रव्याचे लाडू
रव्याचे लाडू
नुकतीच एक्झाम संपली परीक्षा जवळ आली,कीच, मरमर वगैरै...😅😅 म्हणतात ना तसा अभ्यास करणारयांचा एक गट असतो मीही त्याच गटातली. यावेळेस तर इतकी मरमर केली मी की पहाटे चारला ऊठून वर्षानुवर्षाच्या,सवयीने थंडीत पाण्याने अघोळ ऊरकुन साडेपाचला मी पार्क गाठायचे उजेड येईस्तोवर मोबाईलच्या टॉर्च वर वाचन. तसे हल्ली ऋतु सुद्धा अनियमित माणसाप्रमाणे, खरे तर मानवाच्या प्रतापने भर थंडीत घाम आणि ऊन्हाळयात अचानक भरून आलेल्या आभाळातून गारा सुद्धा पडताना दिसतात.मानवी असंतुलित जीवनशैलीने निसर्गावर मात केली जावू देत इथं गोष्ट निराळी आहे तर मरमर.... वगैरै अभ्यास मागील महीण्यापासून परवा शेवटचा पेपर होईस्तोवर चार दिवसांपासुन जरा निंवात ऊशीरा म्हणजे सात वाजता बागेत जातेय अवांतर वाचन आणि सोबतच रोज बागेत फिरायला येणार्या आजींशी मनसोक्त बोलणं होतयं मागील महीनाभर एका बाकावर मी अतीशय कोन्स्ट्रटेट अभ्यास करीत बसलेले **असा रीमार्क मी नाही,तर काही मुलींनी ज्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला बागेत येतात, अधुन मधुन स्माईल व जाता येता तुमच्या कडे पाहुन आम्हाला प्रेरणा वगैरै मिळते असे काही मुलींनी मला दिलेला असतो** म्हणून आपलं लीहीलयं. आता आजींच्या गोष्टी पहा **डोक्याला काही बांधत जा** **जमीनीवर नको बसत जाऊ अंथरायला काहीतरी आणत जा** **अंघोळ थंड नाही तरी ऊनऊन पाण्याने करावी** **नाश्ता कधी करते?? फार ऊन्हात नको बसू तू फारच वेळ म्हणजे बाग बंद होईस्तोवर बसते** ना **सावलीत बसत जा** या प्रत्यक्ष माझ्या बाजुला बसुन केलेल्या सुचना.हळूहळू ऐकेक जणी जमू लागतात तसे दटावणी वजा सूचना येतात.मी ही हं हं.. म करीत वाचता वाचता प्रतीसाद देते हळूहळू किमान पाच सहा आजी जमतात पुन्हा अशा गारठयात दररोज केसावरून थंड पाण्याने न्हाऊन येते !केव्हढा अभ्यास करते.!!खुपच वेळ बसते!! मला तर हीची फारच काळजी वाटते!! इतके कष्ट केले तर चीज व्हाव बाई, मी तर माझ्या नातवाला रोज सांगते बघ ती ताई पहाटेच बागेत येतय अभ्यासला.वगैरै.....सुरू.आठ पर्यंत शांतपणे वाचुन मनापासून आत्मसात करावे हे सुरवातीच्या दोनतीन दीवसातच माझ्या ध्यानात आले बाग सार्वजनिक आहे कोणी कुठे बसावे याचे बंधन नाही शक्यतो माझ्या बाकावर सहसा कोणी येत नाही शिवाय या आजींच्या मेळयांशिवाय.यांच्या गप्पा सुरू असतात मधुनच माझ्याविषयी वरीलप्रमाणे संभाषण असते आणि सुचनाही अगदी दटावणीच्या सुरात हक्काने मीही शक्य तेव्हढे हसुन व होकारार्थी मान डोलावते कधी कधी होय!ऊद्या नक्की आणते आंथरायला असा एखादे वाक्य फेकून माझ्या मरमर....😆 अभ्यासात डोके खुपसते.मागील महीणाभर सुरू असलेला रतीब एकदाचा थांबला.परवा रोजच्या प्रमाणे ऐकेक आजी जमा झाल्यावर मी नुकतेच वाचायला घेतलेले मार्क्स चे दास कॅपीटल बाजुला सारून गप्पात सामील झाले. पाच दहा मीनीटांनी नव्या आजी आल्या होय नव्यानेच मुलगा नोकरीनिमित्त पुण्यात शिफ्ट झाल्याने कोल्हापूर हुन इकडे आलेले आजीचे कुटुंब. गेल्या पंधरवडय़ापासुन आजी दररोज बागेत येतात फुले तोडतात इतर आजींना पण देतात छान हसून झालं का वाचुन, लवकर आलातसा..शाळत कधी जाता मग..असं कोल्हापूरी बाजातून प्रेमळ सुरात विचारीत.जवळ येताच आजींनी सोबतच्या पीशवीतून एक डबा काढला व हळुच माझ्या सॅकमध्ये ठेवला माझ्या प्रश्नाची वाट ना पहाता डोळे मीचकावीत नेहमीचं निरागस हसू डोळ्यात आणून हळूच म्हणलं लाडू....रव्याचे लाडू! डोळे मीचकावीतच मी करून दिलेल्या जागेवर टेकल्या खरतर मी गोंधळले हे काय??विचारातच पडले बर आजींनी डोळ्याने दटावले शांत रहाणे रास्त.सार्यांचाच मुड ठीकठाक दिसत होता बाकीच्या चौघीही गप्पात रममान असल्याने नव्या आजी आणि मी दोघींकडे कोणाचेही लक्ष न्हवते.गप्पात सामील झालो. नुकताच एका आजींचा वाढदिवस होऊन गेला त्यांनी दिलेल्या पार्टीत, माझा फोटोच नीट आला नाही. मी डोक्यावर पदरच घेतला नाही फोटोत.अशी खंत एका आजींनी बोलून दाखवली मला काय वाटले कुणास ठाऊक मोबाईल काढला म्हणलं चला आता घ्या पदर डोक्यावर मी काढते फोटो संगळयाचा ग्रूप फोटो पण काढते. आणि प्रींट सुद्धा देते सार्या जणींना मी असे म्हणताच सर्व आजी भलत्याच खुष झाल्या सावरून चोपुन बसल्या हसत हसत पोझ दिल्या तूझा पण काढ ना सोबत,मग पुन्हा दोन तीन स्नॅप झाले मग ऐकेक जणीची निघायची वेळ झाली तशा आजी पांगल्या नव्या आजींना मात्र मी जरा बसा थांबा म्हणलं, आज दादांना सुटीच असेल ना !बसा की निवांत!म्हणत मुद्दाम थांबवलं आजीच्या बहुदा ध्यानात आले सर्वजणी गेल्यावर मला बोलू ना देता ,पहाटंच गारठयात येताव किती दगदग झालीय,कीतीदीस बघतंय मी. म्हणलं पोरगीला काहीतरी न्यावं म्हणून लाडू केलं काल तुमच्यासाठीच केलं.पण...पण.. आजी काय हे कशासाठी?? अहो मला अशी सवय नाही हो उगाच!तुम्ही तुम्ही ऊद्या गावाला गेलात तर मला वाईट वाटेल मग अशा काही सवयी नका लावू मी काय केलयं ईतकं की तुम्ही....माझ्यासाठी...असू द्या इतक गोड बोलता, इचारपूस करता येता जाता हसता. वळक ना पाळख तरी मोकळं वाटत तुझ्याशी बोलल्यावर बर वाटतं बघा तु ईतकं गोड बोलते लाडवाचं काय घेऊन बसलात कोल्हापूरी बाजातलं प्रेमळ बोलणं ऐकून मला भरून आलं आजींनी डोक्यावरून अलगद हात फिरवला आणि झटकन स्वतःच्या डोळ्यावरून सुद्धा. पुढे संवादाला शब्दच सापडत न्हवते लीहायला सुद्धा!!!अंजली भालशंकर पुणे 30
