harshada wagh

Inspirational Others

2  

harshada wagh

Inspirational Others

गावातील जत्रा

गावातील जत्रा

2 mins
30


गावातील जत्रा म्हटलं कि उत्साह. मी खान्देश ची राहणारी. आमचं गाव नहीं पण शहर च आहे धुळे. धुळे खान्देश मधे येत तिथली देवी म्हणजे एकविरा आई. एकविरा आई हि आमच्या खान्देश ची कुलस्वामिनी आहे धुळ्यात एकविरा आई च खूप प्रसिद्ध आणी जून असं मंदिर आहे.



एकविरा आई च हे मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे हे मंदिर पाझरा नदीच्या ठिकाणी आहे.मंदिर फार जून आहे मोठं आहे. ह्या मंदिर मधे वर्षातून दोन वेळा जत्रा भरते. चैत्र महिन्यात आणि नवरात्र त दोन्ही वेळेस मंदीर ला खूप सुंदर सजवलं जात.जत्रा म्हणजे झोके. लहान लेकरासाठी खळणे, वेगवेगळ्या प्रकारचे झोके असता. प्रतेक गोष्ट जत्रे त उपलब्ध असते. जत्रेत फार गर्दी असते. प्रसादा साठी मिठाई च्या दुकानं असता. नारळ फुल कुंकू हे दुकान मंदिर च्या जवळ लागलेले असता खूपच मजा येते. मंदिर मध्ये हवन होतात. सकाळी 5वाजता पहिली आरती होती.

एकविरा आई चे भक्त पहाटे सकाळी 3बजेपासूनच आई च्या दर्शनासाठी जाण्यास निघता 3वाजेपासूनच रोडवर मंदिरला जाण्यासाठी लोकांची गर्दी दिसत वाजत गाजत लोक आईच्या दर्शनासाठी जाता. सप्तमी ला आई ला मंदिरा फुलोरा लावता. आईच्या दर्शन साठी फार राग लावावी लागते फारच गर्दी राहते. पण एक उत्साह असतो जत्रे चा.



आई च्या मंदिर ची सजावट पाहवशी वाटते खूपच सुंदर लाइटिंग लावलेली असते फार वेळा ने आई चे दर्शन होतात.आई ला हे नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाची साडी नेसवली जाते भक्त ह्या दिवसात आपली मान पूर्ण करता. आई चा रोज वेगवेगळ्या श्रुगार केला जातो. मंदिरात रांगोळी खूप मोठी रांगोळी काढली जाते. मंदिरात गरबा खेळला जातो खूप उत्साह असतो सगळ्या मधे 

असं आहे माझ्या खान्देश च्या एकविरा आई च मंदिर आणि तिथली जत्रा जी मला फार आठवते. आणि मला फार आठवते.

जय एकविरा आई


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational