लाल परी
लाल परी
आता एसटीचा संप चालू असल्या कारणाने अनेक जणांकडून मेसेजेस आले, अनेक जणांच्या व्हाट्सअप्प स्टेटसवर सुद्धा एकच मेसेज बघितला की,
एसटी व जिल्हा परिषद शाळा या दोन गोष्टी वाचवणे गरजेचे आहे, कारण या दोनच गोष्टी गरिबांच्या राहिलेल्या आहेत. कारण कोणतीही श्रीमंत व्यक्ती एसटीने प्रवास करत नाही व कुठल्याही श्रीमंत व्यक्तीची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाहीत.
वरील मेसेज पाहिल्यावर माझं एक मत मी सांगू इच्छितो की जर एसटी ही गरीब व्यक्तींसाठी / गरीबांची आहे तर मग एसटी सेवा गरिबांसाठी तरी चालू करा, कारण गरीब लोकांना एसटी बंद असल्यामुळे इतर वाहनांनी जास्त, दुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. आता शाळा सुद्धा सुरू झाल्या म्हणून त्या गरीब विद्यार्थ्यांसाठी तरी एसटी सेवा सुरू करायला हवी.
वरील मेसेजशी माझा कुठलाही राजकीय मतभेद नाही, मी एक गरीब विद्यार्थी असून माझ्या इतर गरीब मित्रांच्या जे एसटीने प्रवास करतात त्यांच्या भावनेतून हे मत मांडलेले आहे.