गोष्टी गर्दीतल्या मानसांच्या.....
गोष्टी गर्दीतल्या मानसांच्या.....
काॅलेज च्या वाटेवर एस पी काॅलेज समोरील गल्लीत रोडच्या कडेला छोटासा टेबल मांडुन एक आजी बसलेल्या असतात सकाळच्या गडबडीत रोज टिफीन न्यायला जमतेच असे नाही सातला घरातून निघताना फारशी वर्दळही दिसत नाही लोकमान्य नगर ओलांडल्यावर बादशाही च्या बोळातुन टिळक रोड वरील एस पी बिर्यानी पर्यंत एकही होटेल किवा चहा नाश्त्या सोयीचे ठीकाण माझ्या वाटेवर नाही आणि प्रश्न मधल्या वेळात खाण्याचा आहे नाहीतर बारा पर्यंत ऊपाशी,हा मार्ग गेल्या सात आठ महिन्यांपासून अंगवळणी पडलेला तसा तर एस पी चा परीसर ग्राउंड, टिळक स्मारकाची मागची बाजू व बादशाही हे माझ्या प्राथमिक म्हणजे पहीली ते चौथी पर्यंत च्या 33 क्रमांक मुंलीच्या शाळेचे शेजारी इतक्या वर्षांनंतरही मी शिक्षणाच्या निमित्ताने या मार्गावरूनच जातेय........असो तर या मधल्या बोळात एस पी बिर्यानी ते शैलेश रसवंतीगृहा पर्यंत च्या पाच मिनिटाच्या मार्गावर चहा नाश्त्याची चार पाच दुकाने व स्पेशल सीटी समोसे दहा रूपयात मिळतात त्याच्याच बाजुला या आजी छोट्या टेबलावर बिस्कीट, व वेफर्स वगैरे खाद्यपदार्थ विकण्यास बसतात त्यांच्या कडे पाहुन मला माझे संध्याकाळचे काम आठवते पाय अपोआप त्याच्यांच कडे वळतात जेव्हा बॅगेत टीफीन नसतो आंजीकडून ऐक बिस्कीटचा पुडा घेतला जातो मग कीतीही समोसा किंवा ईडली पोहे व तत्सम पदार्थ खाण्याची ईच्छा असली तरी या वयोवृद्ध आजीकडून एक बिस्कीट पुडा घेऊन मी काॅलेज ची वाट धरते.
