Anjali Bhalshankar

Abstract Action

2  

Anjali Bhalshankar

Abstract Action

पृथ्वीला ओरबाडने बंद करा....

पृथ्वीला ओरबाडने बंद करा....

3 mins
56


पृथ्वीची खरी संपदा जपायलाच हवी.होय!अन्न वस्र निवारा या मानवाच्या मुलभुत गरजा आहेत त्या जर पुर्ण करायच्या असतील तर त्याचे स्रोत जपुन वापरायचा हवेत.संपुर्ण ब्रम्हांडात सध्या तरी एकच पृथ्वी आहे ज्यावर मानवाचे वास्तव्य आहे जर ही मानवजात वाचवायची असेल तर पृथ्वी वाचवावी लागेल नी पृथ्वी वाचवायची तर पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्ती जपावीच लागेल.वनस्पती पाणी खनिजं याचा योग्य व मूबलक साठा निसर्गाने मानवाला वरदान दिलाय त्याचा विनियोग योग्य प्रमाणात व्हायलाच हवा. त्यासाठी प्रत्येक मानवाने विचारपूर्वक कृती केली पाहीजे एक तरी झाड लावायला हवे एकशे तीस कोटीतुन निम्म्या जनतेने एक झाड लावले तरी दिवसाला सत्तर कोटी झाडाची वाढ या निसर्गात होइल पाण्याचा वापर गरजेपुरताच केला तर लाखो लिटर पाण्याची बचत होइल डोंगर फोडून सिमेंटची जंगल वाढवत राहीलो तर एक दिवस असा येईल की फक्त मोठाले टॉवर तर असतील परंतु त्यात रहायला मानव शिल्लक नसेल अथवा निसर्गाचा प्रकोप काही सेकंदात होत्याच नव्हत करेल त्याची उदाहरणही आपण त्सुनामी व उत्तराखंडच्या नैसर्गिक आपत्ती मुळे अनुभवाला आहे अगदी अजुनही आपण करोना सारख्या महामारीतुन आपण पुरेसे सावरलेलो नाही.पृथ्वीतलावर अखिल मानवजातीचा भार आहे जसे आईचा ऊदरात लहानगी पहुडतात तशी समस्त मानवजात पृथ्वीच्या अंगाखांद्यावर निर्धास्त पहुडली आहे. पंरतु जिला आपण माता म्हणतो तिच्या प्रांगणात जन्म घेतो शेवटी मरूणही तिच्यातच विलिन होतो तिचा विचार आपण कीती प्रमाणात करतो?अक्षरशः ओरबाडतो आपण तिला!आपण जंगल उध्वस्त केली पाण्याचा नको तेव्हडा ऊपसा केला डोंगर फोडले.खनिजासाठी खाणी खोदल्या हवा प्रदर्शित केली.नद्या अडविल्या बेसुमार बेहिसाब फक्त घेतच राहीलो आपण तीच्या करून मात्र त्या बदल्यात पृथ्वीला काय दिलं आपणं नद्यांमध्ये आपल्याला नको ते सार टाकतो आपण रासायनिक केमिकल ड्रेनेज पाणि सुद्धा नद्यांमध्ये सोडले मानवाने अक्षरशः गटारांचे स्वरूप आणले नद्यांना.झाडाच्याही बाबतीत तेच करत आलाय मानव अक्षरशः जंगलाची चिरफाड केलीय म्हणूनच जंगलातले हिंस्र प्राणि मानव वस्तीत अन्न पाण्याच्या शोधात फिरू लागले.जंगलातील जैववैविध्य नष्ट होऊ लागले कित्येक प्राण्याच्या जाती नष्ट झाल्याच तेच जलचरांच्या बाबतीतही लाखो मासे वा इतर जलचर रासायन मिश्रित पाण्याने मृत पावतात.कुठे कूठे तर काळा केमिकल युक्त पाउस पडल्याची ऊदाहरणे आहेत.या सार्याचा परिणाम भूगर्भातील अनेक बदलात झाला आहे.शिरच्छेदच सुरू आहे पृथ्वीचा.काही हजारो वर्षानंतर एक ना एक दिवस सारेच नष्ट होणार आहे पंरतु माणसाने केलेल्या चूकामुळे तो काळ निकट येइल कारण आता संपुर्ण जगात जो तो पृथ्वीवर आपला हक्क सांगुन त्या त्या प्रदेशात नैसर्गिक रित्या मुबलक असलेली साधन सामग्री इतरांना देण्यासाठी वेठीस धरत आहे पंरतु त्यांना हे कधी कळणार आहे की हे जग एक ना एक दिवस विनाश पावणा.पंरतु आपण केलेल्या चुकांचे परीणाम पुढे येणार्या हजारो पिढ्यांवर होणार आहेत त्यांच्यासाठी आपण कृत्रिम रीत्या अवांतर साधनांचा कितीही मोठा साठा ठेवला तरीही त्याचा उपभोग घ्यायला निरोगी आयुष्य त्यासाठी शुद्ध हवा पाणी व ऑक्सिजन लागतो जो नैसर्गिक रित्याच उपलब्ध होणार आहे तुम्ही कोट्यावधींच्या नोटा जमवाल पंरतु त्याचे रूंपातर कधीही भाकरीत होणार नाही जी तुमच पोट भरेल वा पाण्यात होणार नाही जे तुमची तहान भागवेल त्यासाठी नैसर्गिक कसदार जमीनच कामी येईल जलस्रोतच हवे आहेत.पहा विचार करून.......... .........आपल्या पृथ्वीला वाचवायला प्रत्येकाने पुढाकार घ्यायलाच हवा हो! ना!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract