सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ३
सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग ३
डॅड खिडकिच्या दिशिने धावतच आले. त्यांनीही खिडकीतून आत डोकावून बघितले. जेम्स अंकल खाली पडलेले होते. आम्ही बऱ्याचदा आवाज दिला. परंतू अंकलचा काहीही प्रतिसाद नव्हता. म्हणून आम्ही पळतच दरवाज्याच्या बाजूने गेलो. क्षणाचाही विलंब न लावता,तिथे पडलेल्या एका दगडाच्या सहाय्याने डॅडने कुलूप तोडले. आम्ही धावतच जेम्स अंकल पडले होते त्या ठिकाणी पोहचलो. जेम्स अंकल खाली तोंड करून फर्चिवर पडलेले होते. थोड्याफार माश्या अंकलच्या आवतीभोवती घोंघावत होत्या. त्यांच्या उजव्या हातामध्ये एक काठी होती. त्यांच्या शरीराच्या उजव्या बाजूला थोड्याश्या अंतरावर एक साप मृतावस्थेत पडलेला होता. सापाच्या पाठीमागील अर्ध्या बाजूला काठीने मारून मारून जेम्स अंकलने त्याचे शरीर छिन्नभिन्न करून टाकलेले होते. डॅडने खांदे पकडून अंकलचे तोंड वरच्या बाजूने केले. निरागस, आनंदी, आणि खळखळून हसणारा अंकलचा चेहरा काळाठिक्कूर पडला होता. त्यांच्या डोळ्यातील बाहुल्या वरच्या दिशेने बघण्याचा निर्देष करत होत्या. श्वासोच्छवासाची प्रकिया पूर्णपणे बंद पडलेली होती. त्यांचे डोके हळूवारपणे आपल्या मांडीवरती घेऊन डॅड रडायला लागले होते. त्यांच्यासोबत माझेही उर दाटून आले होते, आणि मनाचा बांध तोडून अश्रू डोळ्यांतून घळाळू लागले होते. त्या निर्दयी सर्पाने अंकलचा जीव घेतला होता. अंकलच्या उजव्या पायाला सर्पाने दंश केला होता. त्यांनी पण काठीच्या सहाय्याने सर्पाला मारले होते. परंतु त्यांना मदत करण्यासाठी लवकर कुणी आले नसावे, म्हणूनच हे सर्व झाले असेल. काही वेळानंतर शोक आवरून तेथील काही लोकांच्या सहाय्याने अंकलचा अंत्यविधी करून शोकाकूल अवस्थेत आम्ही घरी आलो.
अंकलच्या मृत्यूला आता बरेच दिवस झाल्यामुळे आम्ही हळूहळू दुःख विसरून गेलो होतो. परंतू दरवाज्यावर थाप पडल्यास केव्हा केव्हा बाहेर अंकलच उभे असल्याचा भास होत असे. आमच्या घराच्या बाजूलाच काही दिवसांनी डॉ. रॉबर्ट यांचे हॉस्पिटल चालू झाले. डॉ. रॉबर्ट हे मानसोपचार तज्ञ होते. ते हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर त्यांची मुलगी एलियाना सोबत राहत होते. एलियाना गोरी,नाजूक आणि जेमतेम माझ्याच वयाची होती. दोघांचाही स्वभाव अगदी मनमिळाऊ, बोलका आणि हसरा होता. त्यामुळे त्यांची लवकरच आमच्या सोबत चांगल्या प्रकारे ओळख झाली. डॅड पण बऱ्याच दिवसांपासून हास्य विसरले होते. परंतू जशी रॉबर्ट अंकल सोबत मैत्री झाली, तसे त्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा हसू खुलू लागले होते. मलाही एक चांगली उत्कृष्ट मनामिळाऊ मैत्रीन मिळाल्यामूळे आमचा बराचसा वेळ गप्पा मारण्यात आणि हास्य विनोदामध्ये जाऊ लागला होता. एलियाना पण तिच्या पित्याप्रमाणे वैद्यकिय शिक्षण घेत होती. माझ्या आईप्रमाणेच एलियानाची आईसुद्धा तिला लहान पणीच सोडून गेल्याचे मला तिच्याकडून कळाले होते. त्या दोघांना सकाळी उठून योगासने आणि व्यायाम करण्याची खूप चांगली सवय होती. आणि त्यांच्यामुळे डॅडला व मला हळू हळू सकाळच्या व्यायामाची सवय झाली होती. डॅड पण बराच वेळ रॉबर्ट अंकलसोबत गप्पा मारण्यात वेळ घालवत असे.
आठ नऊ वाजण्याची वेळ असेल. मी अंघोळ वैगेरे आटोपून नुकतेच अभ्यास करत बसले होते. तसे इतर वेळेस मी लवकर आवरत असे. परंतू काल एलियाना तिच्या डॅड सोबत कुठेतरी फिरण्यास गेलेली होती. आणि ते तिकडेच मुक्कामी थांबलेले होते. त्यामुळे मला लवकर उठविण्यासाठी आज कुणी नव्हतेच. डॅड मला झोपेतून केव्हाच उठवत नसत. त्यामुळे आज माझे उशीराच आटोपले होते. दुरवर कुठेतरी भरधाव येणाऱ्या चारचाकी गाडीचा आवाज येत होता. तो आवाज आता जवळ येत होता. थोड्याच वेळात एक जोरात आवाज आला. मी घाईतच जाऊन बघितले. तर ती कार रॉबर्ट अंकलच्या घरासमोरील गेट वरती येऊन आदळली होती. भक्कम गेट तोडून ती कार त्यांच्या अंगणातील नारळाच्या झाडाला टक्कर घेऊन शांत झाली होती. लाल कलरची ती कार रॉबर्ट अंकलचीच होती. डॅड व मी पळतच तिथे पोहचलो. आम्ही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागलो. परंतू झाडावर कार जोराने लागल्यामुळे कारचे दरवाजे लॉक झाले होते. अंगणात पडलेल्या रॉडच्या सहाय्याने आम्ही दोन्ही पण बाजूच्या काचा फोडल्या. एलियानाचे डोके समोरील स्टेरिंग वर जोराचे आपटल्यामुळे डोके फुटून रक्ताचे ओघळते थेंब गालावरून घाली पडत होते. रॉबर्ट अंकलचे पण डोक फुटले होते. डॅड ने आणि मी त्यांना दोघांना बाहेर काढले. त्यांना आवाज दिला, हलवून बघितले परंतू ते बेशुद्ध असावेत असे आम्हाला वाटले. मी पळत जाऊन घरातील दोन स्वच्छ कापडे आणलीत आणि त्यांचे डोके बांधली. जेणेकरून रक्तश्राव होणे थांबले होते. तोपर्यंत डॅडने नजीकच्या हॉस्पिटला कॉल करून तातडीची मदत मागितली होती. आम्ही दोघांच्याही नाकासमोर हात लावून बघितला परंतू दोघांचाही श्वासोच्छवास बंद होता. मनगटाच्या नकळत खाली अंगठ्याच्या बाजूने दोन बोटांनी दाबून आपण पल्स चेक करू शकतो. सामान्यता नॉर्मल व्यक्तिचा पल्सरेट हा साठ ते शंभर प्रती मिनिट असतो. पल्स चालू आहे किंवा नाही यावरून समोरचा व्यक्ती जिवंत आहे की नाही याचे अनुमान आपण लावू शकतो. ही माहिती मला एलियानानेच दिलेली होती. त्याप्रमाणे मी दोघांचेही पल्स चेक करून बघितले. माझे डोळे पाणावले होते, हृदयाची धडधड वाढली होती. तोंडातले शब्द बाहेर निघेनात .
"हे देवा, असे नाही होऊ शकत. कदाचित मला व्यवस्थित माहिती नसल्या कारणाने पल्स चेक करता येत नसतील".
असे मी स्वतःशी बोलू लागले होते. कारण त्या दोघांचेही पल्सरेट पूर्णपणे बंद होते. थोड्याच वेळात सरकारी ॲम्बुलस जोराचा आवाज करत थेट गेट मधून आत आली. त्यातून दोन व्यक्ति खाली उतरले. डॅडच्या मदतीने त्यांनी दोघांनाही ॲम्बुलस मध्ये व्यवस्थित झोपवले आणि आली त्याच वेगाने ॲम्बूलस निघून गेली. डॅड पण त्यांच्यासोबत हॉस्पिटल मध्ये गेले होते. पाठमोऱ्या गाडीकडे बघत मी देवाला प्राथना करत होते.
" देवा, प्लिज अंकलला आणि माझ्या मैत्रीनीला सुखरूप घरी येऊ दे".
दारासमोरील पायरी वरती बसुन मी डॅड ची वाट बघू लागले होते. बऱ्याच वेळाने घरासमोरील रस्त्यावर एक रिक्षा थांबली. रिक्षातून डॅड उतरले. रॉबर्ट अंकल आणि माझी मैत्रीन एलियाना यांच्या तब्बेतीबद्दल विचारण्यासाठी मी धावतच डॅडकडे गेले. मी डॅडला त्यांच्या बद्दल विचारू लागले. परंतू डॅड काही बोलतच नव्हते. त्यांचा पडलेला चेहरा, डोळ्यांतील अश्रू, आणि निस्तब्धपणा बघून माझे पायच गळाले होते. बराच वेळ विचारल्या नंतर डॅड च्या तोंडातून फक्त चारच हृदय हेलावून टाकणारे, डोक्यात खोल पर्यंत मुंग्या आणणारे शब्द निघाले,
" दे आर नॉट मोर".
आता आमचा दोघांचाही सय्यमाचा बांध तुटला होता. आणि आम्ही बराच वेळ एकमेकांच्या गळ्यात पडून रडलो. सरकारी डॉक्टरांनी चेक करून दोघेही मृत असल्याचे घोषित केले होते. रात्रीचे जवळपास अकरा-बारा वाजलेले असल्या कारणाने डॅडने त्या दोघांचेही शव सकाळपर्यंत हॉस्पिटल मधील मॉरचूरी मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आणि ते रिक्षाने घरी आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटमधून त्या दोघांचेही शव घेऊन ॲम्बुलस आली. आम्ही एलियाना आणि रॉबर्ट अंकलचे अंतिम दर्शन घेऊन त्यांचा अंत्यविधी पार पाडला. भरल्या हृदयाने जड पावले टाकत आम्ही घरी गेलो होतो.
आमच्या आयुष्यात नियतीने जणू काही दूखांचा सापळाच रचलेला होता. मी लहान असताना आई स्वर्गवासी झाली. ज्या अंकल कडून आईचे प्रेम आणि पित्याचे वास्तल्य मिळत, ते अंकलपण सोडून गेले होते. आणि जे व्यक्ति काही दिवसांपूर्वी आयुष्यात आले होते. ते रॉबर्ट अंकल आणि एलियाना सुद्धा नशीबाने दूर नेले होते. डॅड आणि मी अनेक वेळेस यासर्वांच्या आठवणीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करायचो. परंतू पहाटेच्या पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये एलियानाने मला दिलेला तो आवाज,
"मेरी, डियर फ्रेंड. कम हिअर फास्ट टू डू एक्सरसाईज".
( क्रमश: )
