harshada wagh

Abstract Inspirational Others

4  

harshada wagh

Abstract Inspirational Others

माहेरची शेवटची दिवाळी

माहेरची शेवटची दिवाळी

3 mins
380


अग आता तू नकोस रांगोळी काढू साक्षी ला काढू दे. तिला ही शिकू दे रांगोळी काढायला. आता तुझं लग्न झाल्यावर पुढच्या वर्षी पासून तिलाच काढयची आहे रांगोळी मग तिला ही शिकू दे. असं माझ्या शेजारच्या काकू म्हणाल्या. मनात विचार आला हो खरंच पुढच्या वर्षी दिवाळी ला मी इथे राहणारच नाही. माझं तर लग्न होऊन जाईल मला तर दिवाळी ला माझ्या सासरी राहावा लागेल किती आठवण येईल मला इकडच्या दिवाळी ची 

दिवाळी हा सन सर्वाना खूपच आवडत असेल मला ही फार आवडतो दिवाळी नंतर एकादशी पासून लग्न सोहळ्या ची सुरु वात होत असते. एकादशी ला आपण दिवाळी सारखा च साजरा करत असतो. एकादशी ला आपण तुळशी च लग्न लावतो. लहान दिवाळी म्हणून आपण तो सन साजरा करतो

एकादशी पासून काही दिवसांनी च माझ्या लग्नाची तारीख निघाली होती. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती माझी शेवटची दिवाळी होती माझ्या माहेरची. तेव्हा फक्त एकच विचार मनात होता कि मी पुढच्या वर्षी दिवाळी ला इथे राहणार नाही. किती आठवण येईल मला इकडच्या दिवाळी सन साजरा करण्याची.माझ्या आई पप्पा ची माझ्या लहान बहिणीची तिच्या सोबत फटाके फोडण्याच्या गमती जमती ची माझ्या आई च्या हाताने बनलेल्या स्वादिष्ट फराळाची माझ्या दरवर्षी काढलेलंय सुंदर रांगोळी ची दिवे लावण्यात ची ह्या सगळ्यांना विचाराने डोळ्यात पाणी येत होत परंतु मझ्या डोळ्यातून पाणी येताना पहिल्या वर माझे आई वडील सुद्धा रडून देतील असं वाटत होत. परंतु आई वडिलांच्या सुद्धा मनात असत कि माझी मुलगी आता पुढच्या कोणत्याच सणाला माझ्या जवळ राहणार नाही त्याच सुद्धा मन ह्या गोष्टी नि दुखावलं असत परंतु ते सुद्धा आपल्या मुलीचा विचार करून आपले अश्रू थांबावंत असता.

माझ्या वडिलांना मला व माझ्या बहिणींना दरवर्षी दिवाळीला नवीन कपडे घ्यायचे. दिवाळी आली कि आमची शॉपिंग सुरु झाली समजा. आई घर सजावण्या साठी वस्तू तोरण,आकाशकंदील रांगोळी रांगोळी चे पुस्तकं घ्यायची. आमचे वडील आमच्या साठी फटाके आणायचे दिवाळी ची साफ सफाई सुरु करायचो घराला सुंदर सजवायचो खूप उत्साह ने दिवाळी सन साजरा करायचो.

माझं लग्न जमलं दिवाळी नंतर लग्न होत माझे वडील म्हणाले बेटा ह्या वर्षी कुठला ड्रेस घेणार आहे तुम्ही? नको पप्पा मी ह्या वर्षी तर माझ्या सासर होऊन आलेली साडीच नेसणार आहे. त्या निमित्ताने साडी घालायची सवय होईल मला. असं बोलताच माझ्या वडिलांचा चेहरा उतरला. माझी आई म्हणाली घालून घे बाळा ड्रेस मग लग्न झाल्यावर नाही घालता येत. मग नको मग तो ड्रेस तर साक्षी च्या कामात येऊन जाईल मग काय उपयोग ड्रेस घेण्याचा तिला तर आधी च पप्पा घेता आहे ना ड्रेस.

दिवाळी च्या संध्याकाळी लक्ष्मी पूजन साठी मी मी चुकीची मुकीच साडी नेसून तयार झाली. मला पाहताच माझ्या वडिलांनी मला मिठीत घेतलं आणि रडू लागले. मला ही रडू येऊ लागलं. आम्हाला बगताच माझी आई सुद्धा रडू लागी आणि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवूलागली. माझ्या लहान बहिणीचं सुद्धा मन भरून आला परंतु ती आम्हाला शांत करण्यासाठी माझ्या वडिलांना मस्करीत बोलते जाउद्याना पप्पा मी आहे ना अजून तुमच्या जवळ हिला तर जाऊ द्या त्या निमित्ताने तरी मला ही चे कपडे घालायला भेटतील. असं बोलल्यावर मस्करीत माझे तीच बोलणे सुरु झाले.


आम्ही सांगळ्यांनी लक्ष्मी पूजन केल. मी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. आणि फार मजा केली. फटाके फोडले. सगळयांच्या घरी जाऊन शेवटच्या वेळेस फराळ दिला.

अशी ही माझ्या माहेरची शेवटची दिवाळी होती

हैप्पी दिवाळी 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract