ज्ञानवापीचा सनातनी संघर्ष!
ज्ञानवापीचा सनातनी संघर्ष!
ज्ञानवापी मस्जिदीखाली शिवलिंग आहे अशा चर्चा सुरू झाल्या वा जाणूनबुजुन घडविण्यात येत आहेत काही धर्मांच्या लोकांकडून कशा पद्धतीने अतिक्रमण केले जात आहे ही माहिती डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य प्रदीप आगलावे यांनी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार आहे असे पत्रक काढून जाहीर केले.याअगोदरच मंदिर मस्जिद विहारे यांचा वाद म्हणा किंवा चर्चा म्हणा यामुळे सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे.धर्माला राजकीय हस्तक्षेप किंवा राजाश्रय म्हणा असेल तरच तो भरभराटीस येतो प्राचीन काळी बुद्ध धम्माला राजाश्रय मिळत गेला तशी धम्माची भरभराट झाली मधल्या काळात असंख्य स्थित्यंतरे अतिक्रमणे लढाया या निरनिराळ्या राज्याकडून सत्तांतरे हस्तांतरे होत गेली हे सार पाहताना ती एका विशिष्ट ठिकाणीच झाली आहेत की वेगवेगळ्या अनेक ठिकाणी झाली आहेत यावर नजर टाकणेही गरजेचे आहे. तिरुपती बालाजी सोमनाथ जगन्नाथ जगन्नाथ ही सारी प्राचीन पुरातन मंदिर ही बुद्ध विहारेच आहेत कधीकाळी संपूर्ण भारतात बुद्ध स्तुप स्तंभ व विहारं होते.देशाचे प्राचीन आर्किऑलॉजिस्ट डिपार्टमेंट यांनी लोणावळा जवळील कार्ला लेणी ही वास्तविक बौद्धलेणीच आहे हे सांगितले आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी म्हटले होते पंढरपूरचे पांडुरंग मंदिर हे प्रत्यक्षात बौद्धलेणी आहे 25 डिसेंबर 1954 च्या भाषणात आंबेडकर म्हणाले होते की पंढरपूर येथे बौद्ध धम्माचे विहार होते हे मी सिद्ध करून देईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी मांडणी करतात की बौद्ध विष्णूचा दहावा अवतार आहे हे आम्ही अजिबात मान्य करणार नाही ज्ञान व्यापी मस्जिदत शिवलिंग आहे असे काही लोक ठासून सांगत आहेत. न्यायालयात याचिका दाखल करून मस्जिद उत्खनन करण्याची मागणी करीत आहेत. तीच बाब विठ्ठल मंदिराच्या विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार आहे हे सिद्ध करण्याच्या संदर्भात बोलायची झाली तर मात्र दुप्पटी पणाने वागत आहेत मस्जिद उत्खनन करून खरंतर नसलेल्या मंदिराचा शोध घेण्यासाठी सनातनी लोक जोर लावीत आहेत. ज्ञानवापी मस्जिद म्हणा वा इतर धार्मिक स्थळांचा विषय वाढवला जातो तेव्हा या देशाच्या राजकारणात खरतरं महत्वाचे प्रश्न शिक्षण रोजगार ऊपासमार स्त्रियांचे आरोग्य विद्यार्थी व बांलकाचे प्रश्न शेतकरी कामगार शोषितांचे प्रश्न असायला हवेत परंतु त्याऐवजी धर्माचा विषय व मुद्दा सर्वोच्च करून त्याला प्राधान्य दिले देऊन इतर महत्वाच्या गोष्टींकडे सारासार दुर्लक्ष केले जात आहे. व धर्माला प्राधान्य देऊन जातीयवादाचे विष पसरवले जात आहे.अशाप्रकारे बिना महत्वाचे मुद्दे विरोधकांना धारेवर धरायला उकरून काढले जातात.मग ते भोंग्याचे असो वा मंदिराचे किंवा आरक्षणाचे मुद्दे असो अशा प्रकारचे कोणतेही खोटे डाव सफल झाले नाहीत तरीही अशा गोष्टींना प्राधान्य देऊन वारंवार सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न ताकतीने केला जात आहे. खरे मी प्रथम भारतीय आहे हा महत्वाचा विचार प्रत्येक नागरिकाला कळायला हवा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ईसाई यापेक्षा मी प्रथमतःव अंतिम भारतीय आहे हा विचार करून प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागायला हवे. वारकरी संप्रदाय यांचे कीर्तन तर हे विश्वची माझे घर व सर्वधर्मसमभाव व साऱ्यांनाच सामावून घेण्याची आमची रीत आहे असे ठासून सांगत असतो. दुरितांचे तिमिर जावो जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात म्हणजेच जे दीनदुबळे दलित पीडित शोषित आहेत त्यांचे दुःख दूर हो आणि ज्याला जे हवे ते मिळो असे ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे. आहे मग जिथे ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद पठण करून घेतले असे सांगितले जाते तिथे शूद्रातिशूद्र माणसाला आपल्या या मुखातून वेद म्हणणे किंवा ऐकणे इथे अपराध कसा मानला जात होता????वेद ऐकणे शिकणे वि म्हणने सनातनी लोकांनाते का पटत नव्हते? एखाद्या शुद्राने तसा प्रयत्न जरी केला तरी जीव्हा छाटली जावी ऐकण्याचा प्रयत्न केला तर कानात शिशाचे तेल ओतले जावे उच्चवर्णीय समजणाऱ्यावर सावली पडू नये म्हणून दूर दूर चालणे कमरेला कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये गळ्यात मडके अडकवून फिरावे मंदिरात गेल्यास मंदीर बाटावे हे कसे काय घडते?? पीडित पददलितांना शोषितांना साधा लिहिण्याचा वाचण्याचा बोलण्याचा अधिकार नव्हता किंवा तो देण्यास इथला समाज का तयार नव्हता ??याचे उत्तर इथल्या प्रस्थापित सनातनी व कीर्तनकार म्हणणाऱ्यांनी एकदा तरी द्यावे.नान्याला दोन बाजु असतात विचार चहुबाजूंनी व्हायला हवेत या पुढे जाऊन एक भारतीय म्हणून किंवा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेतील अधिकारांचा वापर करणारा नागरीक म्हणुन त्यांनी रुजवलेला राष्ट्रवाद व राज्यवाद ही सर्वात मोठी गोष्ट नव्हे काय? स्टेटनॅशनलीटी म्हणजे स्टेट मध्ये राहणारी माणसे महत्त्वाची आहेत धर्म माणसासाठी नाही माणूस धर्मासाठी आहे असा विचार करावा आमचाच धर्म व्यापक, सर्वसमावेशक, सनातनी, पुरातन, प्राचीन, आहे असे म्हणणे हे अत्यंत चुकीचे व समाजासाठी विघातक आहे. सांप्रदायिक व धार्मिक राष्ट्रवादापेक्षा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी दिलेला राज्य राष्ट्रवाद मोलाचा आहे हाच फरक आंबेडकर व इतरांमध्ये आहे.तो ओळखून घ्यायला हवा.जेव्हा सनातनी विचारसरणीची पिलावळ म्हणते बाबासाहेबांनी राष्ट्रासाठी व स्वातंत्र्यासाठी काय केले? तेव्हा त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की या लोकांचे स्वतंत्र आंदोलन म्हणजे अमुक अमुक धर्म व समूह किंवा प्रस्थापितांचा धर्म आणि शासन रुजवण्यासाठी जोरदार केलेले प्रयत्न असतात. अमुक-अमुक धर्म व संस्था समूह संस्कृती हीच कशी श्रेष्ठ आहे हे इथल्या बहुजन समाजावर रुजवणे हा त्यांचा दुष्ट हेतू असतो. परंतु डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर धर्म व समुदाय यांचा विचार करत नाहीत तर ते धर्म आणि संस्कृती पेक्षा इथ राहणारे पीडित, शोषित, दलित, तळागाळातील शेवटच्या माणसाचा विचार करतात.की अंतिम माणुस कशा प्रकारे सुखी होईल. त्याला शिक्षण आरोग्य रोजगार व मुख्य प्रवाहामध्ये कशाप्रकारे आणले जाईल. याचा सारासार विचार करतात.त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेब अहोरात्र झगडत होते.हाच खरा स्वातंत्र्यासाठी चा विचार होता. स्वातंत्र म्हणजे विशिष्ट समूहासाठी नसून या पृथ्वीतलावरील किंवा देशातील शेवटच्या माणसाला मोकळा श्वास घेण्याचा अधिकार होय.यालाच तर आपण राज्य आणि राष्ट्रवाद म्हणु शकतो किंवा म्हणतात.मध्यंतरी करोना महामारी आली या काळामध्ये गेल्या दोन-अडीच वर्ष आपण सारे देव बासनात गुंडाळून ठेवले होते! किंवा गायब झाले होते !म्हणा ना! जेव्हा मंदिर मज्जित विहार गुरुद्वारा चर्च बंद होतं सारं बंद होतं सुरू होतं तेव्हा फक्त हॉस्पिटल्स जागत होती. माणसं, डॉक्टर, नर्स, आरोगयसेवक, पोलीस, स्वच्छता कर्मचारी,सफाई कामगार रुग्णवाहिका चालक ज्याला जसे जमेल तसे माणूस माणसाला मदत करीत होता. तेव्हा प्रत्येक जण जग करोनामुक्त व्हावं अशी अपेक्षा करत होता.ऑक्सिजनचा पुरवठा सुसज्ज हॉस्पिटल तज्ञ डॉक्टर आणि योग्य औषधोपचार यासाठी जो तो झटत होता. सार्या मनुष्य जातीची या भयंकर साथी मधून महामारी मधुन लवकरात लवकर सुटका व्हावी अशी प्रार्थना करीत होता या पृथ्वीतलावर महामारी ची झळ सोसली नाही असा एकही जीव उरला नव्हता.परंतु त्यापासून आपण काय बोध घेतला? काय शिकलो? आपण उलट नव्याने धर्म वादाचा विषय तापुन समाजामध्ये अनिष्ट निर्माण करणाऱ्या विचार वाढीस लागला.या जागतिक संकटात धर्म कुठेही नव्हता तर माणुसकी दिसत होती जगाच्या एका टोकावरील माणुस दुसर्या टोकावरील माणसासाठी अश्रु गाळीत होता ज्या अश्रुंना मानवतेचा गंध होता. भीमरावांनी आयुष्यभर विज्ञानवाद, राष्ट्रवाद,मनुष्यवाद,जोपासला.धर्म वादाला त्यांनी फार थाराच दिला नाही. माणुस अंतिम आहे सुरुवात आणि शेवट हि माणुसच आहे.प्रत्येकाने विज्ञानवाद मी कीती दोन्ही जोपासला आहे हा बोध घ्यायला हवा.विचार व्हायलाच हवा की धर्मवादाला चिकटून चालणार नाही अन्यथा साऱ्या जगासाठीच ही विघातक गोष्ट आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, समानता,सर्वधर्म समभाव,आरोग्य,रोजगार, समानता, या गोष्टी राजकारणात महत्वाच्या असायलाच हव्यात मग राजकारणात कोणाला स्थान द्यावे हा निर्णय जनतेने सदविवेक बुद्धीने सर्वोच्च घ्यायला नको का ?
