अनुभव
अनुभव
Me l coming......हो या..मी घाबरलो ना!!अर्थातच हसत,गमतीने हो,सर काय झाले आता मी काय केलं काही नाही तुमच्या लेखनाविषयी चर्चा करीत होतो अर्थातच लेक्चर च्या पाॅइंटला अनुसरून सर माझ्या कुठल्याशा लेखाचा दाखला क्लास मध्ये मी उपस्थित नसताना देत होते याहुन महत्वाची गोष्ट कोणती असावी किमान काॅलेज पुरती तरी सुखद म्हणावी.परवाचा ऐक प्रसंगही आठवला रात्री पाऊने दहाला,रींग सवयीप्रमाणे,**रात्री आठ नंतर फॅमिली शिवाय कोणाशीही सोशल मीडीया वर्ज्य** सकाळी अकरा.. लेक्चर..सायलेंट मोबाईल व्हायब्रेट सेम नं. कोण? स्वाॅरी रात्री काॅल घेऊ शकले नाही वगैरै,टिपीकल पुणेरी ऊत्तर,म्याडम नमस्कार मी अमुक.. दवाखान्यात आहे ...नाही ..मी बरा आहे आई.. आईसोबत आईला कॅन्सर सांगितलाय चौथ्या स्टेज पुढे ... किमो ....वगैरै....पलीकडून एफ बी मित्र बोलत आहेत हे एव्हाना कळले पुरूषी आवाज अतीशय भाऊक हळवा शांत खालच्या पटीतला भरून आलेले डोळ्यांनी अंतराच्या भीतींना छेदून शब्दातला ओलावा मनाला स्पर्शून जावा, असा क्लासबाहेर गॅलेरीत ऊभी स्तब्ध शांतपणे ऐकून घेणे गरजेचे वाटले.निर्मळ भावनांचा सन्मान व्हायलाच हवा. सैल झालेल्या मनाचा ,शब्द तुटक भावनावेग ओसरला हलकासा पाॅझ...मॅडम ऐकताय ना?...होय! बोला!नाही म्याडम मला मला मदत नकोय कसलीही. सध्या तरी,ऊपचार व्यवस्थित सुरू आहेत परंतु म्याडम आई जाणार हे स्वीकारणं अवघड हो. एक सांगु का तुमचे आत्मचरित्र *मध्यान्ह* वाचलय.केव्हढा संघर्ष केलाय आईसाठी तुम्ही ते तर आठवलंच पणं **काल तुम्ही स्मृतीदिना निमित्त आईसाठी जी पोस्ट टाकली होती रात्री वाचुन भावना अनावर झाल्या लगेच काॅल लावला.आज मी ज्या मानसिक अवस्थेतून जातोय ते तुम्ही अगदी लहानपणापासून अनुभवले तुमच्या पुस्तकातल्या प्रत्येक शब्दातून तुम्ही खंबीर संकटाशी लढलात हे दिसते. आणि कालची पोस्ट तर डोळयात पाणी आणणारीच**.भावनावेग आवरण्याची गरज मला होती. शक्य तेव्हडी तटस्थता एकवटून म्हणलं आता ठीक आहेत ना आई. काहीही मदत लागली कळवा शक्य ते करीन काळजी घ्या तुमची व कुटुंबाची **निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्ट संपणार आहे त्याला पर्याय नाही** धन्यवाद म्हणुन मी फोन ठेवुन क्लास रूम मध्ये प्रवेश केला पन्नास साठ विद्यार्थी...... क्लास रूम भरगच्च ओसंडणारा पंरतु मी निशब्द!!माझ्या लेखनीचा अभिमान आणि कर्तव्याचे भान.देणारे हे अनुभव
आजचा चहात वाचकांचा आदरभाव सामावलाय.
लेखन अंजली भालशंकर मध्यान्ह, पुणे 30
