टि विथ स्मोकींग.
टि विथ स्मोकींग.
**टी विथ स्मोकींग**
होय! हेच म्हणायचंय मला.**स्मोकींग इज इंजुरस द हेल्थ** वगैरे कंपन्यांनी दुर्बीणीतुन पहावे,असे प्रोडक्ट्स वर लिहावे वाचकाने...स्वारी स्मोकींग करणाऱ्याने ते वाचावे?जाहिराती पहावयास हव्या इडियट बाॅकसवर दिवसदिवस डेलीसोप, खरेदी खत किंवा भाडोत्री कंत्राटावर सरकारने पाळलेल्या बर्याच चॅनल्स दिवसरात्र ऊदोऊदो सुरू असतो मध्ये काही सेकंद स्मोकींग विषयी जागृतीपर संदेश पहा. ओळखीतला एक मुलगा यूपीएस सी वगैरीची तयारी करणारा भर गर्दीच्या रोडवर मित्रासहं हाती चहा व सिगारं.याच्या हातात फक्त चहा अर्थातच मी पाहीले तेव्हा.साधारण ओळख तीन चार वेळेस बोलणं तेही काॅलेज वगैरै विषयावर बाकी पर्सनल असे काही नाही तरीही का कुणास ठाऊक मी वळून पुन्हा पुन्हा ओळखीच्या मुलाच्या हाताकडे पहात राहीले. अत्यंत शिष्टाचार,व वैयक्तिक स्पेस,विरूद्धचं तरीही....तसे सिगारेट किंवा तत्सम पदार्थ कोणाच्याही हातात घातकच.चौकाचौकात चहाच्या टपरयांशेजारी पानटपरीचा व्यवसाय फुल्ल तेजीत. तरूण मुल आणि मुलीसुद्धा गटागटाने ऊभी असतात चहासहं झुरकयावयर झुरके मारताना व्यसनाच्या भयावह परीणामाची पर्वा झुगारून देतात ही तरूण मुल अगदी बारा तेरा वर्षाची कोवळी लहानगी मुलं व्यसनाधीन झालेली दिसतात कोवळ्या जीवांच्या अवयवांची देखील पुरेशी वाढ झालेली नसते सिगारचे झुरके हदयासह इतर अवयवांसाठी अत्यंत हानीकारक ह्रदयाच्या वाॅल मध्ये बदलं छातीत दुखणे हार्ट अॅटॅक चे चान्सेस रक्त पुरवठा कमी व cardiomegaly या सारखे डिसिज यासह इतर अवयवांवर व एकंदर आयुष्यावरच या व्यसनामुळे अनिष्ट परीणाम होतो हे मुगीपेंक्षा लहान अक्षर व काही सेकंदाच्या जाहीराती ,तेही मुंगीच्या पावलाने करून काही साध्य होईल काय हा प्रश्न कोणाला विचारणार ड्रग्ज आणि मद्याचे परवाने कोण देते?कोट्यावधी प्रश्नाचे घोळ आहेत ज्यांची ऊत्तरे पेडींग कायम सरकार कोणतेही येवो प्रश्न तेच माझा हा आपला जुनेच काॅमन बोथटलेले प्रश्न व्यसनाचे उच्चाटन कधी होणार यासाठी ठोस कडक कायदा,निर्णय होईल का?कधी? चहात बुडणारे प्रश्न
लेखिका अंजली भालशंकर पुणे
