Prashant Subhashchandra Salunke

Drama Tragedy Inspirational

3  

Prashant Subhashchandra Salunke

Drama Tragedy Inspirational

ते तर जरा...

ते तर जरा...

4 mins
161


पहाटे पहाटे एक वृद्ध गृहस्थ वर्तमानपत्राने आपले शरीर झाकून त्यातून उब मिळविण्याचा निरर्थक प्रयत्न करीत होते. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या लोकांची ये-जा हळू हळू वाढू लागली होती. तेवढ्यात त्या वृद्ध गृहस्थाला एक परिचित आवाज एकू आला, “अहो! रमाकांतभाऊ, आज सकाळी सकाळी बागेत! आज लवकर आले वाटतं."

रमाकांतभाऊ थोडे नाराजगीने म्हणाले, "हो"

मित्राच्या नाराजगीची जाणीव झालेले गणपतभाऊ सांत्वनदायक आवाजात म्हणाले, “काय झालं मित्रा? का इथे असा बसला आहेस? घरी सर्वकाही बरं आहे न?” गणपतभाऊने एका दमात पुष्कळशे प्रश्न विचारले.

रमाकांतभाऊ, "काल माझी सून सुधा माझ्याशी परत भांडली.”

गणपतभाऊ, "मग तुझा मुलगा मुकेश तुझ्या सुनेला कांही म्हणाला नाही?"

रमाकांतभाऊ निराशाने म्हणाले, "तो उलट मलाच म्हणाला... बाबा रोजच्या तुमच्या ह्या कटकटीने मी वैतागलो आहे. असं म्हणून त्यांने मला घराबाहेर केलं.”

गणपतभाऊ, "अरे देवा! हे काय म्हणत आहेस? लग्नाआगोदर तुझा मुलगा मुकेश फार भोळाभाबडा वाटायचा. तो असं करेल ह्या गोष्टीवर मला अजूनही विश्वास बसत नाही.”

रमाकांतभाऊ, "हो मित्रा, माझा मुलगा मुकेश लाख मोलाचा हिरा आहे... हिरा... परंतु ते तर जरा..."

गणपतभाऊ, “सूनेच्या ऐेक्ण्यात आला... असेच न? आणि अश्या मुलाला तू लाख मोलाचा हिरा म्हणतो! अरे! माझा मुलगा महेंद्र पहा. तो मला काय म्हणतो माहित आहे का? तो म्हणतो की, बाबा, ह्यां जगाला तुमची किती जरूर आहे ते मला नाही माहित... पण ह्या घराला... ह्या परिवाराला... तुमच्या प्रेमाची... तुमच्या सांत्वनाची... तुमच्या अनुभवांची... आणि सल्याची अत्यंत जरूर आहे.” थोडे थांबून गणपतभाऊ पुढे म्हणाले, “जर माझी सून शोभा मला काय वाकडतिकड बोलली न, तर माझा महेंद्र तिला सरळ ऐेकवेल की, माझे बाबा घराच्या बाहेर जाणार नाही. ते आपल्या बरोबर नाही पण आपणच त्यांच्या बरोबर रहात आहो. जर घरा बाहेर जायचं असेल तर तू जा.”

रमाकांतभाऊ म्हणाले, “तुझ नशीब चांगल आहे मित्रा, परंतु आता मला पुढची काळजी होत आहे. आता ह्या वयात मी कुठे जाऊ? काय करू? आता माझं कोण?”

गणपतभाऊ, “अरे! कुठे जाऊ म्हणजे? आताच तुझ्या घरी जाऊन तुझ्या मुलाला घराबाहेर काढ... घर तर तुझ्याच नावावर आहेन?”

रमाकांतभाऊ, “नाही मित्रा, एकुलताएक मुलगा होता म्हणून सगळं त्याच्याच नावावर विकत घेत होतो. घर पण त्याच्याच नावावर आहे, आता मी काय करू?”

रमाकांतभाऊ. “आता करायचं काय? जो पर्यत कांही मार्ग सुचत नाही तोपर्यंत चल माझ्या घरी येऊन रहा. माझा महेंद्र तुझी काळजी घेईल. चल... चल... असं इथे बसू नको. सर्वजण आपल्याकडे बघत आहेत.”

रमाकांतभाऊ, “नाही मित्रा, असं कुणाच्या घरी जाऊन राहण योग्य नाही. मी उगाचच तुझ्यावर बोझ बनायला मागत नाही.”

गणपतभाऊ, “हे काय बोलत आहेस मित्रा, काय एक मित्र दुसऱ्या मित्रा वर बोझ बनतो? जर हीच परिस्थिती माझ्यावर ओढवली असती तर मी तुझ्यावर बोझ झालो असतो का?”

रमाकांतभाऊ, “गणपतभाऊ, तुम्हाला तर वाईट वाटल... मित्रा मला तुझ्या सूनेचा स्वभाव माहित आहे... उगीचच मझ्या मुळे तुला पण ह्या बाकावर येऊन बसायची वेळ येईल.”

गणपतभाऊ, “अरे! बसाव लागल तर बसीन... पण उरलेले दिवस आता बरोबर घालवू. चल उठ इथून.”

रमाकांतभाऊ, “नाही मित्रा, लोकं माझ्या मुला बदल चर्चा करतील. ते म्हणतील की बघा एकुलताएक मुलगा आहे तरी बापाला मित्राच्या घरी राहव लागत आहे. त्याची समाजात काय अब्रू राहील?”

गणपतभाऊ, “इथे बसून राहिल्याने तुझ्या मुलाची समाजात अब्रू टिकून राहील???”

रमाकांतभाऊ, “मी आता ह्या शहरात थांबणारच नाही.”

गणपतभाऊ, “तर कुठे जाशील?”

रमाकांतभाऊ, “विचार करतो की इथून कुठे लांब निघून जाईन, हा... तीर्थयात्रेला निघून जाईन... असंही आता मी किती दिवस जगणार आहे.”

गणपतभाऊ, “तुझा मुकेश एवढा निर्लज्ज निघेल ते वाटलं नव्हत.“

रमाकांतभाऊ विचलित होऊन म्हणाले, “अरे! नाही... नाही... मुकेशला कांही बोलू नको. तो तर बिचारा खूप भला आहे.. लाख मोलाचा हिरा आहे... हिरा... पण ते तर जरा...”

गणपतभाऊ रागाने म्हणाले, “कमाल आहे? आपण आईवडील कधी सुधरणार? तुझ्या मुलाने तुला घरा बाहेर काढलं, तुला दारोदारी भटकायला लावल तरी सुद्धा तू त्याला चांगल बोलतोस!” कांही विचारकरून गणपतभाऊ पुढे म्हणाले, “एक वडील चार मुलांना संभाळू शकतो परंतु चार मुलं मिळून एक वडिलांना संभाळू शकत नाही... धिक्कार आहे अश्या मुलांवर... घोर कलयुग आहे... मित्रा.. घोर कलयुग..”

रमाकांतभाऊ बैचेन होऊन म्हणाले, “आता जे झालं ते झालं... जुन्या गोष्टी बोलून काय फायदा आहे कां?”

गणपतभाऊ, “रमाकांत, बघ अश्या नीच मुलाची हालत खराबच होईल. जो मुलगा आपल्या आईवडीलांना संभाळू शकत नाही... पोषु शकत नाही... तो माणूस नाही पण हैवान आहे हैवान...”

रमाकांतभाऊ, “आता सोड ह्या विषयाला... त्यात मुकेशचा काय दोष. तो तर लाख मोलाचा हिरा आहे... हिरा... पण ते तर जरा...”

गणपतभाऊ वैतागून म्हणाले, “अरे! तू काय माणूस आहे! तुझ्या मुलाने तुला घरा बाहेर काढलं तरी सुद्धा तू त्याला हिरा आहे हिरा असं बोलतो! रमाकांत कोऱ्या कागदावर लिहून ठेव. अश्या नीच मुलाची हालत खराबच होणार.. जो मुलगा आपल्या आईवडीलांना संभाळू शकत नाही त्याचा मुलगा पण तेच बघणार... तेच शिकणार... मुकेशचा मुलगा पण बघ एकदिवशी त्याला कशी लाथ मारून घरा बाहेर काढेल ते...”

रमाकांतभाऊ ओशाळून म्हणाले, “गणपत, हेच तर मी तुला कधीच समजवण्याचा प्रयत्न करीत आहे... माझा मुलगा मुकेश तर लाख मोलाचा हिरा आहे... हिरा... पण ते तर जरा...”

(आणि रमाकांतभाऊंच्या डोळ्यांसमोर त्यांचे लाचार आईवडिलांचे चहेरे आले... कळकळीने त्यांना घराबाहेर न काढण्याची विनवणी करत असणारे त्याचे स्वतःचे आईवडीलांचे चहेरे.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama