STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Abstract

2  

Anjali Bhalshankar

Abstract

मन ...वगैरे....

मन ...वगैरे....

1 min
5

मन म्हणजे काय?शरीरात कुठे आहे ?कसे दिसते?एखादा अवयव आहे की,शरीरातील सहस्त्र धमन्यांतून पाझरणारा द्रव पदार्थ?सहजच कोणालाही पडणारे प्रश्न आहेत हे अगदीच सामान्य.मन कोणी पाहीलेय?...मग ते सार्या जगभर आणि या पृथ्वीच्या पलीकडे असलेल्या लक्षावधी ग्रह तारकासमूह आकाशगंगा सूर्य कृष्णविवरे तारकांचे,ग्रहाचे, जन्म मृत्यू, ग्रहाची एकमेकांवरील आदळआपट सौरवादळ निमिशभरात पाहते बसल्या जागेवर,कल्पनेच्या ताकदीवर, तसे वैज्ञानिक जगात अधुनिक यंत्राच्या जोरावर मानव अंतराळात वस्ती करून आणी ईतर ग्रहावर नवी दुनिया वसवण्याच्या तयारीत असेलही कशाचा जोरावर?मनाच्या ऊतुंग कुतुहलाचीच किमया ना!या मनाची कीती कौशल्ये शरीरावर एकही ओरखडा नसताना ,मन वेदनेने आक्रोश करते,डोळ्यांच्या काठावर आदळणाऱ्या लाटांच्या तुफानाला आतल्या आत दंडवते स्वतः पाझरते डोळे मात्र कोरडेठाक.हे कितीदा तुटते...राग.. आदळआपट...ईच्छा.. गरजा....आवड...अभिलाषा..स्वप्न...प्रेम..तिरस्कार...अपमान...वेदना सवेदनांसह जगताना,कधीतरी ऊधवस्त होते श्वास सुरू असुनही मन कितीदा तरी मरते पंरतु पुन्हा पुन्हा, कोलमडत धडपडत चेतनेने पेटुन ऊठते आग कुठेही नाही मन मात्र आयुष्याने दिलेल्या दाहक चटकयांनी घायाळ होते स्वतःच्याच राखेतून फिनिक्स प्रमाणे उंच आभाळात नवी झेप घेते जणू हे ऊतुंग आभाळ फक्त त्या ऐकटयासाठी, आपले बाहु पसरून कवेत घेते. असे हे मन नक्की कशाचे बनलेले असते? कितीदा घाव सोसुन रक्तबंबाळ होऊनही लख्ख तेजस्वी होऊन नवे रूप धारण करते नवे घाव झेलण्याच्या तयारीत नव्या बळाने जीवनाला सामोरे जाते खरचं हे मन कशाचे बनलेले असते ?      आपलं असंच सहजचं


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract