Prashant Subhashchandra Salunke

Fantasy Inspirational Children

3  

Prashant Subhashchandra Salunke

Fantasy Inspirational Children

नक्कल

नक्कल

3 mins
206


मोहनने त्याचा मित्र केशवला खेळण्या साठी खूप हाका मारल्या परंतु तो बाहेर आलाच नाही. अखेर तो कंटाळून निघून गेला. हे पाहून केशवच्या आईने त्याला विचारले, “काय रे बाळा, तुला केव्हा पासून मोहन हाका मारत होता तर तू त्या सोबत खेळायला का गेला नाहीस?”


केशव रागाने म्हणाला, “मी नाही जाणार. मला तो मुळीच आवडत नाही.”


आईने प्रेमाने विचारले, “का बरे?”


केशव, “आई, मला त्या माकडा बरोबर खेळायला नाही जायचे.”


आई हे ऐकून हसली आणि म्हणाली, “का रे त्याला माकड म्हणतो? असे काय केले त्यांने?”


केशव पिसाळून म्हणाला, “तो नेहमी माझी नक्कल करतो, मला ते मुळीच आवडत नाही.”


आई, “कशी रे नक्कल?”


केशव, “आई, मी जसे कपडे घालतो तो पण तसेच घालतो. मी जसे वागीन तसच तो पण वागतो. तो नेहमी माकडा सारखी माझी नक्कल करतो. मला ह्या गोष्टीचा खूप राग येतो आणि आई तो स्वभावाने पण फार वाईट आहे.”


आई, “ते कसे बरे?”


केशव, “आई, तो मंदिरात जात नाही, मोठ्यांचा आदर करत नाही. आता तुच सांग अशा मुलाच्या सोबतीत मी बिगडणार नाही का?”


आई हसून म्हणाली, “अरे! त्याच्या नक्कल पासून सुटका मिळवण्याची किती रे मोठी संधी आहे तुझ्या जवळ...”


केशवने विचारले, “ते कसे ग आई?”


आई म्हणाली, “बघ, उद्या पासून तू जेव्हा शाळेत जाशील तेव्हा पहिले मंदिरात जा. शाळेत गेल्या वर तुझ्या गुरुजींचे चरणस्पर्श कर. अस वाग की ज्याची नक्कल तो उद्धट मोहन करणारच नाही.”


केशव आनंदाने म्हणाला, “अगदी बरोबर आई, आता उद्या पासून मी तसेच वागीन.”


दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदाने शाळेत गेलेला केशव दुपारी रागाने घरी परत आला. त्याला रागाने दफ्तर एकी कडे फेंकताना पाहून आईने विचारले, “काय झाले रे बाळा? कसला रे तुला इतका राग आला आहे?”


केशव म्हणाला, “त्या मोहनने आज पण माझी नक्कल केली. मी मंदिरात गेलो तर तो पण आत आला. मी गुरुजीचे चरणस्पर्श केले तर त्यांनी पण केले. तुझे बोलणे चुकीचे ठरले.”


आई म्हणाली, “तर त्यात वाईट वाटण्या सारखे काय आहे रे बाळा? तुम्हा दोघांना देवाचे दर्शन झाले सोबत गुरुजींचे आशीर्वाद मिळाले आणि तुझी वागणूक पाहून तुझा मित्र पण स्वतःची वागणूक सुधारत आहे ही गोष्ट चांगली नाही का?”


केशव रागाने म्हणाला, “पण तो मोहन माझी नक्कल का करतो?”


आई शांतिने म्हणाली, “बाळा, बघ एखाद्याला हरवणे खूप सोपे आहे, पण त्याला जिंकणे खूप अवघड असते. तुला तर ह्या गोष्टीचा आनंद झाला पाहिजे कि कोणी तुझी नक्कल करत आहे! कारण कोणी आपली नक्कल तेव्हाच करतो जेव्हा तो आपला मना पासून आदर करत असतो. तेव्हा आपण त्याचा तिरस्कार न करता त्याला प्रेम दिले पाहिजे. जेव्हा तुझी कोणी नक्कल करत असेल तेव्हा तुला तुझी वर्तणूक सुधरवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे कारण तुझी वागणूक पाहून तुझी नक्कल करणारा पण स्वताहत सुधारणा आणेल. बाळा, गांधीजीनी देशाला स्वच्छतेचे महत्व समजवण्यासाठी स्वतः झाडू हातात घेतला. आज पाहतोसना गांधीजीच्या पावलावर पाउल ठेऊन देशात स्वच्छतेसाठी किती जागरूकता आली आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम म्हणायचे कि, “तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील.”


केशव म्हणाला, “आई, आजपासून मी पण माझी सवय बदलीन. आता माझी कोणी नक्कल केली तर मी आजीबात चिढणार नाही पण उलट अशी वागणूक करीन कि त्यामुळे माझे आणि माझी नक्कल करणाऱ्यांचचे भविष्य उज्ज्वल बनेल.”


तितक्यात बाहेरून मोहनने खेळण्यासाठी हाक मारली. केशव तातडीने म्हणाला, “आई, मी मोहन सोबत खेळाला जात आहे.”


आई कौतुकाने हासली आणि म्हणाली, “आता माझ्या बाळात आली अक्कल”


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy