Prashant Subhashchandra Salunke

Abstract Tragedy Thriller

3  

Prashant Subhashchandra Salunke

Abstract Tragedy Thriller

छम्म... छम्म...

छम्म... छम्म...

3 mins
182


“छम्म... छम्म...”

पैंजणाचा छमछम असा आवाज कानावर पडताच, “सुधा, कुठे आहेस तू?” अस विचारलं.

खोलीत फार अंधार होता.

समोरचं कांहीही दिसतं नव्हतं.

थोडा धीर धरून परत एकदा विचारलं, “सुधा कुठे आहेस तू?”

काळोखात कांही उत्तर न मिळता ते पाऊल बाहेर जाण्यासाठी पुढे वाढले. त्या बरोबर छमछमचा आवाज खोलीत गुंजून उठला. परत एकदा आलेल्या त्यां छमछमच्या आवाजाने ते पाउल थांबले! सर्वत्र नजर फिरवून पाहिली पण कोणी नजरेत आलं नाही. आपल्या शर्टातल्या खिशातून एक सिगरेट काढली. आपल्या जवळ असणाऱ्या लाईटरने त्या सिगरेटला पेटवण्याचे प्रयत्न करत करत आपले लक्ष पैंजणाच्या ध्वनीवर केंद्रित केले परंतु सर्व निरर्थक. खोलीत कांहीही हालचाल जाणवली नाही. आपल मन शांत ठेवून खोल श्वास घेऊन परत एकदा विचारले, “सुधा, कुठे आहेस तू?”

कांहीही उत्तर भेटलं नाही. आता मात्र धीर संपला. आपण विचारलेल्या प्रश्नाचं कांही उतर मिळत नाही हे पाहून खूप वैताग आला. पैंजणाचा छम छम आवाज पण एकू येत नव्हता. रागाने सिगरेटला एकीकडे फेकून “सुधा, कुठे आहेस तू?” असं परत एकदा विचारले. परंतु, कांहीही उत्तर मिळाले नाही. उरली होती ती फक्त निरव शांतता...

“का कोणी आपल्या प्रश्नाचे उत्तर देत नाही? आपण जे करत आहे ते कांही चुकीचं आहे का? नाही! मग का सर्व संशयाने पाहात असतात?” असे अनेक प्रश्न मनांत धुसमसत होते. मन बेचेन होतं. कुणाला बघायला तडफडत होतं. तितक्यात विचारांवर जणू ब्रेक लावत असेल तशी त्या शांत वातावरणात दरवाजाची डोअरबेल गुंजून उठली...

“ट्रिंग... ट्रिंग...”

“कोण आलं असेल? काय आज आपल्या इंतजारीचा अंत आला?”

स्वतःच्या प्रिय व्यक्तिला भेटायला कोणाला नाही आवडणार?

डोअर बेलनी मनात एक आशा निर्माण केली. तिचे स्वर एकून पहिल्या पावसाचे थेंब जमिनीवर पडताच जसे मोराचे पाऊल थिरकून उठतात तसेच ते पाउल आनंदविभोर होऊन दरवाज्याकडे वळाले... दरवाजा उघडून आपल्या प्रिय व्यक्तिला मिठीत घेण्यासाठी ते आतुर झाले. वेगाने ते पाउल पुढे वाढू लागेल, त्यांचबरोबर छमछमच्या आवाजाने सर्व वातावरण ही गुंजून उठले... खूपच उत्साहाने दरवाजा तर उघडला परंतु आलेल्या व्यक्तिला पाहून सर्व उत्साह ओसरला गेला...

दारावर उभी असलेली मैत्रीण निर्मला मंद स्वरात म्हणाली, “बरं आहे न?”

परंतु दार उघडणाऱ्याचा मुखातून हताशाने विरक्त झालेला, “सुधा, कुठे आहेस तू?” असा उद्गार निघाला.

हे ऐकून निर्मला विचलित होऊन म्हणाली, “अरे! तू तुझी ही काय अवस्था करून घेतली आहेस? जरा आरश्यात स्वतःला पहा. देवा! कस समजवायचे तुला. अरे! तू वास्तविकतेचा स्वीकार का करत नाहीस?”

समोरून कांहीही उत्तर मिळाले नाही! आणि ते भेटेल अशी कांहीही अपेक्षा निर्मलानी ठेवली पण नव्हती. ज्यांनी स्वतःच सर्वस्व गुमावलं असेल त्याला स्वतःला जपण्याचा सल्या देण्यात काय अर्थ! जो स्वतःचीच फसवणूक करून आनंदित राहत असेल त्याला समजवण्यात काय अर्थ! तरी सुद्धा प्रयत्नकरून बघायला काय हरकत आहे असा विचारकरून निर्मला पुढे म्हणाली, “तुला हकीकतचा सामना करावाच लागेल. विपरीत परिस्थितीशी आपण लढलो नाही तर ती आपल्यावर हावी होऊन जाते. तुझ्याशी तसचं घडलं आहे. अरे! तू हे का समजत नाही की तुझा नवरा विराग आता या जगात राहिला नाही. भानावर ये सुधा... भानावर ये... तुझ्या नवर्‍या विराजचे कपडे घालून... त्याची अशी नक्कल करून तू कुठपर्यंत स्वतःची अशी फसवणूक करत राहशील?”

हे एकून सुधा शून्यमनस्कपणे निर्मलाकडे पाहू लागली.

निर्मलाला तिची हालत बघवत नव्हती. तिची अवस्था पाहून निर्मला विचलित झाली होती.

सुधाच्या पायातील तुटलेल्या पैंजणाकडे पाहत निर्मला खिन्न स्वरात पुढे म्हणाली, “पावलोपावली मश्करी करणारी... दुसऱ्यांना हसवणारी... कुठे आहे आमची ती सुधा... आम्हाला ती परत पाहिजे... परत पाहिजे...” असं म्हणत निर्मला ढसाढसा रडायला लागली.

सर्वस्व गमावून हताश झालेली सुधा निस्तेज नजरेने निर्मलाला रडताना पाहू लागली. अखेर सुधाचे ओठ फडफडले आणि त्यातून स्वर निघाला, “सुधा, कुठे आहेस तू?”


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract