harshada wagh

Abstract Inspirational Thriller

3.0  

harshada wagh

Abstract Inspirational Thriller

(गृहिणी) house of hero

(गृहिणी) house of hero

3 mins
481


गृहिणी कोण असते? काय असते गृहिणी.

गृहिणी फार छोटा आहे हा शब्द परंतु यात पूर्ण घर समावलं आहे.आपली हिंदू संस्कृती पुरातन आहे या संस्कृती ने आपली भारतीय कुटुंब व्यवस्था तयार केली आहे.

ही दोन भागात विभागली गेली आहे.

एक म्हणजे गृहस्थ घराची सगळी व्यवस्था पाहणारा तो गृहस्थ आणि दुसरा भाग म्हणजे गृहिणी.

गृहस्था ने जी काही व्यवस्था केली आहे उदरनिर्वाहा चि घरात सगळ्या चि लहान थोराच्या मुखी प्रेमाने मायेने भरवणारी ती गृहिणी.

मी एक गृहिणी आहे. आणि जगातील प्रत्येक स्त्री एक गृहिणी आहे. जरी ही ती बाहेरजाऊन काम करीत असली तरी जॉब करीत असली तरी तिला घरी येऊन काम कराव लागतो.

कोणी विचारले तुम्ही काय करता? मी एक गृहिणी आहे. असे बोलल्यावर, हो गृहिणी आहात म्हणजे घरीच राहता. घरीच राहता म्हणेज काही काम करत नहीं कारण घरात काही कामच नसतं ना असं वाटत काही ना. त्याच्या नजरेत गृहिणी चा काही अर्थ च नसतो.

असं नसतो घरात किती काम असता याची आपण मोजणी ही करू शकत नाही. प्रत्येकाच्या कामाची वेळ असते पण गृहणीच्या कामाची कधी वेळ ठरली राहत नाही. आपल्या ला रविवारी सुटी असते परंतु गृहिणी ला तर कधीच सुटी नसते. तिचा तर कधीच रविवारी येत नसतो त्या उलट त्या दिवशी तिला जास्त काम कराव लागत. त्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्ती हा आराम करतो परंतु गृहणीची आरामाची वेळ ठरली असते कारण सगळ्या च्या सुटी चा दिवस सगळ्या साठी त्याचा आवडी चा नास्ता बनवावा लागतो. गृहिणी ही सगळ्या च्या आवडी निवडी ची काळजी घेते. मोठया चा मान स्मान करते. लहान्यांना प्रेम करते. गृहिणी चा दिवस हा सकाळी 5वाजे पासून सुरु होतो तर तेच रात्री चे 11वाजे पर्यन्त. ती ची उठायची वेळ ठरली असते परंतु झोपायचं नाही. ती सकाळी उठल्या पासून कामाला लागते. देवाची पूजा करणे,झाडू लावाने, लादी पुसने, नास्ता बनवणे, कपडे धुणे, भांडी घासणे जेवण बनवणे, मार्केट मधून भाजी आनने,लेकरांना स्कुल ला सोडण्यासाठी आणि घेण्या साठी जाणे. नवऱ्या ला ऑफिस ला जाताना डबा बेणून देणे.मुलाचा संध्याकाळी अभ्यास घेणे. नवरा ऑफिस मधून थकून येईल म्हणून त्याच्या आवडीचे जेवण बनवणे. नवऱ्याला ऑफिस मधून येण्यास उशीर झाला तर त्यांची वाट बघणे. ती चा दिवस संपतच नसतो. काही ना काही काम निघतच असतो. ती थकून जाते पण कोणालाच बोलत नाही. ती च्या झोपायच्या वेळे पर्यंत सगळे च झोपून जाता.आणखीन बरेच काम ही गृहिणी करत असतें 

ती इतके काम करून सुद्धा. आपण कधी कधी तिला वाईट बोलतो.आपल्याला तिच्या कामाची किंमत नहीं कळत. ती जरा झोपली असेल किवा थकली असेल तर आपण तिला लगेच बोलतो घरीच तर होती ना बाहेर कामाला तर नहीं गेली होती इतक थकायला. काय काम करते तू घरात राहून. आपण जर घरात काम करण्यासाठी बाई लावली तर ती पगार घेते. परंतु गृहिणी ही तिच्या वेवढया काम करण्या च्या मोबदल्यात काहीच मागत नाही.ती जर चुकली तर आपण तिला खूप रागावत असतो आणि सारखे त्या एका चुकीची तिला आठवण देत असतो. ती सुद्धा माणूस आहे ती सुद्धा चुकू शकते परंतु आपण हा विचार कधीच करत नाही. लेकर चुकले तर त्याना समजावून सांगते. कधी तर त्याच्या चुकीवर पडदा टाकते.आणि मोठया ची चूक गिळून घेते.

आपण असे बरेच काम करून सुद्धा तिला वाईट बोलतो. तीच मन दुखावतो. तिला आपली गोष्ट ही वाईट वाटत असेल हा विचार सुद्धा आपण कधी करत नाही आपण फक्त बोलून मोकळे होऊन जातो. आपण हे विसरतो कि गृहिनी आहे म्हणून आपलं घर परिवार आहे. तिआपल्या पूर्ण परिवाराला सांभाळती. परिवाराला प्रेम करते सगळ्या ची किती काळजी घेते. ती आपलं जीवन हे परिवारा साठीच जगते.

गृहिणी ही थकते पण कधीच सांगत नाही. आपण सगळ्याणी ही तिची काळजी घ्यावी. तिचा मान स्ममान करावा. त्याच्या वर प्रेम करावे. तिला समजून यावे इतकीच तिची अपेक्षा असते.जर आपण येवढ केल तर ती कधीच थकणार नाही. कारण तिच्या सोबत तिचा परिवार असेल त्याच प्रेम असेल. तिला समजून घेणारे लोक असतील.

ही आहे गृहिणी..

ती जरी आपल्या साठी काही नसली तरी ती घरची रियल हिरो असती


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract