Anjali Bhalshankar

Abstract Action

2  

Anjali Bhalshankar

Abstract Action

प्रमाणिकपणाची कसोटी

प्रमाणिकपणाची कसोटी

2 mins
49


प्रमाणिकपणा हा व्यक्तिचे संस्कार नीती मूल्य विवेक बुद्धी व परिस्थितीनुसार जपला जातो.मनुष्याला खरे वा खोटे वागण्यासाठी कोणिही प्रवृत्त करू शकत नाही जर तो तत्त्वाशी एकनिष्ठ असेल तर मानसावर कोणिही कसलाच खोटा विचार वा आचरण लादू शकत नाही.प्रमाणिक मनुष्य कोणत्याही संघर्षाला तोंड देऊन संकटाना व खरे वागल्यास व बोलल्यास होणार्या परीणामांना सामोरे जायला घाबरत नाही वा परीणामाची पर्वा करित नाही.या जगात खोटी नानी तात्पुरती चकाकत असतात सोन्याचा मुलामा लावून पितळाला सोने म्हणणारे अनेक लोक आपण पहातो.पंरतु कितीही दडपून ठेवले तरीही खोटेपणा ऊघड होतच असतो व सत्य वा प्रमाणिक पणा हा सूर्यासारखा लख्ख असतो ज्याला चमकणयासाठी कोणत्याही मुलामयाची आवश्यकता नसते वा सत्याला कुणिही लपवु शकत नाही सुर्य ढगांच्या आड झाकोळून जातो ही कधी कधी मात्र क्षणभरच तसेच प्रमाणिक माणसाचे आहे जी व्यक्ति कितीही काळ्या कृत्याचे ढग सामोरे आले तरीही त्या ढगांना चिरून पार करून आपल्या मार्ग व नीती विचार यापासून तसूभरही ढळत नाही.ऊलट नव्या ताकदीने असत्याशी लढायला सिद्ध होते.याऊलट काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक असतात. त्यांना सत्य असत्य नीती मूल्य वा संस्कार या गोष्टीशी दूरवर संबध नसतो अशी माणसे खरेतर समाजात कलंक व घातक असतात कारण यांचा खोटेपणा कपटी विचार हे मानवजाती साठी नुकसान दायी असतात.वारंवार खोटे बोलणे मग ते लपविणयासाठी पुन्हा पून्हा नव्याने खोटे बोलणे.अशी वृत्तीमुळेच मनातून उतरून जातात.बरेचदा अशा अप्रमाणिक व्यक्तिला पुन्हा पुन्हा संधी देऊन विश्वासार्हता दाखवूनही काही ऊपयोग नसतो. कुत्र्याचे शेपूट सदा वाकडेच अशी म्हण आपल्या कडे आहे जी अशा खोटे बोलणाऱ्या लोकांना बरोबर लागु पडते...कधी कधी मनुष्य हतबल निराश व संकटात असतो खरा मग चोरी,खोटे बोलुन पैसे उकळणे वा दुःखाचे रडगाणे गाऊन सहानुभूती मिळविणे असले उद्योग लोक सर्रास करतात.खोटे बोलतात खोटे वागतात प्रमाणिक पणाचा मुखवटा चढवून साळसुद पणे सारे कुकर्म करणारे नराधम फालतु लोक आपल्याला कितीतरी पहायला मिळतात आणि खरे बोलुन लोकांच्या हसण्याचा विषय झालेले लोक ही आपण पहातो.मातर कुणि निंदा वा वंदा व एकला चलो रे असे म्हणत प्रमाणिक मनुष्य पायवाटेवर चालत रहातो त्याला कसलिच भीती नसते कारण त्याच्या जवळ आत्मिक समाधान असते. मात्र अप्रमाणिक व खोटारडी माणस समुहानं असली तरीही समाधानी व निडर नसतात कारण त्यांना भीती असते त्यांच्याच आत दडपलेल्या कितीतरी कृष्ण कृत्यांची .


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract