STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Abstract

3  

Anjali Bhalshankar

Abstract

मिडीया...सोशल.. .वगैरै...

मिडीया...सोशल.. .वगैरै...

1 min
14

सोशल मिडीया!खरेतर यांविषयी...लिहिण्या ईतका गंभीर माझ्यासाठी तरी हा विषय नाही. मला तेवढा वेळ सुद्धा नाही. कारण सोशल मिडीया माझ्यासाठी आहे मी सोशल मिडीयासाठी नाही. सोशल मीडीयासह जगायचे की, जगण्याचा,काळाचा,गरज व एक भाग म्हणून त्याचा वापर कुठवर करायचा हे देखील मला कळते. ईथे जे ओतले जाते ते कीती जमा करावे,ध्यानात घ्यावे,व कीतपत आपल्या जीवणात वापरावे ज्याच्या त्याच्या मेंदुचा भाग आहे.पंरतु या आभासी दुनियेत कोणावरही वैयक्तिक टीकाटिप्पणी करणे टाळायला हवे तीतकेच.वैयक्तिक रीत्या आपण कोणत्या मर्यादित रेषेवर थांबावे याचा ही विचार पोस्ट करताना व्हायला हवा .ईथे सर्वच खरे चेहेरे कुठुन वावरायला........ म्हणूनच प्रत्येकाने आपल्या ईमेजची काळजी घ्यावी असे वाटते कारण समाजात ,सोशल मिडीयात आपल्या विषयी कोणतीही खरी माहीती कींवा वैयक्तिक परीचय,भेट ,ओळख असे नसताना केवळ एखाद्या पोस्टवरून लोक तुमच्या अखील जीवनाच्या वृत्तातांचे गणित आपल्या वैचारीक क्षमतेनुसार लावतात. इतके की कदाचित आपल्या चारित्र्यावर एकुनच अस्तित्त्वावरच आघात.व प्रश्न उपस्थित होईल असे संदर्भ लावुन मोकळे होतात.खरतरं आपण कमजोर नसतो कारण ज्यांचे अवघे जीवनच संघर्ष आहे वादळाच्या तडाख्यात रोजचीच लढाई सुरू असेल तर या तुच्छ वावटळींची गणती कसली?कोणत्याही स्त्रीचे चारित्र्य हे तीची सर्वात मोठी ताकद असते.त्यावरच..... जर कोणी प्रश्न ऊठवत असेल तर त्या चुकीला माफी नाही.कोणालाही नाही! सोशल मिडीया.....वगैरे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract