प्रेमाचा तो पहिला पाऊस
प्रेमाचा तो पहिला पाऊस
त्या गर्मी च्या दमट वातावरणात आकाश कळेभोर झाले होते.जून महिना लागून 10 दिवस झाले होते. सगळेच पाऊसाची आतुर तेणे वाट बघत होते तितक्या त विजेचा गडगडाट होऊ लागला. मी धावत वर गच्ची वर गेलो. वर जाऊन आकाशात पाहू लागलो. आज पाऊस येणारच ह्या आशेने सर्वांचे डोळे आकाशात पाहत होते. त्या सर्वात दोन डोळे असे होते. ज्यांना मी पाहत होतो. जनु ते डोळे देवा कडे बोलता आहे हे देवा ह्या तापलेल्या गर्मी ला तूझ्या गार वाऱ्याने आणी तूझ्या थंड पाण्याच्या एक एक थेबाने दूर कर. तितक्यातच विजेचा फार जोरात गडगदाट झाला. तिने आपले कान बंद केले. डोळे घट्ट मिटले. मी तिच्या चेहरायच्या एक हावभावाना पाहत होतो. किती गोड दिसत होती. आणी तिने अलगद आपले डोळे उघडले तिच्या चेहऱ्यावर एक खळी उमळली. तिच्या लागावर मी पहिल्या पावसाचा थेंब बघितला. त्या थेंबाच्या स्पर्शाने ती गगनात मावेना झाली ती जोरात ओरडली. थँक्यू देवा, थँक्यू सो मच. पावसाचा हळू हळू वेग ही वाढला. तिच्या गच्ची वर ती उभी राहून लहान किलबिला सोबत ती नाचू लागली.उड्या मारू लागली. पावसाच्या पाण्यात ओली होऊन ती आणखीन सुंदर दिसत होती. मी तिला बघूनच खुश होतो. पहिल्या पावसाचा तो आनंद तिला बघूनच मला होत होता. ती फुगडी खेळू लागली.अचानक ती नाहीसी झाली. माझे डोळे तिला शोधू लागले. त्या जोमाच्या पावसात डोळे पुसत पुसत मी समोरच्या पूर्ण गच्ची वर तिला पाहू लागलो. मग पैंजनीची रुणझून आवाज कानात येऊ लागली. मन सांगत होत हा तिच्या च पैंजनी चा आवाज आहे. माझे डोळे तिला पाहण्यास वळतात. नुकतीच पैंजण नव्हती ति माझ्या मनाला ति पुन्हा दिसण्या ची आस होती ती.
ती पुन्हा मला दिसली. जनु ती माझा अगदी जवळ आली.
मी ही तिच्या हातात आपला हाथ दिला आणि आम्ही दोघे ही फुगडी खेळू लागलो. नाचू लागलो. नाचता नाचता आमचा दोघांचा पाय घसरला आणि आम्ही एकमेकांवर धडपडलो. आणि मी तिला बघतच राहिलो. तिचे ओले चिंब केस. माझा चेहऱ्यावर आले. अलगद तिने केस सरवले. माझे बंद डोळे उघडतच तिचा गुलाबाच्या फुला सारखं चेहरा मला अगदी जवळून दिसला तिचे पाणेरी डोळे गुलाबाच्या पाकळ्या सारखे तिचे होट. तिचा नाजूक चेहरा. मी तिला बघण्यातच गुंग झालो.
आणि मला माझ्या लहान भावाने आवाज दिला दादा खांबा सोबत कोणी फुगडी खेळतो का. पडलास ना मग उठ आता पाऊस संपला. मग उठून बघतो तर काय तीही तिच्याच गच्ची वर उभी होती आणि मी माझ्या. मनातल्या मनात हसू लागलो. स्वप्न का होईना पण फारच सुंदर होत.
धत 'तेरी कि स्वप्न बघत होतो. दोन मिनिटाच ते स्वप्न फारच गोड होत..
पहिल्या पावसाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर वर पाहून मी फार आनंदात होतो. असा हा ह्या वर्षीचा पहिला पाऊस माझ्या साठी प्रेमाची झरी घेऊन आला होता ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आता रोज गच्ची वर येऊ पावसाची आणि तिची दोघांची वाट मी बघू लागलो.... येईल ना ती पुन्हा.

