Prashant Subhashchandra Salunke

Horror Fantasy Thriller

3  

Prashant Subhashchandra Salunke

Horror Fantasy Thriller

ती...

ती...

4 mins
188


मी... मी... कोण? तुम्हाला ऐकून नवल वाटेल परंतु माझ कांही नाव नाही... कां बरं? कारण मी एक आत्मा आहे... आणि आत्म्याला जातपात, नांवगांव कांही नसतं... त्यादिवशी जरी मी मेलो होतो तरी मला त्याच कांहीही दु:ख वाटल नाही कारण ती माझ्या बरोबर नव्हती... हो ती... कोण ती हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझ्या मृत्यूची गोष्ट ऐकायला लागेल... माझ्या मृत्यूची कहाणी एकदम रोचक आहे... तुम्हाला ती ऐकायला जरूर आवडेल...

*****

सुमारे आठ महिन्यापूर्वी मी माझ्या आजारी काकांच्या तबियतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या गावी जात होतो. माझ्या काकांच गांव उंच डोंगरावर आलेलं असल्यामुळे नाईलाजाने मला माझी कार सोडून पुढचा प्रवास पाई पाई करावा लागणार होता. जवळजवळ दोन तास चाललो होतो तरी सुद्धा मी अजून माझ्या काकांच्या गावी पहोंचलो नव्हतो. दुपारची वेळ होती. सूर्य आभाळात बरोबरचा तापला होता. माझ्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या... मी आता पुष्कळ दमलो होतो. मी माझ्या कोरड्या होठांवर जीभ फिरवून त्यांना ओले करण्याचा निरर्थक प्रयत्न करता करता माझ्या कांड़ा घडियालीत बघितलं. बरोबर दुपारचा दीड वाजला होता! वेळ जणू पंख लागलेल्या घोड्यासारखा धावत होता. जर मी वेळेवर पोहोंचलो नाही तर? हा विचार येताच माझ्या अंगात कापरा भरला. माझ्या काकांच्या तबियतीची विचारपूस करण्यासाठी मला वेळेवर पाहोंचणे अगदी तातडीचे होते. माझे काका गेल्या कांही दिवसांपासून खूपच आजारी राहत होते. त्यांची तबियत पुष्कळ बिघडता, आता ते मृत्युपथारीवर पडल्या पडल्या त्यांची शेवटची वेळ मोजत होते. त्यांचा जीव कधी जाईल त्याचा कांहीही भरोसा नव्हता. जर माझ्या काकांनी जीव सोडण्या अगोदार मी त्यांच्यासमोर गेलो नाहीतर? ह्या विचार मात्रनी मला घाम सुटला. नाही... नाही... जर असं झाल तर माझे काका त्यांची करोडो रुपियांची मिळकत माझ्या त्या धृत चुलत भाऊ दुर्गेशच्या नावावर करतील. असा विचारकरून मी घाईघाईने आपले पाऊल उचलू लागलो. अचानक माझी दृष्ट एका वळणांवर गेली! मला आठवल की हा वळण माझ्या काकांच्या गावी लवकरात लवकर पहोच्ण्याचा आडमार्ग होता! दुर्गेश माझ्या काकांचे कानभरून त्यांची सर्व संपती स्वतःच्या नावावर करून घेईल त्या अगोदर गावी पाहोच्ण्याच्या विचारांनी मी त्या आडमार्गाने जाण्याच ठरवलं. परंतु दुसऱ्याच क्षणी मला आठवल की हा आडमार्ग एका जुन्या दफनभूमीतून पसार होत होता. गावतले लोक असं म्हणायचे की त्या दफनभूमीत भूतप्रेत वास करतात. आता अश्या जागेवरून जाण्याचा विचार मात्रने माझ्या अंगावर काटा आला पण दुसऱ्या बाजूला करोडोची संपती आठवता माझ्या मनातील सर्व भीती नाहीशी झाली. मी धाडस करून त्या आड मार्गाने जाण्याचा विचार केला, “दुपारच्या ह्या वेळात कसली भीती??? असपण भूतप्रेत रात्रीचेच बाहेर निघतात न!!!”

मी सर्वत्र नजर फिरवून पाहिले परंतु वाटचालीत माझी सोबत देईल असं दुसरं कोणी दिसल नाही. अखेर सर्व भीती झटकून मी पुढे जाण्यासाठी माझे पाऊल उचलले. थोडे अंतर चालल्यावर मला दफनभूमीचा दार दिसायला लागला. दारा जवळ येताच माझे पाऊल थांबले. माझ्या डोळ्यांसमोर काळापासून बंध पडलेल्या दफनभूमीचा जर्जरित दरवाजा होता. मी आसपास नजर फिरवली परंतु त्या निर्जनस्थळी येण्याची कोण हिंमत करणार!!!

मी मनोमनी मझ्या इष्टदेवतेला स्मरणकरून दफनभूमीच्या दाराला उघडले. काळापासून बंध पडलेला तो गंज लागलेला दार “चरररर...” च्या आवाजाने उघडला. तो आवाज दफनभूमीच्या त्या निरव शांततेला भयावह बनवू लागला. घाबरत घाबरत मी त्या दफनभूमीवर माझे पाऊल ठेवले. त्या बरोबर सुटलेल्या वाऱ्यामध्ये जवळपासची सुकलेली पान इकडेतिकडे उडू लागली. मनातील भीती दूर करण्यासाठी मी मोठ्याने गाणी गायचे सुरु केले. अजून मी थोडेच पाऊल चाललो असेन तितक्यात मंद पण स्पष्ट स्वर ऐकू आला, “श...श...श...”

हे ऐकताच माझे पाय लटपट करू लागले. मी हनुमान चालीसा बोलत बोलत इकडेतिकडे पाहू लागलो परंतु मला जवळपास कोणी दिसले नाही. मी हिमंतकरून पुढे पाऊल उचलले... मागे वळून पाहण्याची माझी हिमंत होत नव्हती. माझे मन अनेक शंका कुशंकानी भरून गेलं. मला लवकारत लवकर त्या दफनभूमी मधून बाहेर निघायचे होते. परत एकदा आवाज आला, “श... श... श...” ह्या वेळेस आवाज पहिल्या पेक्षा थोडा मोठा होता. मी घाबरून मागे वळून पहिले पण मला तिथे कोणीचं दिसले नाही. मनातली शंका समजून मी परत एकदा चालण्यासाठी माझे पाऊल पुढे उचलले. तेव्हा तिसऱ्यांदा मला ऐकू आले. “श... श.... श...”

आता मात्र माझी हिंमत तुटली. माझे हातपाय गळू लागले. मी सर्वत्र नजर फिरवली परंतु थडग्यां शिवाय त्या दफनभूमीमध्ये दुसर काय दिसणार! मी जाम घाबरलो होतो. माझे हाथपाय कंपत होते. माझ्या हृदयात पिडा होत होती. अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. अचानक मला माझ्या पायाघालून “श... श... श...”चा स्वर स्पष्टपणे ऐकू आला. आता माझी उरलेलीसुरलेली हिंमत सुद्धा तुटली. दफनभूमीमध्ये मुडदे दाटलेले असतात ही गोष्ट लक्षात येता मी हादरलो. पेंटच्या मागच्या खिस्यातून रुमाल काढून कपाळावर आलेला घाम पुसायला जाता त्यातून माझे पाकीट खाली जमिनीवर पडले. मी धडकत्या ह्रदयाने जमिनीवर पडलेल्या त्या पाकिटाला उचलण्यासाठी जसा हाथ पुढे केला तसाच माझ्या सावलीने माझा हाथ धरला आणि विचारलं, “श... श... श.... ऐकतो? उन्हात का उभा आहेस? मला खूप भाजतय...” हे ऐकून माझ्या ह्रदयात एक पिडा झाली आणि मी तिथेच ढळून पडलो...

*****

त्यादिवशी जरी मी मेलो होतो तरी मला त्याच कांहीही दु:ख वाटल नाही कारण ती माझ्या बरोबर नव्हती... हो ती... माझी सावली... कारण आत्म्याला सावली नसते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror