सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग १
सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग १
जसे अंजनीपुत्राने आपले दोन्ही हात पसरवुन सुर्याला गिळंक्रुत करण्याठी अाकाशात झेपावे, त्याप्रमाणे धरनी मातेच्या व्रूक्षरुपी पुत्र पदम आणि ब्राम्हनी यांनी आपले बाहुपाश आकाशात पसरवुन सुर्य किरने गिळंक्रुत करुन जमीनी वरती शितळ प्रकाश प्रेरीत केला होता. वाळलेल्या व्रुक्षांची पाने जशी हवेच्या झोताने गिरक्या घेत हळुवार पणे जमीनी वरती पडावी तसे बारीक बारीक बर्फाचे तुकडे संथपने जमीनीवरती पडत होती. जसे हळव्या आणि मनमोकळ्या मनाने स्वप्नांच्या बागेत स्वछंद पने लपंडाव खेळावा, आणि कोमेजुन गेलेल्या मनाच्या ओंठावर मंद स्मित फुलवावे. तसे मंद आणि गार वारा व्रूक्षवल्लींमधुन फिरुन त्यांच्या पानांना गुदगुदल्या करुन खळखळ हसवत होता. परिजातकाच्या झाडाखाली जसा सडा पडावा आणि आजुबाजूच्या वातावरणात सौंदर्याची भर घालावी त्याप्रमाने आकाशातुन बर्फाचा बारीक सडा पडुन जमिनीचे सौंदर्य फुलले होते. उन लागु नये म्हणुन आई जसे आपल्या मुलाला कुशीत घेऊन अंगावरती मऊ मखमलिचे पांघरुन घालते त्याप्रमाने हिमालयातील उंच डोंगरांना अकाशाने आपल्या कुशीत घेवुन त्यांवरती बर्फाचे पांगरुन घातले होते.
हिमालयातील ह्या सगळ्या मोहक वातावरणाचा आनंद घेत, डिटेक्टिव संभा आपल्या घरासमोरील बागेत तर्कशास्राचा अभ्यास करत कसला तरी तर्क लावत बसला होता. वयाने लहान असला तरी ज्ञानाचा आणि अनुभवांचा झरा त्याच्या डोक्यात नेहमी वाहायचा. सहा फुट ऊंच,साळस माश्यासारखे सुंदर डोळे,पण गरूडा सारखी दुरवरूनही नेमके भक्ष शोधावे तशी धारदार नजर,उभा चेहरा,कसलाही सुक्ष्म आवाज झाला तरी त्या आवाजाला टिपणारे लक्षवेधी कान,भरदार छाती,हरणासारखे चपळ शरीर,रंगबदलविणार्या सरड्या सारखे तोही आपला पोषाख,आणि पेहराव बदलण्यात चालाख.
नेहमी वाचण्याची आवड,वेळ मिळेन तिथेच वाचणात तल्लीन होउन जायचा. अनेक भाषांवरील आणि विषयांवरील परीपक्व ज्ञान. रसायनशास्राचे नेहमीचेच अवघड पण त्याच्यासाठी सोपे वाटणारे प्रयोग. एकदा की एखादा प्रयोग करण्यास किंवा कसले पुस्तक वाचन्यास घेतल्यास तो तासंनतास त्यातच गुंग झालेला असे. फॉरेन्सिक विज्ञानामध्ये कमालीचे ज्ञान अवगत केले होते. कुणाच्यातरी अधिपथ्याखाली काम करने संभाला केव्हाच आवडत नव्हते,त्यामुळे त्याने खाजगी गुप्तचर होण्याचाच निर्णय घेतला होता. प्रत्येक निर्जीव वस्तू आपल्याला कुठल्या न कुठल्या प्रसंगाची माहिती सांगत असते परंतु ते ऐकण्यासाठी आपल्या चाणाक्ष नजरेवर भावनिक,काल्पनिक आणि तार्किक आच्छादनाचा चस्मा लागतो,अशी त्याची समजूत होती. गुन्हेगारांना पकडण्याच्या क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचे स्थान हे संभाचेच होते.
संभा सिगारेट ओढत उजवा पाय गुढग्यात मुडपुन डाव्या पायावर ठेउन सिगारेटचा धुर हवेत सोडत खुर्चीत बसला होता. सिगारेटच्या वाढत्या धुरासोबतच डोक्यातील विचारही वाढत चालले होते. इतक्यात दारावर थाप पडली,हातातील सिगारेट विझवुन समोरील टेबलावरती ठेउन संभाने दार उघडले. बाहेर एक मुलगी उभी होती. वय साधारण चोवीस-पंचवीस असेन. अतिशय सुंदर,पानीदार डोळे,सफेद आणि काहीसे काळ्या कलरचे मुलायम केस,गुबगुबीत गाल,तंबाट्या सारखे लाल ओठ,एखाद्या छान तलावाच्या कडेला सुंदर एका रेषेत छानशी फुलबाग असावी आणि त्या बागेमुळे तो तलाव सुबक दिसावा त्याप्रमाणे तिच्या पाणीदार डोळ्यांसभोवतीच्या रेखीव पापण्यामुंळे ती अतिशय आकर्षक वाटत होती. परंतु तिचा चिंताजनक चेहरा, तिच्या मनातील काहितरी व्यथा सांगत होता. तिचा पेहराव आणि राहनीमान बघुन ती नक्कीच भारतातील नाही याचा अंदाज येत होता.
"डिटेक्टिव संभा तुम्हिच का?"
तिने विचारले.
“हो तुम्ही योग्य पत्त्यावर आलेले आहात”
असे बोलुन संभाने तिला आदरपुर्वक आतमध्ये बोलावले,बसण्यास खुर्ची दिली. ती थोडिसी शांत झाल्यावर संभाने येण्याचे कारण विचारले. तिचे बालपण भारतामध्येच गेलेले असल्याकारणाने तिला हिंदि भाषेची बऱ्यापैकी ओळख झालेली होती.
“माझे नाव मेरी. मी मुळची अमेरीकेत असलेल्या कैलिफोर्नियातील क्यामरेल गावची. शिमला मध्ये माझी आत्या राहते. काही दिवसांनपुर्वीच मी भारतात आले,ते खुप काही दु:ख घेवुन. काही प्रसंग आठवले की मला खुप भिती वाटते आणि हल्ली मी झोप तर पुर्णपणे विसरले. माझी ही परिस्थिती माझ्या आत्याला काही बघवत नव्हती. तिने मला अनेकदा तुमच्याकडे येण्याचा सल्ला दिला पण मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायची. पण माझी भिती दिवसेंदिवस वाढतच चालली होती. त्यामुळे न राहवुन आज तुमच्याकडे येण्याचा निर्णय घेतला”.
अजुनही ती गोंधळलेल्या अवस्थेतच बोलत होती.
“माफ करा पण मला येण्यास जरा उशीर झाला. मी सकाळी लवकरच उठली होती परंतु”...(तिच्या चेहऱ्यावरील अविश्वासाची छटा आणि बोलण्यातील अडखळता पना पाहून संभा तिचे बोलणे मध्येच थांबवत बोलू लागला...)
“परंतु सकाळी तुम्हाला रेल्वे स्थानकावरती जाण्यासाठी कुठलीच गाडी लवकर मिळाली नाही. त्यामुळे बराच प्रवास तुम्ही पायी केला. रेल्वे स्थानकावर पोहचल्यानंतर तुम्हाला समजले की काही वेळेपुर्वीच रेल्वे निघुन गेलेली होती, त्यानंतरची रेल्वे काही वेळानंतर होती परंतु काही काही अडचणीमुळे ती रेल्वे येण्याची रद्द झाली, मग तुम्ही खाजगी गाडी करुन नेरुळ पर्यंत अालात, तिथे बराच वेळ वाट बघितल्यानंतर तुम्ही रामलाल यांच्या लाल रंगाच्या घोडा-गाडी मध्ये उजव्या बाजुला बसुन किमान एक तास प्रवास केला त्यातील अर्धा तास तुम्हाला प्रवास चांगला झाला असेल आणि उरलेला वेळ एकदम कंटाळवाना,घोडा गाडीतुन उतरल्यानंतर काहीश्या अंतरांपासुन तुम्ही पायी चालुन तुमचा इथपर्यंतचा प्रवास पुर्ण केला. आणि या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला इथपर्यंत पोहचण्यास उशीर झाला.”
हे सर्व ऐकुन मेरी अवाक् झाली. आपण योग्य आणि हुशार व्यक्तीकडे आलेलो आहे असे वाटुन तिच्या चेहऱ्यावर थोडेसे स्मित खुलले पण ते फार वेळ टिकु शकले नाही. तिच्या चेहऱ्यावरील स्मित हळु हळु कमी होवुन त्याची जागा आता एका गंभीर आणि चिंताजनक चेहऱ्याने घेतली होती. अनेक विचार तिच्या डोक्यात डोकु लागले होते,की का कुणास माहित ही व्यक्ती माझा पाठलाग तर करत नव्हती ना? मी येण्याची माहीती या व्यक्तिस कुणी दिली असावी? मावशी ने तर यांस कळवले नसेल? पण रस्त्याने तर दुसरे कुणी दिसत नव्हते. शेवटी न राहवुन तिने विचारले की तुम्ही ही माहीती इतकी हुबेहुब कशी सांगितली? कृपया मला सांगा. माझ्या मनात अनेक विचार गोंधळ घालत आहेत. तुम्ही सांगितल्यास गैरसमजुतीने माझ्या डोक्यात आलेले विचार पण थांबतील.”
समोरील टेबलावरील पाण्याचा भरलेला ग्लास उचलुन संभाने मेरीच्या दिशेने नेत तिला ग्लास घेण्यास सुचविले. आणि तिला धिर देत सांगण्यास सुरवात केली.
“तुम्ही इथे आल्यानंतर आत मध्ये प्रवेश केला त्यावेळेस तुम्ही एक चुळगळलेला कागद हातातुन खाली टाकला. ते रेल्वेचे टिकीट होते,त्यावरती रेल्वे टिकीट ऑफिसचा हिरव्या रंगाचा एक शिक्का आहे. प्रवाशांनी बुकिंक केलेल्या पण त्यांचा काही कारणोस्तव उशीर झाल्यामुळे निघुन गेलेल्या रेल्वेच्या बदल्यात त्या प्रवाशाला त्याच मार्गाने जाणार्या. दुसर्या रेल्वे मध्ये बसण्यास परवानगी मिळावी ह्या साठी हिरव्या रंगाचा शिक्का मारतात. ह्या वरुन असे समजते की तुम्हाला रेल्वे स्थानकावर पोहचण्यास उशीर झाला असावा. आणि त्यामुळे तुमची ट्रेन तुम्ही पोहचण्या अगोदर त्या स्थानकावरुन निघुन गेली. त्याच टिकीट वरती पुढील रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी तुम्ही तेथे उपस्थित असलेल्या स्टेशन मास्तर कडुन मिळवली. परंतु काही अडचणी मुळे नेरुळ कडे येणारी दुसरी रेल्वे रद्द झाली असावी. त्यामुळे तुम्हास राग आला असावा म्हणुन तुम्ही हातातील टिकीट चुरगाळुन खाली टाकले असणार पण त्या टिकीच्या मागिल भागावरती माझा पत्ता तुम्ही लिहीलेला होता हे लक्षात आल्यावर तुम्ही ते चुरगळलेले आणि टाकलेले टिकीट पुन्हा उचलुन घेतले असणार. सकाळी लवकर उठलात हे तुम्ही सांगितले पण तरीही तुम्ही रेल्वे स्थानकावर वेळेत पोहचले नाहीत म्हणजे तुम्हाला तिथपर्यंत पोहचण्यास काही साधन मिळाले नसल्यामुळे तुम्ही तुमचे घर ते रेल्वे स्थानक हा प्रवास पायी केला हे निश्चित. त्यानंतरची रेल्वे तुम्हाला मिळाली असती तर तुम्ही दुपारी एक वाजेपर्यंत इथे पोहचला असता. अाता तिन वाजलेत, म्हणजेच तुम्ही खाजगी वाहनामधुन प्रवास केला असेल. नेरुळ स्थानकापासुन इथपर्यंत येण्यासाठी फक्त रामलाल याच्या घोडागाडीची एकच सवारी उपलब्ध आहे. त्यांनी कालच त्यांच्या घोडागाडीला लाल रंग दिला आहे, आणि तोच रंग थोड्या प्रमाणात तुमच्या उजव्या अंगाला बाही वरती आणि पँट वरती लागलेला आहे, त्यानुसार तुम्ही घोडागाडीच्या उजव्या बाजुने बसले असावेत. रामलाल चा स्वभाव खोडकर,नेहमी बोलणारा आणि चेहरा हसरा आहे. तो कुणाचाही वेळ मारुन नेण्यात फार पटाइत असला तरी तो तेवढाच भित्रा पण आहे. अंधार आणि जंगल या गोष्टींना पुरता घाबरणारा आहे. नेरळ मधुन सवारीत बसल्यानंतर घोडा-गाडीच्या वेगाने अर्ध्या तासाच्या अंतरात फारशी झाडे नाहीत, आणि तेवढ्या वेळात रामपालची बडबड,आणि केव्हा जुनी तर केव्हा नविन गाणि त्याच्या मधुर सुरात सतत चालु असतात. नविन व्यक्तिस ती गानी समजली नसेल तरी त्याच्या मनमोहक सुरात आणि घोड्यांच्या टापांच्या व गाडीच्या चाकाच्या संगीतात ऐैकण्यास फारच रोमहर्षक वाटतात. त्यामुळे तुमचा अर्धा तासाचा प्रवास हा मजेत गेला असेल असे मी सांगितले. इथुन पुढिल प्रवासात दाट झांडामुळे थोडासा अंधार दिसतो. अंधारात बोलल्यास किंवा काहि अावाज केल्यास जंगली पिशाचर त्या आवाजाच्या दिशेने येवुन माणसाचे रक्त पितात असा रामलालल चा घोर परिपक्व समज आहे. त्यामुळे तिथुन पुढे तो एक शब्दही न बोलता अगदी शांत बसतो. सवारीत बसलेल्या व्यक्तिला सुद्धा तो बोलु देत नाही. इतक्या वेळ बडबड करणारा व्यक्ती अचानक पणे चेहरा गंभीर करुन इतका शांत का बसला असावा? हा विचार करत तिथुन पुढिल प्रवास शांतेतत व बेकारीचा जातो, त्यामुळे शेवटचा अर्धा तासाचा प्रवास तुम्हाला कंटाळवाणा गेला असावा.”
मेरीच्या चेहर्यावर आता आश्चर्याच्या छटा आणि नजरेत विश्वासाची लहर दिसत होती. हि व्यक्ति आपली नक्किच मदद करु शकतिल असा विचार तिच्या मनात घर करु लागला.
”आता तुम्ही बिनधास्तपणे आपली हकिकत कुठलिही माहीती न लपवता पुर्णपणे मला सांगा. जेणेकरुन तुमच्या आयुष्यातील अडचण दुर करण्यास मी मदद करेन”.
संभाने तिला आश्वासन दिले.
