Prashant Subhashchandra Salunke

Crime Fantasy Thriller

3  

Prashant Subhashchandra Salunke

Crime Fantasy Thriller

सजा

सजा

3 mins
211


सुधाकर तसा दुष्ट नव्हता. स्वभावाने तो खूपच चांगला होता. लोकांची सेवा आणि काळजी घेण्यांस तो नेहमी तत्पर रहायचा. परंतु... परंतु... त्याच्या दगाबाज दोस्त दीपकने त्याच्या स्वभावात बदल घडवून आणला होता. त्याला दीपकविषयी खूप नफरत होती आणि का बरं नसणार? दीपकने कपट करून सुधाकरचा सर्व धंदा स्वतःच्या नावावर केला होता. एवढचं नाही पण त्याच्या सुंदर आणि भोळ्याभाबड्या बायकोला- प्राजक्ताला स्वतःच्या प्रेम जाळ्यात फसवून तिच्याशी लग्न केलं होतं. दीपकच्या दगाबाजीमुळे सुधाकर मात्र रस्त्यावरच नव्हता आला परंतु समजात ही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहिला नव्हता. सुधाकरने सुरु केलेला नवीन धंधा ईश्वरच्या कृपेने चांगला चालायला लागला होता... आर्थिकरीतेनी तो परत एकदा सज्जड झाला होता परंतु गेलेल्या आब्रुचं काय? प्राजक्ताला दीपक बरोबर हिंडताना पाहून त्याचं रक्त उसळ्यायचं परंतु तो पण काय करणार? बस हृदयावर दगड ठेवून तो स्वतःचे बाकीचं जीवन पसार करत होता.

एकदिवशी सुधाकरच्या दुकानावर त्याचा एक जुना मित्र राघव धावत पळत आला आणि त्यांने समाचार दिले की “सुधाकरभाऊ, सुधाकरभाऊ... तुम्हाला कांही कळाल?”

सुधाकरने आपल्या कामावरून लक्ष न हटवता विचारल, “काय झाल रे? कसला रे इतका गोंधळ?”

राघव म्हणाला, “तो... तो... दीपक...”

सुधाकरने आपली मानवरकरून विचारलं, “आता काय केलं रे त्या दीपकने?”

राघव, “त्यांने काय केलं नाही परंतु त्याचा थोड्यावेळापूर्वीच ट्रेन अपघात झाला आहे....”

सुधाकरने उस्तुकतेनी विचारलं, “काय म्हणतो??? कसं काय???”

राघव म्हणाला, “चालू ट्रेनमधून घाईघाईने उतरता दीपकचा पाय सरकला आणि तो ट्रेनच्या चाकाखाली आला.”

सुधाकरने दचकून विचारलं, “अरे देवा! आता कसा आहे तो?”

राघव, “त्याचे दोन्ही पाय चाकाखाली आल्यामुळे आता तो रेल्वे ट्रेकवर लाचार अवस्थेत पडून स्वतःचे शेवटचे क्षण मोजत आहे. दुसऱ्याला लुबाडून कोणी कधी सुखी राहीलं आहे का? देवाने त्याला त्याच्या कर्मांची योग्य सजा दिली आही...”

सुधाकर, “नाही... नाही...” असं म्हणत आपल्या जागेवरून उभा झाला.

राघवने आश्चर्याने विचारलं, “का रे तुला काय झालं?”

सुधाकर, “कांही नाही” असं म्हणून रेल्वे ट्रेककडे धाऊन गेला.

सुधाकर जेव्हा रेल्वे ट्रेकवर पोहोंचला तेंव्हा दीपक रक्तबंबाळ अवस्थेत तिथे पडला होता. त्याच्या अवतीभवती चिक्कार गर्दी होती परंतु सर्वजण तमाशा बघण्यासाठीच जणू गोळा झाले होते. दीपकच्या दोन्ही पायांवरून चाक गेले होते आणि तो त्यांचे अंतिम क्षण मोजत होता. दीपकला असं मरताना पाहून सुधाकरला राहवलं गेल नाही. तो त्वरित हरकतीत आला. त्यांने आसपास गोळा झालेल्या लोकांच्या सहायतेने दीपकला जवळच्या हॉस्पिटलमध्ये सरकवल. दीपकच्या विलाजामागे सुधाकरने पाण्यासारखा पैसा वापरला. डॉक्टरांनी पण त्याला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. अखेर ते दीपकला वाचविण्यात यशस्वी झाले परंतु ते त्याचे पाय वाचवू शकले नाही. ट्रेनच्या चाकाखाली दीपकचे पाय खूप इजाग्रस्त झाले असल्यामुळे नाविलाजने डॉक्टरांना ते कापावेच लागले होते. तरी सुद्धा सर्वांना ह्या गोष्टीचा आनंद होता की दीपकचा जीव वाचला होता.

त्या दिवशी प्राजक्ता ओशाळून सुधाकरसमोर गेली आणि म्हणाली, “तुमचा धन्यवाद...”

सुधाकर शांत स्वरात म्हणाला, “त्यात धन्यवाद कसला! दीपकसारख्या मित्राला मी असं मरून देईन कां?”

प्राजक्ताने सुधाकरच्या चहेऱ्याकडे बघितलं. त्याचा चहेरा एकदम सौम्य दिसत होता. वैरभाव किंव्हा वैमनस्यची थोडीशी पण झळाळी त्याच्या चहेऱ्यावर दिसतं नव्हती. प्राजक्ता मनोमनी पश्चाताप करू लागली.

अखरे मौन तोडून प्राजक्ता स्वतःचे दोन हाथजोडून सुधाकरला म्हणाली, “तुम्ही खरचं देवता आहात.”

सुधाकर तेवढ्याच शांतीने म्हणाला, “देवता आणि मी!!! प्राजक्ता तुझा कांहीतरी गैरसमज होता आहे... ऐेक... त्या दिवशी मी त्याला रेल्वे ट्रेकवरून हॉस्पिटलमध्ये सरकवल नसत तर तो तिथेच मेला असता आणि सहजतेने सुटला असता... मला ते मंजूर नव्हतं.”

प्राजक्ता चकित नजरेने सुधाकरला पाहू लागली.

सुधाकर खंभीरपणे पुढे म्हणाला, “परंतु आता एक अपंगची जिंदगी जगण्यासाठी तो आणि जिंदगीभर एका अपंगांची सेवाचाकरी करण्यासाठी तू लाचार आणि मजबूर आहेस... तुमच्या दोघांच्या पापकर्माची मला हीच योग्य वाटली सजा.”


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime