शीर्षक
शीर्षक
काही लोक खाण्यासाठी जगतात काही जगण्यासाठी खातात मी दुसर्या कॅटेगरीत.. सारचं अटोपशीर.*बाकी पुस्तक सोडून* इतर अती महत्वाच्या गरजा म्हणजे चार दोन जरा बरे कपडे. सकाळी अर्धा कप चहा डिशभर पोहे दुपारी दोन पोळ्या आणि जरासा भात एक भाजी बस होते मला रात्रीचे जेवण हवेच असेही नाही , तीन तासात पंधरा वीस हजार स्टेप चालुन आल्यावर पुढच्या पंधरा मिनिटांत मी जागेपणा सोडलेला असतो. तसे सांगण्यासारखं वगैरे काही विशेष नाही.ते तर माझ्या चपलांना पण ठाऊक आहे.कारण त्या झिजतात माझ्या पायांच रक्षण करण्यासाठी.अटोपशीर मर्यादित.. संकुचितपणा नडतोय का?उंच झेप घेण्यासाठी पंखात बळ कमी पडतय का?दिवस नक्की कुठे इन्वेस्ट होत आहेत??? माझी इन्वेस्ट्मेंट शुन्य आहे तसे मर मर कष्ट करणाऱ्यांच्या रांगेत मी कुठे आहे मग???मरणावरून आठवलं कितीही प्रीय व्यक्ती सोडून गेली तरी त्या माणसांसाठी कोण मरतं का?मात्र मनुष्याला प्रीय माणसांकडे पाहुनचं जगण्याचं बळ मिळत तेही खरं काही लोक दुसर्याच्या जगण्याचा स्त्रोत बनतात. जीवनातले काही अनुभव खुप शिकवुन जातात मग जाणिव होते फकत **श्वास सुरू असुन चालत नाही तो तर पावसाळी डबक्यात साचलेल्या बेडकांचाही असतोच की**,**सागराच्या ऊतुंग लाटांना भेदण्याचे सामर्थ्य आणि आकाशाला मोजण्याची फुटपट्टी वगैरै कल्पनांच्या दुनियेत जीवन तोलता येत नाही** स्वतःच्या उनिवा शोधण्याचे धैर्य जींवत माणसंच देतात त्या व्यक्तीमत्वांना,जाणण्याचे व जपण्याचे सामर्थ्य आपल्यात हवे हा चहाचा पेला ना , विचारांचे वादळ घेऊनच हाती येतो.
जीवनात स्थैर्य वगैरे केव्हा येईल?मला हा प्रश्नच संपवायचाय आता.
