सुमित बारी

Abstract Others Children

5.0  

सुमित बारी

Abstract Others Children

गोष्ट एका झाडाची

गोष्ट एका झाडाची

1 min
928


सुरेशने आपल्या बंगल्याच्या बाजूला जागा घेतली. त्या जागेवर एक भले मोठे आंब्याचे झाड होतें.सुरेश दरवर्षी त्या आंब्यांचा आस्वाद घेत असे. सुरेशने आता त्या जागेवर बांधकाम करायचे ठरवले. बांधकामात झाड अडथळा येत होता म्हणून,सुरेशने ते झाड तोडायचे ठरवले. झाड भलेमोठे असल्यामुळे तोडायला दोन दिवस तरी लागणार होते. पहिल्या दिवशी झाडाला फार दुःख झाले.झाड सुरेशला सांगणारच, पण सुरेश त्या दिवशी सुरेश घरी नव्हता.दुसऱ्या दिवशी सुरेशला झाडाने स्वतः हाक मारली, व स्वतःकडे बोलावून घेतले.


सुरेशला आश्चर्य झाले की झाड कसे बोलत आहे.

झाड म्हणाले, आज तू मला बोलायला मजबूर केलेस, सुरेश म्हणाला कसे काय???


झाड म्हणाले, मी तुला प्राणवायू दिला, इतके फळ दिले आणि तू घेतलेसही आणि आज मी तुला अडथळा म्हणून येत आहे?, तू माझे अस्तित्व संपवायला निघालास? मला तुझ्याकडूनही अपेक्षा नव्हती. हे सर्व बोलत असतांना झाडाच्या डोळ्यात पाणी आले होते. 


सुरेशने यावर तेथेच विचार केला, व तो झाडाला काही सांगणारच तोवर झाड पूर्णपणे तोडले गेले होते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract