Prashant Subhashchandra Salunke

Romance Fantasy Inspirational

3  

Prashant Subhashchandra Salunke

Romance Fantasy Inspirational

मातीची भांडी

मातीची भांडी

4 mins
153


ह्या ‘महिला दीना’च्या सणाला... स्टेजवरून घोषणा झाली, “एंड एवोर्ड गोस टू... मिसिस उमा... उमाताईंनी ह्या थोड्याच वर्षात अगदी कमालच करून दाखवली आहे. एक सफळ बिजनेस वूमन म्हणून त्यांनी बिजनेसच्या दुनियेत चांगल नाव कमवलं आहे. एक स्त्री काय करू शकते त्याचे सर्वोतम उदाहरण म्हणजे उमाताई... मी उमाताईंना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि महिलांना प्रोत्साहित करणारे दोन शब्द सांगावे.”

टाळ्यांचा गडगडाटने होल गुंजून उठला.

एवोर्ड घेण्यासाठी उभ्या झालेल्या उमाताईंने आपल्या नवऱ्या शंकरभाऊकडे पाहून हळूच म्हणाल्या, “मी स्टेजवर जाऊन काय बोलणार?”

शंकरभाऊ म्हणाले, “तुझ्या डोक्यात काय चालल आहे ते मला मुळीच माहित नाही पण एवढा विश्वास जरूर आहे की तू जे करशील ते योग्यचं करशील.”

शंकरभाऊंच्या ह्या शब्दांबरोबर उमाताईंच्या मनातल्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. स्टेजवर जाताजाता त्यांच्या डोळ्यांसमोरून एका क्षणात सर्व प्रसंग वाहून गेले...

कांही वर्षापूर्वीचे ते क्षण...

उमा संस्कारी आणि कर्तबगार तरुणी होती. तिचे नुकतेच शंकरशी लग्न झाले होते. शंकर स्वभावाने खूपच चांगला आणि महेनती तरुण होता. शंकरच्या लहानपणीच त्याचे आईवडील वारले होते. शंकरने स्वतःच्या हिंमतीने पुढील अभ्यास पूर्णकरून नोकरीवर लागला होता. असं पाहता शंकरचा पगार कमी होता पण घर चालवण्यासाठी पुरेसा होता.

लग्नानंतर आज उमाचा सासरीत प्रथमच दिवस असल्यामुळे शंकर तिला आपलं घर दाखवत होता. उमा खूपच उत्साहाने स्वतःचं घर पाहात होती. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत वावरता वावरता ते स्टोररूममध्ये येऊन थांबले. स्टोररूममध्ये ठिकठिकाणी निरनिराळी मातीची भांडी ठेवली होती. ती मातीची भांडी पाहून उमाने कौतुकाने विचारलं, "अहो, एकलं का? ही मातीची भांडी इथे कशी काय?"

शंकर म्हणाला, "उमा, ही मातीची भांडी माझ्या बाबांनी बनवली आहेत. पूर्वी आमचा मातीची भांडी बनवायचाच व्यापार होता. माझे वडिलांनी बनवलेली भांडी लोकं खूप उत्साहाने विकत घ्यायचे. त्या वेळेस आमच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती."

उमा उत्साहाने म्हणाली, "तुम्हाला मातीची भांडी बनवता येतात?"

शंकरने होकारमध्ये मान हलवली, "माझे बाबा मला नेहमी म्हणायचे की माणसाला एक तरी कला आत्मसात केलीचं पाहिजे. त्यांनीच मला मातीची भांडी बनवायला शिकवली होती."

हे ऐकून उमाने आश्चर्याने विचारलं, "मग तुम्ही आता मातीची भांडी का बनवत नाही?"

शंकर हताशाने म्हणाला, "आता कोण गं विचारतेय ह्या मातीच्या भांड्यांना. माझ्या बाबांचं स्वप्न होतं की त्यांचा व्यापार खूप वाढला पाहिजे पण आता ह्या धंद्यातपूर्वी सारखी कमाई राहिली नाही म्हणून नसुटका घराण्याचा व्यापार सोडून मी आता नोकरी करू लागलो आहे. काय करणार? नोकरी होती म्हणून तू भेटली नाहीतर एका मातीची भांडी विकणाऱ्याला कोणी मुलगी दिली असती का?"

उमा म्हणाली, “अहो! मी पण कुठे श्रीमंताची मुलगी आहे? तुम्ही माझा स्वीकार करून माझ भाग्य चमकवल आहे. तुम्ही मातीची भांडी जरी विकत असते तरी सुद्धा मला काही फरक पडला नसता. उलट गर्व असता की मी एका कलाकाराची बायको आहे. असं पण कुठला ही धंधा छोटा नसतो बस त्याला मोठा करता आलं पाहिजे.”

शंकर आश्चर्याने उमाकडे पाहू लागला.

उमा प्रेमाने म्हणाली, “अहो! मला मातीची भांडी बनवायला शिकवाल का?”

शंकर कौतुकाने म्हणाला, “तू काय गं करशील मातीची भांडी बनवायचं शिकून?”

उमा ठामपणे म्हणाली, “मला तुमच्या बाबांची गोष्ट पटली.”

शंकर, “कुठली?”

उमा, “तीच की माणसाला एक तरी कला आत्मसात केलीचं पाहिजे. मला मातीची भांडी बनवायची कला आत्मसात करायची आहे. तुम्ही मला ती शिकवाल न?”

शंकर, “अगं पण तुला ते शिकून नक्की करायचं काय आहे?”

उमा, “आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न.”

शंकर, “म्हणजे तू मातीची भांडी बनवून विकण्याचा विचार तर करत नाही न?”

उमा, “हो... असं पण आता तुम्ही एकातून दोन झाले आहात. उद्या आपण तीन होऊ. तेंव्हा तुमच्या एकट्याच्या पगारातून घर चालवणं अवघड जाईल. मी मातीची भांडी बनवून विकीन. तेवढाचं तुम्हाला हातभार होईल.”

शंकर म्हणाला, “अरे! आजच्या जमान्यात कोण तुझी बनवलेली मातीची भांडी विकत घेईल? उलट तू ते बनवण्यासाठी आपली जमापुंजी वाया घालवशील.”

उमा म्हणाली, “माझ्यावर विश्वास ठेवा तसं कांहीही होणार नाही. कलेला योग्य वेळी आणि योग्य जागी प्रस्तुत करण्याची पण एक कला आहे आणि मला ती चांगल्याप्रकारे येते.”

शंकर म्हणाला, “तुझ्या डोक्यात काय चालल आहे ते मला मुळीच माहित नाही पण एवढा विश्वास जरूर आहे की तू जे करशील ते योग्यचं करशील.”

“उमाताई, तुमच्या ह्या सफळते मागे कोणाचा हात आहे?” प्रेक्षकांमधून आलेल्या प्रश्नांने उमाताई भानावर आल्या. माईक हातात घेऊन त्या म्हणाल्या, “माझ्या नवऱ्याचा... त्याचा विश्वासाचा... त्यांनी मला कधी रोकटोक केली नाही. बस एवढा विश्वास ठेवला की मी जे करीन ते योग्यचं असेल आणि त्यांच्या ह्या विश्वासाने माझा आत्मविश्वास वाढत गेला. मातीची भांडी मी बनवली तर होती पण त्यांना कोणी विकत घेत नव्हतं. तेव्हा माझ्या नवऱ्यानी मला माझीच गोष्ट आठवण करून दिली की, कलेला योग्यवेळी आणि योग्य जागी प्रस्तुत करण्याची पण एक कला आहे. दुर्देवाने आपल्या देशात आपल्या कलाकारांना कोणी विचारत नाही पण त्याचं कलाकारांच्या कलेची विदेशांत बोलबोला आहे. मी माझी निरनिराळी मातीची भांडी बनवून आतंरराष्ट्रीय बाजारात त्यांना विकायचे सुरु केले. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात ते बिलकुल अवघड नाही. देवाच्या कृपेने माझ्या मातीच्या भांड्यांची चांगली विक्री होऊ लागली. त्याने माझी हिंमत खुलली. मातीच्या भांड्यांसोबत मी वेगवेगळ्या प्रकारचे मातीचे कंदील आणि दिवे बनवून विकण्याचे सुरु केलं. आज आमच्या मातीच्या भांड्यांची विदेशात बोलबोला आहे. इथे संचालिका साहिबांची एक गोष्ट मी सुधरवायला इच्छ्ते की, एक स्त्री काय करू शकते त्याचे नाही... पण एका स्त्रीला तिच्या नवऱ्याचा पाठींबा भेटला तर ती काय करून दाखवू शकते त्याचे सर्वोतम उदाहरण म्हणजे ही उमाताई...”

टाळ्यांच्या गडगडाटीमध्ये उमाताईंने एवोर्ड घेतला.

सर्वात मोठा टाळ्यांच्या आवाज शंकरभाऊंचा होता.


त्या संध्याकाळी...

शंकरभाऊ म्हणाले, “उमा, आज तू माझ्या वडिलांच स्वप्नपूर्ण करून दाखवलं... मला तुझ्यावर गर्व आहे.”

उमाताईंने धावत जाऊन शंकरभाऊंना मिठीत घेतलं.

दोघही मन मोकळ करून रडू लागले.

त्यांचा आसवांने भिजू लागली मातीची भांडी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance