नदीच्या काठावर......
नदीच्या काठावर......
अकराची साडेअकराची वेळ तुडुंब भरलेल्या मुठा नदीच्या कठड्यावर मी बसलेय.जवळ अगदी नदीला खेटूनच म्हणा ना ! हाताला पाण्याचा प्रवाहाचा सहज स्पर्श होइल इतक्या समीप बसलेय मी.तीन तास उलटून गले असतील साधारणं आठ वाजता मी आले.काहीवेळ निवांत लेखन करून नेहमीप्रमाणे परतण्याच्या विचारात होते का कुणास ठाऊक पावले वळेचनात घराकडे. नदीच्या प्रचंड प्रवाहाने मला रोखले होते का?एरव्ही तासाभरात परतणारी मी तीन तास ऊलटूनही इथेच नदी किनारी बसुन आहे.पहावं तिथवर फक्त नदीचा प्रवाह पूर रुद्रावतार आणि हातभर अंतरावर मी कोणि सहज धकका दिला असता तरीही त्या प्रवाहात सहज विलिन होऊन जलसमाधी मिळाली असती मला.मघापासून कित्येक लोक पुर पहायला आले नी गेले अजुनही होतेच होते.लोक येत फोटो व्हीडीओ अगदी कठड्याच्या कडेवरून इतभर अंतरावर ऊभे राहून वहाणारया पाण्यासोबत स्वताला मोबाईल मध्ये.कैद करण्यासाठी धडपडत हे कसले थ्रील जीवावर बेतणार.माझ्या अगदी बाजुलाच कोणत्यातरी न्युज चायनलच्या दोन मुलांनी सेट ऊभारला.एक कॅमेरा स्टॅन्ड व त्यावर फीट केलेला मोबाइल.कानात काॅडपीन व हातात मायक्रो माईक असलेली एक सडपातळ वीसभावीशीतली वार्ताहर मुलगी नदीचे वीडीओ व फोटो टिपत मधये मध्ये पाणी पहायला जमलेल्या गर्दी तील काहीजणांनी संवाद साधत होती.मध्येच कॉलेजच्या मुलामुलींचे दोनचार घोळके मला अगदी घासून गेले.समोरच कठड्यावर ऊभी राहून दंगा मस्ती.त्यातल्या एकीने तर बाजुला खटून उभ्या असलेल्या आपल्या मित्राला दंडाला धरून ढकलू का?असे दोनतीनदा म्हणत गदागदा हलवले.माझा आपला काळजाचा ठोका चुकल्या गत झाले ते सारे मात्र फिदी फिदी हसत ऊभे कठड्यावर एका लाईनीत अगदी कडेवर पाचदहा मिनिटे ऐकमेकावर पाणी ऊडव पाण्यात दगड टाक ढकलू का असे आपापसातील प्रश्न मला अगदीच चैन पडेना चेष्टा मस्करी त खरच ऐखादयाचा तोल गेला तर?आता बोलायलाच हवे माझे मोबाईल मध्ये सुरू असलेले काम सोडून तडक वर मान केली व त्या घोळकयातील मुलाकडे पाहुन बोलले काय रे घरी आई वाट पहात असेल ना रे !आहे ना आई वडील बहीण घरात.हो !मग पोहता येत का?नाही!तो जरासा वरमला बाजुच्या मुलीही दगड मारायचे सोडून बुजुन माझ्याकडे पाहू लागल्या हो! आहे की ! मग मघापासून ती तुला पाण्यात ढकलण्याची चेष्टा करतीये तुम्ही लोक इतक्या कडेवर ऊभे आहात तुम्हाला कळतय का?एका सेकंदात खेळ खलास होइल तुमचा मी आताच्या तरूणाइला समजेल अशा त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.एकेक जण कठडयावरून खाली आले.स्वारी काकू आम्हाला कोणालाही पोहता येत नाही असे म्हणून आले तसे निघुन गेले .पंधरा मीनीटे गेली असतील आणखी आठ दहा जणांचा ग्रूप आला. एकमेकांच्या आईचा उद्धार करीतच नशीब पोरी नव्हत्या त्यांच्यात तेही ऐकमेकांवर पाणी ऊडवित पाण्यात ढकवलून देण्याची भाषा करीत माझयापासून काही हात अंतरावरच बसले कसले उनाडक्या व मग्रूर उद्धट पणे आपापसात बोलत.आईबहीणीवरून शिव्या हासडत मस्ती करताना बाजुला एक बाई बसलेली आहे तिच्या कामात व्यस्त आहे आणि भोवताली आणखीही काही मुली व महीला ज्या पाणि पहायला आल्या आहेत याचेही त्यांना भान नसावे आणि यांची वय तरी कीती सोळा ते विशिच्या आतले सारेजन काही अंतरावर उभ्या त्यांच्याच वयाच्या व कॉलेजच्या सुद्धा असाव्यात कदाचित एकाच पोरीसुदधा ओशाळून गेल्या चारदोन बाया ही पाहून न पाहिल्या सारखे करत मख्ख उभ्या....मी मनात चरफडले खरेतर जरा बिचकुनच!त्यांच्या भाषेचा टोन ऐकुन मलाही काहीतरी ऊलट बोलणार असे वाटून मी नरमाईनेच बोलले अरे मी लिखानं करीत आहे जरा आवाज कमी करा की बाळांनो त्यांच्या उत्तराची वाट न पहाता पूढे कारे तुमच्या आयांना का मस्तीत मध्ये आणताय रे !तुमच्या.त्या तुम्हाला कॉलेजात शिकायला पाठवलय का ऐकमेकांवर शिव्या द्यायला एरवी खरे तर माझ्या स्वभावानुसार हे अतिशय त्रासिक पणे आवेशात बोलले असते मी मात्र मनावर ताबा ठेऊन शांतपणे नेमक बोलले. नाही काकू जातो आम्ही म्हणून माझ्यापासून दूर जाऊन पुन्हा मस्ती करू लागली आता शिव्या बंद झाल्या होत्या मात्र मस्तीचा आवेश तोच.दरम्यान बरेचसे दुचाकीस्वार,लहान मुलांना घेऊन ,पालक व कॉलेजमधली बरेच मुल मुली काही कपल्स यांनी नदीकडेच्या रस्त्यावर गर्दी केली होती.लेखनावरच लक्ष हटलयाने मला कडकडून भुक लागल्याचे जाणवले तोवर पावणेबारा झालेले.मी ऊठुन घरच्या वाटेवर चालू लागले चालताना त्या पोरांच्या टोळकयाकडे एक नजर टाकली पोर आपल्याच मस्तीत दंग होती टाळ्या शिट्या फोटो,व्हीडीओ गळतात गळे हातात, मानेवर खांद्यावर हात आपल्या वेगळयाच दुनियेत बेफिकीर बिनधास्त निवांत तारुण्य म्हणलं उगाचच उपदेशाचे डोस दिला पोरांना जगु दे मनाप्रमाणे मनसोक्त तारुण्याचा ऊपभोग घेऊ देत नाही तरी पुढे जाऊन तरी काय तीच दुनियादारी घर ऑफीस शेड्युल संसार कुटुंबाची जबाबदारी...
