणवला. नेहमी सकाळी डॅडचा चेहरा हसतमुख असायचा. परंतू हल्ली जरा त्यांच्यात काहीसा बदल जाणवू लागला होता. मी त्यांच्याजवळ जाऊन तब्बेतीची विचारपूस केली. त्यांच्या गंभीरपणाचे कारण विचारले. त्यावर त्यांनी सांगितले की,

“आज रॉबर्ट अंकल स्वप्नात आले होते. ॲक्सिडेंट झालेल्या त्याच स्थितीत रक्ताळलेल्या चेहऱ्याने डोळे विस्कारून आणि मिस्किलतेने हसून ते माझ्याकडे बघत होते. मी डोळे उघडल्यानंतरही त्यांची तिच प्रतिकृती माझ्याकडे कितीतरी वेळ बघून हसत होती. हल्ली असले भास मला का होताहेत काही समजेना". 


त्यावर मी डॅडला समजावत म्हणाले की,

" जेम्स अंकल आणि रॉबर्ट अंकल हे तुमचे अतिशय जवळचे आणि चांगले मित्र होते. तुम्ही त्यांच्या सोबत जास्त वेळ घालवला आहे आणि आता त्यांचा असा अचानक देहांत झाला. तुमच्या डोक्यात सतत त्यांचे विचार असल्या कारणाने त्यांचा तुम्हाला भास होत असेल. तुम्ही तुमचे लक्ष दूसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करा. असले भितीदायक आभास होणे बंद होईल". 


त्यानंतर त्यांनी थोडेसे स्मित हास्य करून होकारअर्थी मान हलवली आणि माझ्या डोक्यावर त्यांच्या प्रेमळ हाताने गुंजारून कामानिमीत्त बाहेर निघून गेले होते. 

      

प्रत्येक दिवशी डॅडला भास होण्याचे प्रमाण हळू हळू वाढू लागले होते. सुरवातीला त्यांना असे भास फक्त रात्रीच होत असत. परंतु आता तर त्यांना दिवसाही रॉबर्ट आणि जेम्स अंकलचे भूत दिसायला लागले होते. डॅड व मी घरापासून थोड्याश्या अंतरावरती असलेल्या चर्चमध्ये दररोज सांयकाळी जायला लागलो होतो. तिथेच थोडाफार वेळ डॅडला बरे वाटायचे. परंतू कधी-कधी चर्च मधील येशु ख्रिस्तांच्या मूर्तीत सुद्धा त्यांना रॉबर्ट अंकल दिसायचे. मला त्यांची खूप काळजी वाटू लागली होती. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली होती. शहरातील अनेक नामवंत डॉक्टरांकडे जाऊनही डॅडला काहीही फरक पडत नव्हता. 

      

पक्ष्यांचा किलबिलाट, सकाळची थंड हवा, सूर्याची सोनेरी किरणे, फुलांवरती आणि झाडांवरती पडलेले धुके, ह्या सर्व मनमोहक गोष्टींचा आनंद घेत मी सकाळी गच्चीवर उभे होते. थोड्यावेळाने डॅड मला अंगणात दिसले. मी डॅडला आवाज दिला. त्यांनी काही क्षणासाठी वरती बघितले व पुन्हा समोर बघू लागले. मला त्यांच्या डोळ्यांत भिती आणि चेहऱ्यावर गंभिरतेची, आणि अविश्वासाची छटा स्पष्टपणे दिसली होती. ते अंगणात उभे राहून कुणातरी सोबत बोलण्याचे हावभाव करत होते. परंतू त्यांच्या समोर कुणीही उभे नव्हते. थोड्यावेळाने ते अंगणातील कोपऱ्यावर असलेल्या विहिरीच्या दिशेने ओढत्या पावलांनी चालू लागले होते. असे वाटत होते की, डॅड तिकडे स्वतः चालत जात नसावेत. त्यांना कुणीतरी तिकडे ओढत नेत आहे. मी आता पुरते घाबरले होते. मी गच्चीवरून डॅडला जोर जोरात आवाज देऊ लागले होते. परंतू डॅड माझ्या एकाही हाकेला प्रतिसाद देत नव्हते. मी जिन्यावरून खाली पळतच गेले. डॅड विहीरीच्या कडेला समोर हात करून कुणातरी सोबत बोलत होते. घाबरलेल्या आवाजात नाही नाही बोलत होते. मी अंगणातून डॅडच्या दिशेने पळतच सुटले होते, परंतू तिथे पोहचण्याच्या आतच डॅडने विहीरीत उडी घेतली होती. शेजारील आणि रस्त्याने जाणाऱ्या लोकांना मी मोठमोठ्याने आवाज देऊन डॅडला वाचविण्यासाठी कळकळीची विनंती करत होते. थोड्यावेळात बरेच लोक जमा झाले. पोहता येणाऱ्या व्यक्तिंनी विहिरीत उडी मारून काहीशा प्रयत्नानंतर डॅडला वर काढले. परंतू आता त्याचा काही फायदा नव्हता. वेळ निघून गेली होती. माझे डॅड आ...ता स्वर्ग...वासी... पुढिल शब्द मेरीच्या तोंडातून फूटेनात. समोरच्या खूर्चित बसलेला संभा मेरीच्या जवळ गेला. आणि सांत्वन करु लागला. तिचे दुःख अनावर झाले. तशी ती संभाच्या खांद्यावर डोके ठेऊन ओक्साबोक्शी रडू लागली. थोड्यावेळाने समजावत संभाने पुन्हा तिला खूर्चित बसवले. मेरीच्या गालावरती ओघळलेले अश्रू पुसण्यासाठी संभाने खिशातील रुमाल काढून मेरीच्या हातात दिला. शांत करत संभाने तिला पिण्यासाठी पाणी देऊन पुन्हा खूर्चित जाऊन बसला. काही वेळाने मेरी दुःखातून बाहेर आली. संभाने तिला थोडावेळ शांत बसून रिलॅक्स होण्यास सांगितले. 

     

मेरी आता पूर्ववत आणि शांत झालेली आहे, हे बघून संभाने तिला पुढील माहिती सांगण्यास सुचविले. तशी मेरीही हळू आवाजात पूढे सांगू लागली. 


"डॅडचा अंत्यविधी झाल्यानंतर मी घरी आले. त्यांची रूम आवरण्याच्या हेतूने मी त्यांच्या रूम मध्ये गेले. बेड जवळील टेबलावरती मला एक अर्धवट लिहिलेली न समजणारी परंतू आयुव्याबद्दल चांगला संदेश देणारी चिठ्ठी सापडली". 


हातातील पर्स मधून ती चिठ्ठी काढून संभाच्या दिशेने पुढे करत मेरी सांगू लागली. 

"कदाचित डॅड सकाळीच ती चिठ्ठी लिहीत असावे. मेरीकडून ती चिठ्ठी हातात घेऊन संभा ती वाचू लागला.

 (क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Action