Anjali Bhalshankar

Abstract Action Others

2.6  

Anjali Bhalshankar

Abstract Action Others

इंद्रधनुष्य

इंद्रधनुष्य

2 mins
74


""नयनरम्य रंग हे इंद्र धनुचे कोणी निर्मिले साज तयाचे आकाशाची ही निळाई कोणी ओतली इतकी शाई. अवकाशातुन सांडली रंगाची घागर लपुण ढगाआढ अभिषेक करी का?तो करूणाकर ""या ओळीं सार्थ होतात जेव्हा रिमझिम पावसात तेजाच्या गोळयाचा व ढगांचा ऊनपावसाचा खेळ सुरू होतो नी अवचित झाडातुन मोरपिसारा अवतरावा तसे आभाळाच्या अंगणातुन इंद्रधनुष्य अवतरते.डोळ्याच्या वाटेने अंतर्मनाच्या गाभार्‍यात जाताना स्वर्गीय नितळ आनंद देते.असे हे मोहक इंद्रधनुष्य!पावसाची विविध रूपे ही सप्तरंगात न्हाऊन निघालेली नाही का?पाऊस कधी निरागस बिनधास्त अंगावर शिरशिरी आणणारा कधी खिन्न होऊन डोळ्याच्या कडा ओलावणारा तर कधी मत्त उन्मत्त बेछुट बेधुंद होऊन मातीवर अत्तराच्या मोत्याचे सडे शिंपणारा आणि मागाहुन धरती व आकाशाला जोडणारा सेतुच जणु! तसेच पावसासोबत येणारे सुंदर रंगीबेरंगी इंद्रधनुष्यही. त्याला पाहुन खरंतर जगण्याच तत्त्वज्ञान ऊलगडतं सृजणाचे निसर्गाचे हे पवित्र निर्मल रूप आपल्याला जगायला शिकवतं कारण जरा विचार केलात तर आयुष्यही असेच रंगानी भरलेले असतं ना! आपलं सुख, दुख, आशा, निराशा, राग, प्रेम, माया, करूणा, मोह, मत्सर,इर्षा असे ते विविध रंग असतात.जीवनरूपी आभाळाच्या अंगणात जगताना आपल्या भोवतालीच हे रंग वावरत असतात नि आपणही त्या रंगा सोबत आयुष्य कंठत असतो.इतके मात्र कळायलाच हवे की कोणत्या रंगाला कितीक प्राधान्य द्यायचे.कि हे सारे रंग एकत्रीत करूण निगुतीन बेताबेतान त्यांना सांधत त्यांचे ही असेच इंद्रधनुष्य बनवायचे जे आयुष्यांच्या अंगणात नाती व मनं जपण्यासाठीचा सेतु होइल माणसाला मानसाशी जोडतील कोणाच्या तरी बेंरग जीवनात रंग भरतील जगणं सोप करतील!विविध रंगानी भरलेल जीवन कोमेजल्या नीरस मनाला नवी संजीवणी देत असतं म्हणुन वाटत आपनही इंद्रधनुष्य व्हायला हवे जे क्षणभंगूर असतं मात्र त्या काही क्षणात आपल्याला आपल्या आयुष्याचा गहन अर्थ समाजावतं किती काळ जगला, हे महत्वाच नाही मात्र कसे जगलास व आपल्या कर्तृत्वाच्या रंगाने जगाला दिपवून टाक व जीवनाचा अंतही हसत स्विकारायला हवा हेच शिकवुन जातं इंद्रधनुष्य!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract