Prashant Subhashchandra Salunke

Horror Tragedy

3  

Prashant Subhashchandra Salunke

Horror Tragedy

किंकाळी

किंकाळी

3 mins
181


इ.स. १९५७ साल...

रसत्यावर वेगानं धावणाऱ्या एका कारची ट्रकशी टक्कर झाली. अपघात एवढा भयंकर होता की कार ट्रकला आदळून लांब जाऊन पडली. हे पाहून ट्रक ड्राईवर घाबरला. स्वतःचा ट्रक एका बाजूला लाऊन तो खाली उतरला आणि कारच्या जवळ गेला. परंतु कारजवळ जाऊन पाहतो तर काय? हे देवा हे माझ्याहातून काय घडलं!!! आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तो आपल्या ट्रककडे धावला. कारमधील बाई उठली आणि ट्रक ड्राईवरला पळताना पाहून ओरडली, “ए हरामखोरा थांब... असा कुठे पळतोस?”

पण ट्रक ड्राइवर कुठे तिची गोष्ट ऐकतोय!

घाबरलेल्या त्या ट्रक ड्राईवरने आपला ट्रक पळवला.

त्या बाईने घाबरून आपल्या शेजारच्या सीटकडे पाहिलं तर काय!!!

तिचा मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. तो गंभीर रितेने जखमी झाला होता. जर लवकरच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं नाही तर... पुढच्या कल्पनेने त्या मुलाची आई हादरली. तिने गाडी चालू करण्यासाठी प्रयत्न केला पण थरकाप सुटलेल्या त्या हातात तिला चावी कुठे नीट धरता येत होती. तसं पण अपघातामुळे कारची हालत खूप खराब झाली होती. त्या कारला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्याचा विचार करणेच मूर्खता होती.

त्या मुलाची आई वेगाने कारमधून बाहेर आली. कारचा दरवाजा उघडा आहे की बंद, हा विचार करण्याचं सुद्धा तिला भान नव्हतं. आता तिच्या डोक्यात एकच विचार घोळत होता की, “जर आता आपल्या मुलाला हॉस्पिटलमध्ये लवकर घेऊन जाण्यात आलं नाही तर काहीतरी अघटित घडेल.”

अश्या कल्पनेने ती दु:खी झाली होती. बिचारी आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी झटत होती. तिच्या मुलाच्या काळजीने तडफडत होती. आता तिला कसलीही शुध्द नव्हती. कांही मदत मिळेल ह्या आशेने ती रसत्यावर “हेल्प... हेल्प...” असा आरडाओरडा करू लागली. त्या घाबरलेल्या आईच्या हे लक्षातच आलं नाही की ती आपल्या कारपासून खूप लांब निघून आली आहे. कार आता तिच्या नजरेआड झाली होती. समोरून एक पोलिसांची व्हॅन आली पण ती ही न थांबता भरधाव वेगाने पुढे निघून गेली. बिचारी आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या इतर गाड्यांना पाहून “हेल्प... हेल्प...” अशी किंचाळू लागली आणि त्यांच्या मागेमागे धावू लागली पण ह्या निर्दयी जगाने तिच्याकडे लक्षच दिले नाही. जणू कोणाला तिची हाक एकूच येत नसेल तसे ते दुर्लक्ष करून पुढे निघून जात होते.

आता काय करायचं?

बिचारी आई धाडस करून एका गाडीसमोर जाऊन उभी राहिली पण... पण... ती गाडी कसली थांबते. आपले सर्व प्रयत्न असफल होत आहे ते पाहून ती आई जोरात किंचाळली, “हेल्प.... हेल्प...”

कदाचित समोरून येणारी एक कार तिची किंकाळी ऐकून उभी राहिली.

हे पाहून त्या आईने उत्साहाने आपले पाऊल उचलले.

“रसत्यावर अस गाडी थांबवू नये.” कारमधील बाई आपल्या जोडीदाराला म्हणाली.

“अगं पण समोर मोठा अपघात झाल्या सारखा दिसतोय.” पुरुष म्हणाला.

“तो पोलिसांचा विषय आहे आपला नाही..” बाई म्हणाली.

ती आई “माझी गोष्ट ऐका... प्लीज... हेल्प... हेल्प...” असं म्हणत गाडीकडे धावली.

पण घाबरलेल्या त्या दंपतीने आपली कार सुसाट तिथून पळवली.

रसत्यावर आता उभी होती मात्र ती आई!

एकटी... लाचार... निराश... डोळ्यांत मददतीची आशा घेऊन.

“माझ्या मुलाला कोणी हॉस्पिटलमध्ये घेऊन चला प्लीज...हेल्प... हेल्प...” अस ती एकटीच बडबडली.

अचानक तिच्या मनात विचार आला. “माझ मुल.”

हा विचार येताच ती जीवापार कारकडे धावली पण तिथे जाऊन पाहिलं तर तिला धस्सचं झालं...

तिचा मुलगा कारमध्ये नव्हता! ‘माझ्या मुलाला कोण घेऊन गेलं असेल?’ हा विचार तिच्या मनात येताच ती डोकं आपटून रडू लागली.

“हे देवा! माझा मुलगा कुठे आहे?” असं म्हणत ती सगळीकडे तिच्या मुलाला शोधू लागली.

गाड्या वेगाने रसत्यावर धावत होत्या. रसत्यावर झालेला अपघात पाहून ते सर्व हादरत होते. पण कोणाला त्या आईची दया येत नव्हती. कोणी पुढे येऊन त्या आईचं सांत्वन करत नव्हते. त्या आईला आता जगाची किव वाटू लागली पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिने परत एकदा प्रयत्न करून पाहिला. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या मागे ती “हेल्प... हेल्प...” अस म्हणत धावू लागली. 

पण सर्व निरर्थक...

आता त्या वेड्या आईला कोण समजवणार की पोलिसांनी घटनास्थळी येऊन तमाम मृतदेहांना पोस्टमार्टेमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिल होते!

हो तमाम मृतदेहांना.

तिच्या स्वतःच्या आणि तिच्या मुलाच्या मृतदेहाला पण...

ह्या घटनेचा त्या आईच्या आत्म्यावर एवढा आघात झाला होता की इतक्या वर्षानंतर आजपण ती येणाऱ्या जाणाऱ्या गाडयांच्या मागे धावत असते आणि हेल्प हेल्प असं ती किंचाळत असते... कदाचित कधी तुम्हाला पण एकू येईल त्या आईची किंकाळी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror