रिकामे हात
रिकामे हात
रुपाली दिसायला खूप देखणी होती. रुपालीच्या रूपाचं कौतुक सर्वे करायचे... पण दुर्देवानी तीच हे रूपचं तीच दुश्मन बनलं होत. रुपाची आई कलावतीताई आपल्या चंद्रेसारख्या देखण्या मुलीला खूप जपायच्या. लोकांच्या दुष्ट नजरेने नेहमी तिला वाचवत राहायच्या पण अखेर रूपाच्या जीवनाला ग्रहण लागलचं. एकदिवशी जेव्हा फाटक्या कपड्यात ती घरी आली तेव्हा तीचा आवतार पाहून कलावतीताई डोकं आपटून आपटून रडायला लागल्या.
घडलेल्या प्रकरणाने रुपाली जाम घाबरली होती. चार राक्षसांनी मिळून तिचं सर्वस्व लुटलं होत. आता रुपाली आणि तिची आई कलावतीताईंकडे दोनचं विकल्प होते. गपचूप बसून स्वतःची अब्रू वाचवायची किंव्हा पोलिसांकडे जाऊन आपल्या गेलेल्या अब्रूसाठी न्याय मागायचे. खूप विचारकरून रुपालीने दुसरा विकल्प पसंद केला.
रुपाली म्हणाली, “आई, जर आज आपण असचं हातावर हात ठेवून गप्प बसून राहिलो तर उद्या त्या राक्षसांची हिंमत वाढेल आणि ते बेफाम बनून भोळ्याभाबड्या मुलींच्या अब्रूशी असंच खेळत राहतील. त्यांच्या पापांची शिक्षा त्यांना भेटलीच पाहिजे. त्यांनी फक्त माझी अब्रूच लुटली नाही पण मला मानसिक आणि शारीरिक आघात पण दिला आहे. कदाचित अंगावरच्या इजा तर रुजल्या जातील पण माझ्या मनावर झालेल्या इजेचं काय? ते त्या दुष्टांना शिक्षा दिल्या शिवाय रुजनार नाहीत... नाही... नाही... मी त्यांना असचं जाऊन देणार नाही.”
रुपालीची गोष्ट कलावतीताईंना पटली. त्यांनी पोलिसांकडे जाऊन आपली तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीच्या आधाराने पोलिसांनी काही दिवसांत त्यां दुष्टांचा तपास लाऊन अटक तर केली परंतु अजून रुपालीला न्याय मिळाला नव्हता. त्या चौघांची ओळख मोठ मोठ्या लोकांशी होती. त्यांची ओळखपाहून कायदा त्यांच्या खिश्यात आहे असं रुपालीला वाटू लागलं होतं. ह्या प्रकरणाचे साक्ष तर होते पण कोणी पुढे येण्याची धाडसं करेल कां? हा तिच्या मनात एक मोठा प्रश्न होता. तिला कोणाचा पाठींबा असेलं तसं ही वाटतं नव्हंत. कारण अजूनपर्यंत कोणी तिच्यासाठी मेणबत्त्या पेटवल्या नव्हत्या किंव्हा दिखावे ही केले नव्हते!
त्यां दिवशी....
“तमाम सबूतों और गवाहों को मध्येनजर रखते हुए अदालत इन चारों को बेगुनाह करार देते हुए बाइज्जत बरी करती है.”
“नाही...” च्या किंकाळीनी रूपा झोपेतून दचकून उठली. ती भीतीनी कांपत होती. तीचं संपूर्ण अंग घामाघूम होते.
आतल्या खोलीतून कलावतीताई धावत आल्या आणि विचारलं, “काय झाल गं?”
रुपाली कोर्टातील बघितलेलं स्वप्न लक्षात करून ढसाढसा रडत म्हणाली, “आई, मला न्याय मिळेल न? त्या दुष्टांना शिक्षा होईल न?”
कलावतीताईने रुपालीच्या कपाळावर आलेला घाम पुसला आणि म्हणाल्या, “कायद्यावर विश्वास ठेव बेटा, तुला जरूर न्याय मिळेल.”
अखेर तो दिवस आला. निकाल एकण्यासाठी कोर्टात चिक्कार गर्दी जमली होती.
चारी आरोपी कटघर्यात निर्लज्जपणे बिंधास्त उभे होते.
रुपाली जणू स्वतः गुन्हेगार असेल तशी कोर्टात गपचूप उभी होती.
वकील एकदुसऱ्यांशी दलील करत होते.
जजसाहेब लक्ष देऊन सर्व एकत होते.
कोर्टाच्या आत आणि बाहेर होणारे खेळ आता सुरु झाले होते.
रूपालीला न्याय मिळण्याची थोडी पण आशा वाटत नव्हती.
सबूत पलटले... निवेदन उलटले... चौघे गालात हसले...
तितक्यात एक म्हातारा आपल्या जागेवरून उभा राहून म्हणाला, “त्यादिवशी ह्या मुलीला रिक्षेत खेचून घेऊन जातांना ह्या राक्षसांना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. मी रिक्षेच्या मागे धावण्यांचा प्रयत्न केला होता पण माझ्या शरीराने साथ दिला नव्हता.”
त्यां चौघांपैकी एक म्हणाला, “म्हाताऱ्या, तुला माहित आहे न आम्ही कोण आहेत ते?”
कोर्टातून एक दुसरा आवाज आला, “हो आम्ही तुला बरोबर ओळखतो... जजसाहेब, ह्या आजोबांनी जेव्हा आरडाओरडा केला तेव्हा मी पण माझ्या घरच्या बाल्कनीत उभा होतो... त्या दिवशी सर्व इतकं लवकर घडलं होतं की कोणाला ह्या मुलीच्या बचावासाठी पुढे येण्याची संधी मिळाली नव्हती. पोलिसांना फोन आम्हीच केला होता. जजसाहेब, ह्या मुलीला उचलून घेऊन जाणारे हे चौघेचं होते. ह्यांना सजा भेटलीच पाहिजे.”
कोर्टात खळबळाट झाला.
सर्व त्या चौघांच्या विरोधात बोलू लागले.
त्यांना पाठींबा देणारी मोठी डोकी एकानंतर एक कोर्टातून कमी होऊ लागली.
रुपालीच्या पक्षाने बोलणारी डोकी एकानंतर एक वाढू लागली.
खिश्यातले पैसे खिश्यात राहिले!
खोटे साक्ष चिडीचूप झाले!
अखेर जजसाहेब स्वतःचा निर्णय ऐकवत म्हणाले, “तमाम सबूतों और गवाहों को मध्येनजर रखते हुए अदालत इन चारों को दोषित करार देते हुए फांसी की सजा सुनाती है.” कलमीचं टोकं मोडून ते पुढे म्हणाले, “जर असच सर्वे धाडस करून साक्ष देण्यासाठी पुढे येतील तर कोणाला का न्याय भेटणार नाही? न्यायालय पीडितांना न्याय देण्यासाठीचं बसला आहे परंतु त्यांना लोकांचा साथ सहकार पण भेटला पाहिजे न... तुमच्या सर्व्यांच्या धाडसचं मी कौतुक करतो.”
कोर्ट विखरली.
रुपाली त्यां आजोबांना हात जोडून म्हणाली, “आजोबा, जेंव्हा कोणी मेणबत्ती लावल्या नाही किंव्हा देखावा केला नाही तेंव्हा मी तर खचूनच गेली होती. मला चिंता वाटायला लागली होती की मला न्याय मिळेल का नाही.”
आजोबा खंबीरपणे म्हणाला, “मुली, आता ह्या शहराच्या जनतेने नक्की केलं आहे की जे जरुरी आहे तेच करायचं आणि प्रत्येक बाईला आपली आई आणि मुलीला आपली बहिण समजायचं. आपण सर्व एक असू तर कुठल्याही पीडितांचे न्यायालयातून बाहेर पडताना नसतील रिकामे हात.”
