STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Abstract Others

4  

Anjali Bhalshankar

Abstract Others

आई

आई

1 min
304

या जगात आपल्याला सर्वात जास्त, कदाचीत स्वतःपेक्षाही जास्त ओळखणारी एक व्यक्ती असते ती आई. जन्म देणारी आई अशी एकच व्यक्ती आहे जी आपल्या जन्माआधिपासून आपल्याला ओळखते.आईच्या गर्भातल्या जीवाच्या असताना प्रत्येक हालचाली सरशी आईचा काळजाचा ठोका चुकतो आपल्या ऊदरात सुरक्षित वाढणाऱ्या जीवाची काळजी आई जीवापाड घेते बारकाईने अतिशय हळव्या मानसिकतेतून जाताना,या पृथ्वीतलावर येणार्या नव्या पाहुण्यासाठी ती उत्कट प्रतीक्षेत असते जन्मही ना घेतलेल्या जीवाला नऊ महीने जास्त ओळखणारी ती एकमेव स्त्री त्या दरम्यान कोणत्या भावनिक व मानसिक अनुभूतीत जात असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो मनुष्यमात्रामधये शरीराने कोमल नाजुक हळवी प्रेमळ भावनिक उदार असलेली स्त्री मनाने जास्तीत जास्त कणखर मजबुत सहनशील असामान्य अपरीमित धैर्यशील असते जी ऐका जीवाला या जगात आणते असा जीव जो पुढे स्वताचे अस्तित्व निर्माण करणार असतो स्वतंत्र जीवन जगणारा आयुष्याची नवी वाट निर्माण करणार असतो या समाजात नवी पीढी म्हणून आपली ओळख तयार करतो ज्याचा स्त्रोत आईच्या ऊदरात असतो आई इतकं प्रेम माया या सृष्टीतलावर तुमच्यावर कोणिही करेल हे दुर्मिळ गोष्ट तीच्या पदराआड जगातलं सर्वात मोठ सुख आहे आई कधीही कधीही आपली परवड सहन करीत नाही ती निस्वार्थ प्रेमाचा मायेचा झरा आहे 🥰आजच्या चहात आईच्या आठवणीचे अश्रू नकळत मिसळलेत ❤️आई❤️ अंजली भालशंकर पुणे 30


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract