कल्पना
कल्पना
मनुष्याकडे अफाट कल्पनाशक्ती आहे त्या बळावर स्वतःच्या जीवनात नक्कीच बदल घडवू शकतो माझी सर्व इप्सित साध्य होतील माझे ध्येय मी गाठले आहे मला जे हवेय मी ज्या ऊददेशाने जगतं आहे तो ऊददेश पूर्ण झाला आहे अशी कल्पना सतत ऊराशी बाळगली तर एक ना एक दवस मनुष्य आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचतो जीवनात अडीअडचणी दैन्य दुःख संकट संघर्ष निराशा अहवेलना अपमान या गोष्टींना प्रत्येकाला कधी ना कधी सामोरे जावे लागेल पंरतु मग तेच जीवनं आहे असे गृहीत धरावे का तर नाही. गेलेला क्षण पंरतुन येत नसतो तशीच आयुष्यातुन गेलेली माणसं ही परतुन येत नसतात विशेषतः जी माणसं तुमच्या जीवनातून शांतपणे आंकडताडव ना करता निघुन जातात.आपल्या जीवनात सभोवती शेकड्याने लोक काय कामाचे?त्याहुन मोजकी अगदी नगण्य मानस जी लाखमोलाची साथ देतील मोजक्या शब्दात क्षणभरात जीवनभर ध्यानात राहतील असे विचार देतील त्याहुन तुमच्या अत्यंत कमजोर कमकुवत काळात खंबीरपणे हात देतील मित्र आणि मैत्र यातला फरक कळला की माणसं जपता येतात आयुष्य खर्या अर्थाने जगण्याला कुठुनही सुरवात करता येते बाकी श्वास सुरू असतोच सहानुभूतीचे उसासे नकोच.आदर आपुलकी स्नेह संवेदनशाता आणि सहानुभूतीतला फरकही ओळखता यायला हवा मग गैरसमजाची दरी मिटुन जाते आपल्यातली नकारात्मकता व न्यूनगंडाची भावना कमी व्हायला लागते आणि स्वतःच उभ्या केलेल्या दुःखाच्या जाणिवा दूर होऊन प्रतिभा नव्यान फुलायला लागते आपण आपल्या आत नको त्या विचारांना राग द्वेष संतापाला प्रवेश का देतो? स्वतःच्या खर्या जाणिवांना दडपून कृत्रिम का जगतो?हा विचार व कृतीतून स्वतःला मुकत करता यावे जीवन जगणे सोपे अगदी सोपे आहे.आपण जन्माला का आलोय मृत्यूनंतर कोठे जाणार या मधल्या वेळात काय काय करायचेय काय घेऊन जायचेय काय मागे ठेऊन जायचेय सारचं कल्पनेच्या पलीकडचं या आयुष्य रूपी पुस्तकात लिहिण्यासारखं खुप आहे ते मांडायला मनही तितकचं निर्मळ निर्व्याज असणारं नीती मूल्य जपणारं प्रमाणिक असावं असं वाटतं ते काहीही असो मी मात्र जाताना या आयुष्याचा संपुर्ण प्रवास माझ्या बंद डोळयात सामावून घेऊन जाईन हे सुंदर जग मनाच्या आत आत खुप खोलवरच्या कप्प्यात दडवुन घेऊन जिथपर्यंत पंचतत्व सुद्धा पोहोचनार नाहीत तोपर्यंत मला माझं आयुष्य शांतपणे जगायचयं कोणाबद्दल कसलीही आसक्ती तक्रार ना ठेवता एकट्याच्या जगात निवांत शांत बाकी तुम्ही तुमचे पहा रविवारचा चहा
