तो एका दिवस
तो एका दिवस
तो एक दिवस
टिंग टिंग टिंग.....दाराची बेल वाजते अर्चना लगबग लगबग जाऊन दार उघडते. दारावर तिचा नवरा मनोज आलेला असतो.
काय ग किती वेळ लागतो तुला दार उघडण्यासाठी, झोपली होती की काय.........अहो ते.......अहो काय बस आता सांगायचं हे करत होती ते करत होती कारण तर हजार असतात तुझ्याजवळ.. माणूस कामाने थकून येतो आणि घरी आल्यावरही त्याला तुमचा त्रास वेगळा आणि आज घराची अवस्था काय आहे ही घरात किती पसारा करून ठेवला आहे. आणि तू काय करते ग...... घरात.
घरातच असते ना.......का कुठे कामाला जातेस घराची अवस्था बघ काय करून ठेवली आहे. अहो ते मुलांनी आज खूपच पसारा करून ठेवला आहे. अगं बाई ते तर करतीलच तू कशासाठी आहेस फक्त जेवायला आणि झोपायला. दुपारी आराम करायचा रात्री आराम करायचा कोण आहे बोलणारा काहीही करा आपल्या मनाप्रमाणे सकाळी थोडं फार काम करा संध्याकाळी थोडं फार काम करा झालं मग आराम आणि टीव्ही बघा.
अहो आज ना ते मला.. काय मला हा काय मला तू काही नाही बस टीव्ही बघायला आणि आराम करायला पाहिजे अजूनही स्त्रिया.असता ग जे घर काम ही करतात तुला तर घरच सांभाळायचं आहे तितकाही तू व्यवस्थित करू शकत नाही काहीच काम करत नाही ह्म्म्म..
असं रागात मनोज अर्चनाला खूप काही बोलतो.
अर्चना आणि मनोज हे मुंबईत कल्याणला राहत असतात मनोज हा कल्याणला एका कंपनी जॉब करत असतो त्यांना एक 10 वर्षचा मुलगा आणि एक 7 वर्षाची मुलगी असते आणि मनोज ची आई असा त्यांचा परिवार असतो अर्चना ही बारावीपर्यंत शिकलेली असते मुंबईसारख्या शहराचे स्थळ आणि मुलगाही चांगल्या ठिकाणी जॉबला असल्यामुळे अर्चनाच्या आई-वडिलांनी अर्चनाचे लग्न लवकर करून दिले त्यामुळे मुंबई सारख्या शहरात राहूनही ती एक गृहणी म्हणून आपले घर आणि आपल्या मुलांना आणि सासूला सांभाळत असते.
अर्चनाचे दोघी मुले एका चांगल्या शाळेत शिक्षण घेत असतात. दोघांनाही सकाळी शाळेत जावे लागते त्यामुळे अर्चनाच्या दिवसाची सुरुवात ही पहाटे पाच वाजेपासून सुरू होते. सकाळी उठून दोघेही मुलांचा डब्बा बनवायचा त्यांना उठून शाळेत जाण्यासाठी तयार करायचा त्यांना नाश्ता बनवून खाऊ घालते. एवढा धावपळीत ही काम करत असतात ना कुठल्याही गोष्टीचा आवाज येऊ नये मनोज आणि सासुबाई ची झोप खराब होईल म्हणून ती आवाज न करता काम करते सकाळी अर्चनाची धावपळ सुरू असायची मुलांना शाळेच्या बसपर्यंत सोडून यायचं मुलं जात नाही तितक्यात मनोज चा ही ऑफिसला जाण्यासाठी वेळ होतो. मुलांनंतर अर्चना मनोज चा डब्बा तयार करते पहाटे पाच वाजता उठून ही अर्चनाला स्वतःसाठी एक कप चहा पिण्याचाही वेळ नसतो. अर्चना आठ वाजता मनोजला उठवते. मनोज च ऑफिस 11 वाजेपासून सुरू होतं पण ट्राफिक मुळे मनोजला एक तास आधीच घरातून निघावे लागते. मनोज चा डब्बा तयार करून देऊन मनोज च्या प्रत्येक गोष्टी त्याच्या हातात अर्चना ही देत असते. त्यात सासूबाई ही उठतात त्यांचाही नाश्ता चहा तयार करायचा इतक्या धावपळीती स्वतःला विसरून जाते. अशाप्रकारे अर्चनाच्या रोजच्या दिवसाची सुरुवात होते. अर्चना सगळे गेल्यानंतर आरामात बसून एक कप चहा पिते तिचे जड झालेले डोकं आता त्या एक कप चहाने शांत होतो. मग काय पुन्हा तेच घराची साफसफाई धुणं,भांडी, स्वयंपाक बाजारातून भाजी आणणे तिचे काम चालूच असतात. मग मुलं शाळेतून घरी परत येतात. दुपारी चार वाजेपासून पुन्हा मुलांना ट्युशन साठी तयार करायचं. मग संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करायची.
सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवण्यासाठी ती तयारी करते संध्याकाळी सगळे एकत्र असतात त्यामुळे अर्चना सगळ्यांच्या आवडीचा छान स्वयंपाक तयार करते सगळेच थकलेले असतात शिवाय अर्चनाच्या कारण अर्चना थकली तर आवडीचा स्वयंपाक बनवू शकणार नाही. जेवणाला बसल्यावर जेवणाचा ताट बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदा कसा येणार सर्वांचा थकवा कसा दूर होणार अर्चना खूप उत्सुकतेने स्वयंपाक बनवते अर्चना थकलेली जरी असली तरी ती मुलांना नवऱ्याला जेवताना तो आनंद बघून अर्चनाचा थकवा दूर होऊन जातो. ती सर्वांना पोट भरून जेऊ घालते. मग सर्वांचे जेवण झाल्यावर ती जेवते. जेवण झाल्यावर पुन्हा ती किचनची आवर सावर करते भांडी घासते सगळे काम झाल्यावर ती लेकरांना एक गोड अंगाई व छान गोष्टी सांगत त्याना झोपवते. सासुबाई च्या गुडघ्यांची मालिश करून देते त्यांना त्यांच्या औषध वेळेवर देते नवरा दिवसभर काम करून थकला असेल म्हणून त्याचे डोकं दाबते. मग सगळ्यांच्या झोपल्यानंतर ती अलार्म लावून झोपते. अंथरुणावर लेटल्यावर तिच्या शरीराचा एक एक अंग दुखत असतो. परंतु तरी ती थकून गेल्या असल्यामुळे ती कधी झोपते ते तिला नाही कळत. अर्चना ही सर्वांच्या झोपल्यानंतर झोपते व सगळ्यांच्या उठण्याआधी उठते. अशी ही अर्चनाची रोजची दिनचर्या.
तरीही एक दिवस मनोज अर्चनाला खूप रागवतो खूप काही बोलतो परंतु अर्चना सगळं काही शांतपणे ऐकते. मनोज इतके काही बोलणे ऐकून अर्चनाच्या डोळ्यात पाणी येते.मनोज रागाने बोलून निघून जातो अर्चना हळूहळू घर आवरण्यास सुरुवात करते. आणि थोड्यावेळाने सगळ्यांना जेवण वाढते जेवण वाढत असताना अर्चनाचा हात थरथर कापतो....
जेवणाचा ताट पाहून मनोज जोरात अर्चना असे ओरडतो. काय आहे हे...... हा सांग ना आजारी आहे का कोणी घरात मी तर नाही आहे लेकरं आहे का?आई तू आहे का? अर्चना घाबरत बोलण्याचा प्रयत्न करते तितक्यात मनोज म्हणतो शांत बस.... अगं मी दिवसभर ऑफिसला असतो सकाळ संध्याकाळ लोकलचा प्रवास करतो धक्क्या बुकिंग करत घरी येतो लेकरंही शाळेत जातात ट्युशनला जातात अभ्यास करतात आणि तुला आमच्यासाठी जेवण ही बनवता येत नाही. काय तर खिचडी बनवली तुने आज खिचडी... तूच खा तुझी खिचडी
मनोज रागात जेवणाचा ताट सरकवून निघून जातो.मनोज ची आई अर्चनाला रागवते बघ बिचारा माझा मुलगा न जेवता निघून गेला काय तर आता खा ही खिचडी हीच आहे आमच्या नशिबात......
मुलांना भूक लागलेली असते म्हणून ते खिचडी खाऊन घेतात म्हणून बाहेरून काही खाऊन येतो आणि घरी आल्यावर रागात झोपून जातो . अर्चना ही झोपून जाते.
सकाळी पहाटे पाच वाजता अर्चनाच्या घडाळीचा अलार्म. वाजतो पण अर्चना उठत नाही. मनोज तिला आवाज देत बोलतो ए बाई उठ आलार्म वाजत आहे . अर्चना हळूहळू उठण्याचा प्रयत्न करते आणि अलार्म बंद करते. अर्चना हळूहळू उठते. उठल्यावर दोन-तीन पावलं चालताच ती पडते. मनोज च लक्ष अर्चना जवळ जातो म्हणून लवकर उठून अर्चनाला उचलण्यासाठी जातो आणि म्हणतो कशी काय धडपडलीस. मनोज अर्चनाला उचलत असताना त्याला कळतं की अर्चनाला फार ताप आला आहे. मनोज अर्चनाला उचलून पलंगावर लेटवतो. त्याला कळतच नाही काय करावे. मग तो अर्चनाच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्यात ठेवतो . अर्चना चा ताप थोडा कमी होतो. मनोज इतक्या सकाळी कुठले डॉक्टर नसतील म्हणतो.
अर्चना झोपेत बोलते की मुलांची परीक्षा आहे. चला उठा बाळांनो तेव्हा मनोज ला कळते की मुलांची आज परीक्षा आहे. आणि त्यांना आज शाळेत जाण्यासाठी मनोजला तयार करावा लागेल. कारण अर्चनाची उठण्याची अवस्था नव्हती मनोज घड्याळात बघतो तर सहा वाजले असतात मग मनोज लवकर जाऊन मुलांना उठवण्याचा प्रयत्न करतो. लेकरं लवकर काही उठत नाही खूप आरडा ओरड करून मनोज दोघांना उठवतो. लेकरं रडत रडत उठतात. मुलांना कळतच नाही आज पप्पा आम्हाला का उठवत आहे. ते म्हणतात पप्पा मम्मी कुठे आहे. ती किती प्रेमाने आम्हाला उठवते ही आमची झोप गायबच होते. तुम्ही मम्मीला पाठवा मनोज म्हणतो आज मी तुम्हाला तयार करणार आहे चला लवकर लवकर तयार व्हा. पप्पा म्हणजे टिफिन पण तुम्हीच बनवणार. मनोज विचारात पडतो आता टिफिन काय बनवू. तो किचनमध्ये जाऊन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो.मनोज मुलांना कसतरी करून ब्रेड जॅम टिफिन मध्ये देतो व नास्ता साठी ही तेच देतो. लेकरं ब्रेड जॅम खाण्या साठी तोड वाकड करतात. मनोज लेकरांना समजवत बोलतो आजच्या दिवस खाऊन घ्या.तितक्या त मनोज ची मुलगी म्हणते पप्पा माझे केस करून द्या दोन वेणी घालून द्या. मनोज विचारात पडतो आता वेणी कशी घालू. तरीही तो वेणी घालण्याचा प्रयत्न करतो. मुलगी रागात बोलते पप्पा... तुम्हाला काहीच येत नाही माझी मम्मी किती छान वेणी घालते माझी सगळ्या क्लास मध्ये माझ्या च वेण्या छान असता.आज सगळे मला चिडवतील पपा. बेटा सॉरी पण मला अशीच वेणी टाकते येऊ शकते मुलगी रागावून जाते. तितक्यात बस येण्याची वेळ होते.मुलांना बस प्रयत्न सोडायला जाण्यासाठी वेळ होतो आणि बस निघून जाते.
मग मनोज ला मुलांना शाळेत गाडीने सोडायला जावे लागते.मनोज ची फार धावपळ होत. मनोज तितक्यात फार थकून जातो.
मनोज घरी आल्यावर नळाला पाणी आलेलं असत. मनोज एकही क्षण न बसता लवकर पाणी भरण्याची सुरुवात करतो. कारण मनोज ला कळतो पाणी येऊन ही अर्धा तास झाला आहे. तो किचन मध्ये जे ही भांडी दिसतात ते भरतो. माठात तो पाण्याचा पाईप लावतो आणि दाराची बेल वाजते. तो कोण आहे हे बघण्यासाठी जातो तर दारावर दूधवाले दादा आलेले असतात. मनोज त्यांना बोलतो दादा थोडं लेट येत जा पाणी आलेलं असत आता पाणी भरावं कि दूध घ्यायचं. दूधवाले दादा मनोजला म्हणतात.साहेब वाहिनी दाराला पिशवी लावून देतात म्हणून बेल वाजवावी लागत नाही. मनोज म्हणतो ठीक आहे.
मनोज घरात जातो तर बघतो कि किचन मध्ये पाणी च पाणी माठा तुन पाणी वाहत असतो. मनोज लवकर लवकर जे ही कापडं दिसतात त्याच्या ने पाणी पुसण्या चा प्रयत्न करतो. ह्या कामात तर बिचारा मनोज चागलाच दमतो. खूप प्रयत्न करून पाणी पुसतो.त्यात त्याला फार वेळ होतो त्याला वाटतं की आता त्याला ऑफिस मधून सुट्टी घ्यावाच लागेल म्हणून तो ऑफिसमध्ये फोन लावून सुट्टी घेतो.
मनोज दूध गरम करण्यासाठी गॅस वर ठेवतो.तितक्यात मनोज ची आई चा आवाज येतो. अर्चना ये अर्चना. मनोज आई जवळ जातो. काय झालं आई. का ओरडते अरे माझा चष्मा भेटत नाही आहे. अर्चना कुठे आहे तिला माहित असेल. अग आई तिला बर नाही आहे आणि तुझा चष्मा तूझ्या जवळ च असेल रात्री तूझ्या जवळ असतो ना... अरे हो पण मला भेटत नाही आहे आता...
तितक्यात मनोज टेबल वर बघतो आणि आई तो बघ तुझा चष्मा तूझ्या टेबल वर आहे. आणि इकडे तिकडे बघते...
असं बोलतो. पण तो हे विसरतो कि त्याने गॅस वर दूध तापवायला ठेवलं आहे. त्याला आठवल्या वर तो पळत किचन मध्ये जातो. बघतो तर दुध किचन ओट्यावर पडलेलं असतो. तो रागात स्वतः च्या डोक्या वर हाथ मारतो. काय त्रास आहे रे देवा. ह्या घरच्या कामा पेक्षा तर माझ्या ऑफिस बर बसल्या बसल्या सगळं काम..
मनोज किचन ओटा पुसतो. आणि नास्ता बनवतो काय बनवू त्याला कळतं नाही पण आई ला काही द्या वा लागेल म्हणून तो बाहेरून नास्ता घेऊन येतो. मनोज आई ला चहा नास्ता देतो. त्याची आई त्याला ओरडते.तुला माहित नाही मी बाहेरच काही खात नाही. माझं पोट खराब होत.आई आता खाऊन घे मी दुपारी घरातच जेवण बनवेल. नको रे बाबा आता दुपारी मी जेवण नाही करणार असं ही हे सगळं खाऊन जेवणाची इच्छा होणारच नाही. मी तर आता रात्री जेवेल.असं मनोज चीआई बोलते. मनोज नास्ता करून अर्चनाला डॉक्टरा कडे घेऊन जातो डॉक्टर अर्चनाला आराम करण्यासाठी सांगतात तिला इंजेकशन आणि औषधं देतात आणि बाहेरच काही खाऊ नका असं सांगतात.
अर्चनाला घरी आल्यावर मनोज आराम करायला सांगतो. कारण तिला अशक्त पणा आलेला असतो.मनोज अर्चनाला नारळ पाणी आणून देतो.l
त्या नंतर मनोज घराची आवर सावर करतो.. दुपारी जेवण बनवतो पण कोणी ही जेवण करत नाही. मनोज कपडे धुतो. भांडी घासतो. लादी पुसतो. स्वतःला चा शाबाशी देत म्हणतो कि व्हा मी किती छान घर स्वच्छ केल. तितक्यात लेकरं येतात आणि फक्त 2मिनटात घरची अशी अवस्था करता. जणू घर स्वच्छ केलंच नव्हत. घरात पुन्हा पसारा बघून मनोज मुलांनावर फार चिडतो.आता च घर आवरलं होत मी कळतं नाही तुम्हाला., लेकरं रडतात.
त्यांना समजावून त्याचे शाळेचे कपडे बदलून देतो. मनोज आता फार थकलेला असतो तो आता दुपारी सोप्यावर बसल्या बसल्या झोपून जातो. तितक्या चार वाजता आणि मुलांच्या ट्युशन चा वेळ होतो. मनोज लवकर उठून मुलांना ट्युशनला जाण्यासाठी तयार करतो आणि त्यांना ट्युशनला सोडून येतो.
मनोज संध्याकाळची चहा ठेवतो. चहा पितात त्याची आई म्हणते चहा नसता पिला तर बरं झालं असतं सगळं तोंडच खराब झाला. मनोज म्हणतो अग आई मी काय नेहमी नेहमी बनवतो का आजच्या दिवस सहन करून घे बाई. हो बाबा पण स्वयंपाक बरा कर आता. मनोज ला पुन्हा स्वयंपाकाची आठवण येते. काय स्वयंपाक बनवा त्याला कळतच नाही तो स्वयंपाकत साधी सोपी खिचडी बनवण्याचा विचार करतो. तो खिचडी बनवतो पण किती पाणी टाकावे कुकरच्या किती शिट्ट्या घ्यावे हे त्याला माहीतच नसते. त्यामुळे तो कुकरमध्ये पाणी कमी टाकतो व शिट्या जास्त घेतो. घरभर खिचडी जळण्याचा वास पसरलेला असतो. वास येताच तो कुकरचा गॅस बंद करतो. मग जेवताना मुलांना व सगळ्यांना तीच खिचडी जेवणात वाढतो. खिचडी बघून त्याची आई रागवते. काय रे बाबा आज दिवसभर जेवण नशिबात नाही आहे वाटतं. मुलही म्हणतात पप्पा या खिचडी पेक्षा तर काल मम्मीने बनवली खिचडी किती छान होती. हॉटेलच्या जेवणापेक्षाही सुंदर होती ती कालची खिचडी. अर्चना ही जेवायला बसलेली असते. ती मुलांना समजते बेटा जेवणाला नाव ठेवत नाही खाऊन घ्या. पप्पा ने किती मेहनतीने खिचडी बनवली आहे आज आपल्यासाठी खाऊन घ्या सगळेजण वाकडं तिकडं तोंड करून ती खिचडी खातात. परंतु अर्चना ही खिचडी खूप आनंदाने खाते. रात्री मनोज ची आई मनोजला बोलते बेटा माझ्या गोळ्या तरी काढून दे मला आई अगं कुठल्या गोळ्या मला तर नाही माहिती अरे बाबा माझ्या गुडघ्या दुगायच्या गोळ्या त्या गोळ्या जर मी घेतल्या नाही तर मला रात्रभर झोप नाही येणार तू सांग मला कुठल्या गोळ्या आहे मी देतो. मला नाही माहित मला तर अर्चना रोज देते काढून. थांब मी अर्चनाला विचारून येतो. मनोज अर्चनाला विचारण्यासाठी तिथे जातो तितक्यात अर्चना आईला जाऊन गोळ्या देऊन येते. मनोज त्या एका दिवसात फार थकलेला असतो. इतका तो तो दिवसभर ऑफिसला जाऊन ही कधी थकत नाही असं मनोज म्हणतो. आणि अंथरुणात लेटल्यावरच मनोज झोपी जातो.
सकाळी पुन्हा पाच वाजता अलार्म वाजतो. अलार्म चा आवाज ऐकून मनोज उठतो. बघतो तर काय अर्चना बेड वर नसते मनोज उठून किचन मध्ये जातो. अर्चना किचन मध्ये मुलाचा डब्बा बनवत असते अर्चना मनोज ला बघते अहो तुम्ही का उठले जा तुम्ही आराम करा काल फार दमला असणार तुम्ही. मला बर आहे आता मी करेल सगळं जा तुम्ही आराम करा. मनोज अर्चनाला बघतच असतो. इतक्या सकाळी उठून ही तिचा चेहरा अगदी टवटवीत दिसत होता. अर्चनाच्या गोष्टी मुळे मनोज ला फार लाजिरवाणी वाटतं. मनोज म्हणतो मी काही मदत करू का...
अहो नका तुम्ही आराम करा आज ऑफिस ला ही जा मला बर आहे आता, ठीक आहे.
मनोज ऑफिस ला जातो. ऑफिस ने घरी परत आल्यावर मनोज अर्चना साठी गिफ्ट घेऊन येतो. आणि जेवण करत असताना अर्चनाला मनोज ते गिफ्ट देतो. आणि तिची माफी मागतो.
तु आपल्या घराला, आपल्या मुलांना, माझ्या आईला स्वतः च्या आई सारखी सांभाळते. ते ही कोणावरही चिडचिड न करता. सगळ्यांना किती प्रेमाने सांभाळते. कधी कोणावर ही राग करत नाही. सगळं घरचं काम तु एकटी करते. आमच्या साठी आवडीचा स्वयंपाक बनवते.आम्ही 12 तास काम करतो आम्हाला पगार मिळतो. आम्हाला आठवड्यातून एकदा सुट्टी ही असते.
तुम्ही गृहिणी सगळं घराचं काम करता. तुम्हाला एक दिवसाची ही सुट्टी नसते. तुम्हाला ह्या सगळ्या कामाचा पगार ही भेटत नाही. तरीही तुम्ही गृहिणी सर्व काम निःस्वार्थ पणे आनंदाने करतात. आम्हला वाटत कि घर कामाला काही महत्व नसतं. घर काम म्हणेज काही नाही पण कालच्या त्या एका दिवसातच मला कळले. कि घर काम काय आहे. तू काय आहे. एक गृहिणी काय असते हे सगळं मला काल समजलं ग. मी जे तुला खूप रागवलं होत खूप संताप केला होता त्या बद्दल मी तुझी माफी मागतो. सॉरी.......
मनोज च्या सर्व गोष्टी ऐकून अर्चनाच्या डोळ्यात अश्रू येतात.....व स्मित हास्य ही तिच्या चेहऱ्यावर असतो. तुम्ही माझा इतका विचार केला थँक्यू......
मग सगळे बसून अर्चनाने बनवलेल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतात.....
