राजर्षी शाहूमहाराज.
राजर्षी शाहूमहाराज.
महाराष्ट्राच्या कणाकणात बहुजनांच्या मनामनात निवास करणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा.👏खर तर छत्रपतीं चे कार्य आभाळाइतकच ऊतुंग!आज त्या लोकराजांचा जन्म दिवस!! इतिहास चाळताना राजश्री शांहु महाराज यांच्या विषयी अनभिज्ञ असलेल्या त्यांच्या विराट व विशाल कार्याचा परिचय मला झाला शिवछत्रपती!!! अर्थात थोरले राजे यांच्या कीर्तीला साजेल रूचेल व छत्रपती शिवाजी महाराज यांचे दैदिप्यमान कार्याचा ध्वज तेजोमयी होऊन आणखी जोमाने फडकविण्याचे महान कार्य शाहुरांजानी केले आहे.
26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर व देशात साजरा करतो. याच दिवशी 1874 साली कागल येथील घाटगे घराण्यात जयसिंगराव घाटगे व राधाबाई या या दाम्पत्याच्या पोटी यशवंतरावांचा जन्म झाला. कोल्हापूर संस्थानातले चौथे शिवाजी महाराज यांना वेडसर ठरून अहमदनगर येथील तुरुंगामध्ये ब्राह्मणांच्या मदतीने इंग्रजांनी षडयंत्र करून डांबून ठेवले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे शाहू असे नामकरण केले. राजकोट येथील राजकुमार कॉलेज तसेच धारवाड येथे त्यांनी शिक्षण पूर्ण केले बडोदा येथील खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई साहेब यांच्याशी शाहुंचा विवाह झाला 2 एप्रिल 1984 रोजी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हाती घेतली.तेव्हापासुन शाहुंनी विविध समाजोपयोगी कार्य प्रारंभिले.प्रथम शाहुपुरी येथे गुळाची बाजारपेठ स्थापन केली जी आजही ऊभी आहे.
वेदोक्त प्रकरण विचारांना कलाटणी =
पंचगंगा नदीवर कार्तिक स्नानासाठी शाहू महाराज गेले असताना तेथील पंडित हे पूर्ण वेदोक्त मंत्र न उच्चारता पुरणोकत मंत्र उच्चारत असताना महाराज यांच्यासोबत असलेले पुरोहित भागवत पंडित व राजारामशास्त्री यांनी महाराजांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली तेव्हा वेदोक्त मंत्र हे क्षत्रियांसाठी आणि पुरणोकत मंत्र हे शूद्रां साठी आहेत व आपण शूद्र आहात असे सांगण्यात आले ही गोष्ट महाराजांच्या विचाराला कलाटणी देऊन गेली आपण राजा असताना आपल्याला अशी वागणूक मिळते तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असतील नंतरच्या सार्या घडामोडी महाराजांकडून होणार होत्या महाराज घडामोडींची ती नांदीच होती .
शाहुरांजानी केलेल्या समाजोपयोगी कार्य =
( 1) 26 जुलै 1902 रोजी मागासवर्गीयांसाठी 50 टक्के आरक्षण शाहूमहाराज यांनी सुरू केले.
(2)1907 साली सहकारी तत्वावर कापड गिरणी उभी केली.
(3) 1907 अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केले तसेच मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया वसतीगृह सुरु केले
( 4)1908 साधी भोगावती नदीवर राणी लक्ष्मीबाई तलाव बांधला
(5)1911 सत्यशोधक समाजाची स्थापना केले
( 6)1911साली पंचम जॉर्जच्या राज्याभिषेका बद्दल दरबार भरून आनंद व्यक्त केला हे पंचम जॉर्ज म्हणजे ज्यांनी 1911 मध्ये भारतात आल्यावर
1905 साली इंग्रजांनी केलेली बंगलादेश फाळणी रद्द केली याचाच आनंद शाहू महाराजांनी दरबार भरून व्यक्त केला शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला शाहू प्रणित सत्यशोधक समाज असे म्हणतात
(7)1916 सक्तीचा शिक्षणाचा कायदा त्यांनी आणला.
(8) 1917 साली विधवा पुनर्विवाह कायदा पास केला.
( 9) सात ते चौदा वयोगटाला मोफत व सक्तीचे शिक्षण लागू केले.
(10)1918 कोल्हापुरात आर्य यसमाजाची शाखा सुरू केली.
( 11)27 जुलै 1918 साली हजेरी पद्धत म्हणजे जी गुन्हेगारी समजल्या जाणाऱ्या जमातींना पोलीस ठाणे अथवा गाव पातळीवरील चावडीवर जाऊन हजेरी देणे बंधनकारक होते ती हजेरी पद्धत बंद केली
( 12) 18 सप्टेंबर 1918 रोजी कुळकर्णी वतने नष्ट केले.
(13)12 जुलै 1919 कोल्हापूर इलाख्यातील विवाह संबंधी कायदा नव्याने सुरू केला.
(14) 1919समाजातील क्रूर प्रथा व वर्तनास प्रतिबंध करणारा
(15) 1920 साली शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद नागपूर येथे भरली होती
(16)1920 साली मराठा पुरोहित तयार करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक विद्यालय विद्यालयाची स्थापना केली
(17)ऑक्टोबर 1920 आली जगद्गुरु संबंधीचा जाहीरनामा काढला.
( 18)महार वतने खालसा केली( तेच पुढे 1958 मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कायदा करून महारवतनांचा शेवट केला)
(19) देवदासी प्रतिबंधक कायदा सुरू केला.
(20) कोल्हापूर येथील क्रांतीकारी संघटना संघटनेला वर्षाला पाचशे रुपये आर्थिक मदत सुरू केली
(21) क्रांतीकारकांनी काढलेल्या वनिता वस्त्र भंडार मधून ते दरवर्षी संस्थांनासाठी संस्थानाची सरकारी कापड खरेदी करीतअसत.असे करून एक प्रकारे क्रांतिकारकांना मदत करत होते.
वस्तीगृह व शैक्षणिक संस्थाचे निर्माण =
रखमाबाई केळवकर या स्त्रीला शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी नेमले होते.यावरून स्त्रियांविषयी सन्मान दिसतो. शाहुंनी नेहमीच प्राथमिक शिक्षणाला महत्त्व दिले.जर माझी प्रजा तिसरी पास जरी झाली तरी मी माझे राज्य प्रजेच्या हवाली करून राज्यत्याग करून संन्यास घेईन.असे शाहू महाराज नेहमी म्हणत असत त्यामधून त्यांची शिक्षणाविषयी व प्रजेच्या कल्याणाविषयाची तळमळ दिसून येते.त्यांनी पाटील व तलाठी शाळा सुरू केली तसेच लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूल देखील सुरू केले. गंगाराम कांबळे या महार व्यक्तीला सत्यसुधारक हॉटेल काढुन दिले. गुरुकुलात कर्नल हाऊस या नावाने अनाथालय स्थापन केले काही इंग्रजी मराठी अनुवाद करून त्याच्या प्रती मोफत वाटल्या. नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत असा धनंजय कीर यांनी शाहू महाराजांचा गौरव केला आहे. पाचशे लोक वस्तीवरील गावात सकतीची शाळा सुरू केली सहकारी महसूल पैकी सहा टक्के खर्च निवळळ शिक्षणासाठी राखीव ठेवला 1912 पाटील शाळा दिल्ली दरबार वसतिगृह स्थापन केले.विद्यार्थी वस्तीगृहाचे जनक म्हणूनही शाहु महाराजांची ओळख आहे.अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अधिवेशन खामगाव येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले होते महाराष्ट्र व भारतीय सुधारकांचे शाहू महाराज मोठे उदाहरण आहेत.
आंबेडकर व शाहु महाराज =
डाॅकटर भीमराव आंबेडकर व शाहू महाराज यांचा संबंध कायम स्नेह आपुलकी व मैत्रीपूर्ण राहिले आहेत.अस्पृश्य समाजातील लोकांचे प्रचंड शोषण होत असताना रिस्थितीत शिकुन विद्वान झालेल्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे नाव शाहूमहाराजांना गेले तळागाळातील शोशित वंचित समाजातून शिक्षण घेऊन मोठे झालेले पहिलेच विद्वान याचे महाराजांना अपार कौतुक वाटले प्रचंड आनंद झाला उच्चशिक्षित आंबेडकरांचे खूप नाव कौतुक महाराजांनी ऐकले होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना बोलावण्याची मुंबईहुन सातारयाला बोलावण्याची जबाबदारी दळवी या व्यक्तींवर दिली. सुरूवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराजांना भेटण्यास उत्सुक नव्हते.कारण संस्थानिकांचे बेकदर वागणुक आंबेडकरांना माहीती होती.मात्र दळवी यांनी शाहू महाराजां बद्दल सर्व माहिती आंबेडकरांना दिल्यावर डॉक्टर आंबेडकर कोल्हापूर येथे जाऊन शाहू महाराजांची भेट घेतली त्यावेळेस भीमराव आंबेडकर मूकनायक साप्ताहिक चालवत होते परंतु आर्थिक अडचणीमुळे मुकनायक हे बंद पडण्याच्या मार्गावर होते तेव्हा शाहू महाराजांना ही गोष्ट समजताच त्यांनी मुकनायक साठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला सामाजिक लोकशाहीचे आपण महान आधारस्तंभ आहात असे गौरवोद्गार आंबेडकरांनी जाती लंडन हुन महाराजांना लिहीलेल्या पत्रात लिहीले होते अस्पृश्यता विरूदध लढाईत शिक्षणाचे महत्त्व जाणलेल्या शाहूमहाराजांनी आंबेडकरांच्या शिक्षणामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी वेळोवेळी आर्थिक व मानसिक व सामाजिक दृष्ट्या मदत केली यावरून आंबेडकरांच्या जडणघडणीत शाहू महाराजांचा किती मोलाचा वाटा आहे हे ध्यानात येते .1918 साली शाहू महाराज डाॅकटर आंबेडकरांच्या घरी गेले. या बुद्धीवान विद्वान व दलित व्यक्तीबद्दल शाहू महाराजांना नेहमीच कौतुक वाटत वाटायचे. दोन हजार सातशे रुपये शाहू महाराज यांनी आंबेडकराना मुकनायकाच्या पुनरुज्जीवनासाठी दिले.साठी दिले कोल्हापूर येथील माणगाव येथे भरलेल्या बहिष्कृत परिषदेत शाहूमहाराजांनी बाबासाहेबांना दलितांचा नेता घोषित केले. तसेच तुम्ही तुमचा नेता शोधला आहे. तुमचा उद्धार तोच करणार आहे ते एक दिवस साऱ्या भारताचे नेते बनतील असे गौरवोद्गार डॉक्टर्स भीमराव रामजी आंबेडकर यांविषयी काढले होते.आज समस्त बहुजणा मध्ये जो शाहु फुले आंबेडकर विचार पेरला आहे तो याच महान राजाच्या किर्तीची देण आहे.अशा या लोकराजाचे 6 मे 1922 रोजी मुंबई येथे हृदयविकाराने निधन झाले.
