harshada wagh

Abstract Romance Others

3  

harshada wagh

Abstract Romance Others

तिच्या सोबत एक छोटासा प्रवास

तिच्या सोबत एक छोटासा प्रवास

2 mins
215


एक दिवस मला कॉलेज ला जाण्यास फार उशीर होत होता. आणि त्यात माझी गाडी खराब झाली. सकाळी सकाळी डोकं खराब झालं माझं पण कॉलेज ला पेपर होते म्हणून कॉलेज ला जाण गरजेचे. नाईलाज मी रिक्षा स्टॅन्ड वरून रिक्षा केली आणि निघालो.

रिक्षा स्टॅन्ड च्या पुढच्या चौकात ती उभी होती. तिला बघताच माझा कोमजलेला चेहरा गुलाबाच्या फुला सारखा टवटवीत झाला. हृदयाचे ठोके धड धड करू लागले. रिक्षा तिचा समोर उभी राहिली. परंतु तिने मला रिक्षा त पाहिले होते म्हणून ती माघे पुढे रिक्षात बसणण्या साठी करत होती पण तिला ही कॉलेज ला उशीर होत असेल म्हणून ती तोड वाकड तिकडं करुन बसली. मला खूपच आनंद झाला पाहिलीदा मी तिच्या इतक्या जवळ होतो. तिला इतक्या जवळून पाहत होतो.

ती मला बघता तोड वाकड केल आणि रागात तिची कॉलेज बॅग दोघांच्या मध्ये आपटली आणि ऑटो च्या बाहेर बघू लागली माझी नजर तिलाच बघत होती सकाळी येणारा थंड वारा तिच्या चेहऱ्यावर येत होता आणि तिच्या चेहऱ्याला आणखीन खुलवत होतो.आणि त्या वाऱ्या ने उडणारे मऊ लांब सडक सुंदर असे केस माझ्या चेहऱ्यावर येत होते. ते बघताच तिने आपले केस घट्ट बांधले 

मी नेहमी तिची छेड काढायचो आणि ती खूप राग करायची

मी तिला विचारलो पेपर आहे तुझा ती हळुवार बाहेर बघून म्हणाली नाही पुन्हा विचारलं काय तिने रागाने उत्तर दिले नाहींइइइइइइइ मी म्हणालो हळू बोल ऐकू येत मला. आधी ही बोली मी. होका मग मला नसेल ऐकू आलं सॉरी. ती स्वतः शी पण मला ऐकवत बड बड करु लागली आज कॉलेज चा रस्ता कि ती लांब वाटत आहे तीच कॉलेज 5मिनिटाच्या अंतरावर होते परंतु मला असे वाटतं होते हा रस्ता संपूच नये तिला मी असच पाहत राहू. तिच्या रागात असलेले ती चेहऱ्यावर तर मी प्रेम करत होतो. आणि काय किती लवकर तीच कॉलेज आलं आणि ती रिक्षा तुन उतरली. माझी नजर ती दिसे पर्यंत तिलाच पाहत होती. माझ्या साठी तिच्या सोबत घालवलेला पाच मिनिटाचा तो छोटासा प्रवास ही खुप महत्वाचा होता. मग पुनः रोज रिक्षा ने कॉलेज ला जाऊन तुझी वाटत त्या चौ कात बघत होतो रोज तुझा भास होत होता पण मात्र तू रस्ता चा बदला होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract